काळगाव ; वाझोली मध्ये बिबटयाचा वावर
तळमावले/प्रतिनिधी
वाझोली दि.15 ता.पाटण : येथे बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. गावामध्ये अनेक दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून आज दि.15 रोजी पहाटेच्या सुमारास गावामधील आचरेवस्ती येथे शिवाजी आचरे यांच्या घराबाहेर बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला आहे. पहाटे घरातील लोकांना घराच्या बाहेर मृत अवस्थेत कुत्रे पहावयास मिळाल्या नंतर पोलीस पाटील विजय सुतार यांनी वनविभागाला माहिती दिली.
तसेच भागात बिबट्याचा व इतर प्राण्यांचा वावर वाढला असतानाही वनविभागाचे या घटनेनंतर दुर्लक्ष होत आहे ,असे निदर्शनास येत असून गत महिन्यात बिबट्याने अनेक कुत्री व शेळी फस्त केली आहेत. मात्र अन्य वन्य प्राण्यांनी कुत्री खाल्ली असावी, असा समज असल्याने खात्री पटत नव्हती. मात्र बिबट्याने केलेल्या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाल्याने गावामध्ये दहशत निर्माण झाली आहे. व यामुळे गावातील शेतकरी व ग्रामस्थ यांच्यामध्ये भीतीदायक वातावरण झाले असून ,बिबट्याचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चौकट: गेल्या सहामहिन्यांपासून गावात व शेजारील भागात बिट्याचा वावर असून प्रशासनाने योग्य ती कारवाही करावी,गावातील शेतकरी वर्ग रात्रीच्या वेळी शेतामध्ये पिकाची अन्य जनावरांच्या कडून नुकसान होऊ नये म्हणून पहारा देत आहेत पण या घटने नंतर गावातील शेतकरी वर्ग हा भीतीच्या दडपणाखाली गेला असून वनविभागाने ठोस पर्याय काढून बिबट्यांचा व अन्य प्राण्यांचा योग्य तो बंदोबस्त करावा.
- श्री अशोक मोरे -मा.सरपंच व विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वाझोली.
चौकट: भागामध्ये जंगल पेटवल्याने, जंगलातील प्राणी ही गावामध्ये रात्रीच्या दरम्यान वावरत असून वनविभाग योग्य ती कारवाही करणार असून ,भागातील लोकांनी मुकी जनावरे बंद पॅक शेड मध्ये ठेवावी, रात्रीच्या दरम्यान शेतकरी वर्गांनी चार पाच लोकांचा समूह करत गस्त घालावा .
डुबल साहेब-काळगाव बिट वनविभाग.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा