सोमवार, ११ जानेवारी, २०२१

मराठा आरक्षणसंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक

मराठा आरक्षणसंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक 

मुंबई, दि. 11 : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज, 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.आज सायंकाळी 5 वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाईन सहभागी होणार आहेत.मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सुविधा अधिक दर्जेदार व प्रभावी करण्याच्या दृष्टीने हेळगाव .येथे जनआरोग्य समितीची बैठक उत्साहात पार पडली.

सदर बैठकीस जिल्हा परिषद सदस्य लालासाहेब जगदाळे व विविध गावचे सरपंच जन आरोग्य  समितीचे सदस्य व   हेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे...