शेतकरी आंदोलन ; मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण पोलिसांच्या ताब्यात
कराड / प्रतिनिधीकराड दि.6 कृषी कायद्याच्या विरोधात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन केले जात आहे. कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण यांनी रास्तारोको करत कृषी कायद्यांविरोधात आपला निषेध नोंदवला
साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज विविध संघटनाच्यावतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. सातारा जिल्हा महिला संघटना, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय काँग्रेस महिला आघाडी अशा विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी मोदी सरकारच्या निषेध नोंदवला.दरम्यान, यावेळी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ‘शेतकऱ्यांचे कायदे करणाऱ्यांना शेती कशी करतात हे माहिती आहे का? शेतकऱ्यांसाठी केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत की अदानी अंबानी यांच्या फायद्याचे आहेत?’ असा जळजळीत सवाल सत्वशीला पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.दक्षिण कराड या मतदारसंघात पृथ्वीराज चव्हाणांचे प्राबल्य राहिले आहे. सत्त्वशीला चव्हाणही कराड तालुक्यात चांगल्याच सक्रिय आहेत. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सत्त्वशीला चव्हाण मैदानात उतरल्याचं पाहायला मिळालं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा