रविवार, ३१ जानेवारी, २०२१

बचतीचे दालन म्हणजे शिवसमर्थ संस्था - बाबासोा थोरात

बचतीचे दालन म्हणजे शिवसमर्थ संस्था - बाबासोा थोरात
तळमावले/वार्ताहर
अल्पावधीत लोकांच्या विश्वासास पात्र ठरलेली संस्था म्हणजे शिवसमर्थ होय. बचतीचे उत्तम दालन म्हणून संस्थेकडे पाहिले पाहिजे असे प्रतिपादन बाबा महाराज मठाचे मठाधिपती बाबासोा विष्णू थोरात यांनी काढले. ते सवादे शाखा येथे आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण पुजेच्या प्रसंगी बोलत होते. यावेळी शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, देवबा वायचळ सर, विठ्ठलराव पाचुपते, पी.आर.सावंत, नानासाहेब सावंत, लक्ष्मण माने (सर), माधुरी माने डाॅ.प्रशांत कांबळे, सौ.लक्ष्मी सुतार, दिनकर कांबळे, रघुनाथ पाटील, मानसिंग जाधव-पाटील, जगन्नाथ थोरात, पुजाराणी थोरात, वसंत थोरात, राजाराम थोरात व इतर मान्यवर उपस्थित होते.
365 दिवस अविरत कार्यरत असलेल्या शिवसमर्थ संस्थेने आपल्या कार्यविस्ताराने जनमानसावर आपली प्रतिमा तयार केली आहे. एनईएफटी, आरटीजीएस अशा सुविधा देत संस्थेने काळानुरुप आपली वाटचाल सुरु ठेवली आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेल्या संस्था आपली नेत्रदीपक वाटचाल  करत आहे.
आर्थिक सेवा देत असताना सामान्य माणसाला बचतीची सवय लागावी, त्या बचतीतून त्यांची छोटी मोठी कामे व्हावीत असा मानस असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड.जनार्दन बोत्रे यांनी सांगीतले. प्रत्येक व्यक्तिला बचतीचे महत्त्व पटावे यासाठी संस्था विविध पातळयांवर प्रयत्न करत आहे असेही ते म्हणाले. 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी, 2021 अखेर सर्व प्रकारच्या मुदत ठेवींवर 1 टक्के ज्यादा व्याजदर देणार असून त्याचा लाभ लोकांनी घ्यावा असेही आवाहन त्यांनी केले आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी सवादे परिसरातील अनेक मान्यवरांनी संस्थेस सदिच्छा भेटी देवून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंद्रजित कणसे, सुशांत तुपे, विजय सवादकर, विजय मोहिते, दादासोा नायकवडी, अभिजित गायकवाड, महादेव शेवाळे, शिवराज पाटील, शिवानी म्हारुगडे, रविंद्र चोरगे, धनाजी पाटील, सागर जाधव व शिवसमर्थ परिवारातील सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

शुक्रवार, २९ जानेवारी, २०२१

पाटण ; पाटण तालुक्यातील आरक्षण सोडत जाहीर

पाटण ; पाटण तालुक्यातील आरक्षण सोडत जाहीर
पाटण (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील 234 ग्रामपंचयतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोड़त आज शुक्रवारी पाटण येथील रणजितसिंह पाटणकर सभागृहात
तहसीलदार समीर यादव प्रांतअधिकारी श्रीरंग तांबे यांच्या उपस्थितित पार पडली.
यामध्ये गावहीन यादी खालीलप्रमाणे

सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण 150 जागा यामध्ये महिलासाठी 75 राखीव पुरुषांसाठी 75 जागा यामध्ये सर्वसाधारण महिलासाठी असलेली गावे
मराठवाडी, डेरवण, साईकडे, डांगिष्ठेवाडी, वाटोळे, नाणेल, पाचगणी, आटोली, पेठशिवापुर, आडदेव, कोरिवळे, बिबी, कळंबे, नाटोशी, घोटील, कोंजवडे, वेखंडवाडी, तामिणे, वाघजाईवाडी, खिवशी, त्रिपुडी, आस्वलेवाडी, सळवे, गोठणे, जाधववाडी, काठी, आंब्रग, नुने, निवी, विहे, मरळी, घाणव, नाणेगाव खुर्द, खराडवाडी, मुंद्रुळकोळे, धामणी, बोडकेवाडी, साबळेवाडी, मत्रेवाडी, धायटी, महिंद, दुसाळे, गमेवाडी, माझगाव, नाणेगाव बुद्रुक, झाकडे, मालदन, बांधवट ,भोसगाव, नहिंबे -चिरंबे, चौगुलेवाडी, पाबळवाडी, गवाणवाडी, मंद्रुळकोळे, मेंढोशी, हुंबरवाडी, बनपेठवाडी, गलमेवाडी, नाडे, रामिष्ठेवाडी, काळगाव, मस्करवाडी, गोकुळ तर्फ हेळवाक, शिरळ,  धजगाव, आंबवडे खुर्द, ढाणकल, दिवशी खुर्द, उधवणे, माथणेवाडी, तामकडे, पाडळोशी, धडामवाडी, मोरगिरी, अडुळपेठ, 

 सर्वसाधारण पुरुषांसाठी 75 जागा यामध्ये 
 सणबूर, निसरे, गोवारे, तारळे, पवारवाडी, शिंगणवाडी, गोकुळ तर्फ पाटण, वांझोळे, जळव, कराटे, शिंदेवाडी, रासाटी, हावळेवाडी, कुसवडे, वाडीकोतावडे, कडवे बुद्रुक, नेचल, चाळकेवाडी, साखरी, ठोमसे, पानेरी, विरेवाडी, चौगुलेवाडी (काळगाव), कोळेकरवाडी,गावडेवाडी, आंबेघर तर्फ मरळी, चोपडी, आवडेॅ, गारवडे, साईकडेवाडी, कवडेवाडी, दिवशी खुर्द, नाव, चव्हाणवाडी, (धायटी), विरेवाडी, चिटेघर, सातर, सोनाईचीवाडी, शेंडेवाडी, कामरगाव, कारळे, मणदूरे, भिलारवाडी, पिंपळोशी, घाणबी, सुतारवाडी, लुगडेवाडी,  डाकेवाडी, पाचुपतेवाडी, आंबवणे, ढोरोशी, हेळवाक, शितपवाडी, दाढोली, केर, शिद्रुकवाडी, नवसरवाडी, येराडवाडी, पापडेॅ, उरूल, मरळोशी, करपेवाडी, जरेवाडी, नेरळे, सडावाघापुर, निगडे, कवरवाडी, बनपूरी, चाफोली, मुळगाव, बेलवडे खुर्द, काहीर, टेळेवाडी, किल्ले मोरगिरी.
अनुसूचित जातीसाठी एकूण 20 जागा
  यामध्ये 10 महिला आणि 10 पुरुष असे आहेत.
महिला  राखीव १० 
तोंडोशी, मारूल हवेली, शिवंदेश्वर, टोळेवाडी, मणेरी, निवडे पु. खळे, घोट, अडूळ गावठाण, हूंबरळी, 
 अनुसूचित जाती पुरूष 10
धावडे, कोकिसरे, कारवट, गुढे, कसणी, जानुगडेवाडी, सोनवडे, कुंभारगाव, मुरूड, बहुले, 
 अनुसूचित जमाती 1
    भारसाखळे 
नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण 63 ग्रामपंचायती आहेत यामध्ये 31 जागा पुरुषांच्या साठी व 32 जागा महिलांना राखीव आहेत.  
  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव 32 जागा यामध्ये
   मेंढेघर, मान्याचीवाडी  डावरी, बोंद्री, खोनोली, गुंजाळी, लेंडोरी, वाझोली, कुसरुंड, डिगेवाडी, राहुडे, वेताळवाडी, नाडोली, पाठवडे, ढेबेवाडी, जिंती, डोंगळेवाडी, मंद्रुळकोळे खुर्द, येराड, कडवे खुर्द, गाडखोप, चोपदारवाडी, चाफळ, बांबवडे, जाळगेवाडी, सांगवड, म्हावशी, मालोशी, आंब्रुळे, सुळेवाडी, मेंढ, नावडी. 
 नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरूष (खुला) 31 जागा यामध्ये
मल्हारपेठ, सुरूल, चिखलेवाडी, केळोली, कळकेवाडी, मानेवाडी, केरळ, मारूल तर्फ पाटण, , काळोली, येरफळे, आंबळे, रुवले, काडोली, वाझोली, जमदाडवाडी, सुपुगडेवाडी, नारळवाडी, काढणे, कोदळ पु. कातवडी, शेडगेवाडी, आबदारवाडी, भुडकेवाडी, पाळशी, कुठरे, वजरोशी, निवकणे,चव्हाणवाडी,उमरकांचन,गोषटवाडी, मोरेवाडी. 


सातारा ; पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा ; पशुसंवर्धन विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन
  सातारा दि. 29 : राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सन 2020-21  या वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये 20 शेळ्या व 2 बोकड असा शेळी गट  वाटप करणे या योजनेसाठी  28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे. 
  या योजनेंतर्गत एका शेळी गटाची किमत रु. 2 लाख 29 हजार 400 इतकी असुन सर्व प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदान देय असणार आहे. हे अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व  दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.  
 तसेच  राज्यस्तरीय योजना मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर सन 2019-20  या वर्षात सातारा जिल्ह्यामध्ये 2 देशी किंवा संकरीत गाई किंवा 2 म्हशींचा गट वाटप करणे या योजनेसाठी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत लाभार्थ्यांनी अर्ज करावेत.
 या योजनेंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांस 2 देशी किंवा संकरीत गाई गट खरेदी व वाहतूकसह 50 टक्के अनुदान रक्कम रुपये 56 हजार किंवा 2 म्हैस गट खरेदी व  वाहतूकसह 50 टक्के रक्कम अनुदान रुपये 66 हजार देय असणार आहे. 
  हे अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व  दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के याप्रमाणे लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. अर्जासोबत सादर करावयाची आवयक कामगदपत्रे व योजनेच्या सविस्तर माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायात समिती यांचेशी सपर्क साधावा असे आवाहनही श्री. परिहार यांनी केले आहे.

भारतमाता प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - प्रा.अरुण घोडके

भारतमाता प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - प्रा.अरुण घोडके
तळमावले/वार्ताहर
जीवनाचे यशस्वीपण आपल्या विचारांवर अवलंबून असते. आपले विचार आपल्या संगतीवर अवलंबून असतात. भारत माता प्रतिष्ठानचे यशस्वीपण त्यांच्या विचार आणि कार्यकत्र्यांवर आहे. भारतमाता प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन प्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके यांनी व्यक्त केले ते रेठरे बद्रुक येथील भारतमाता प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे, जि.प.सदस्या शामला
घोडके, ग्रा.पं.रेठरे च्या सरपंच सुवर्णा कापुरकर, माजी जि.प.सदस्य डाॅ.राजकुमार पवार, माजी बालकल्याण समिती सभापती सुशिला साळुंखे, कृष्णा सह.साखर कारखान्याचे संचालक वसंतराव साळुंखे, ग्रा.पं.रेठरेच्या उपसरपंच शिवाजी दमामे, पत्रकार दिलीप धर्मे व इतर मान्यवर उपस्थित होते.
गेली 10 वर्षे 26 जानेवारी या दिवशी भारतमाता प्रतिष्ठान च्या वतीने भारतमाता प्रतिमेचे पूजन केले जाते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लोकांचा गौरव केला जातो. हे खरंच उल्लेखनीय आहे. आपली भावी पिढी कर्तृत्वान, धैर्यवान, शीलवान, संस्कारक्षम व्हावी हे भारतमातेचे स्वप्न आहे. त्या अनुषंगाने भारतमाता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते काम करताहेत हे कौतुकाची बाब आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘‘समाजासाठी कोरोना काळात काम केलेल्या निस्वार्थी लोकांचा सत्कार भारतमाता प्रतिष्ठानच्यावतीने प्रेमाची शाल, स्मृतीचिन्ह, रोपटे देवून केले जात आहे हे अनमोल आहे.’’ व्याख्यानावेळी प्रा.अरुण घोडके यांचे शिवचरित्रावरील अनेक प्रसंग डोळयांसमोर उभे केले. तसेच भारतमातेसाठी सानेगुरुजी यांनी लिहलेले भारतमातेसाठीचे गीत सर्वांकडून वदवून घेतले. यामुळे वातावरण एकच भारावून गेले. डाॅ.राजकुमार पवार, पिनु कावरे यांना भारतमाता प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार देवून गौरवण्यात आले
याप्रसंगी डाॅ.संदीप डाकवे, मुजावर मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाची भारतमाता प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन याने केली. मान्यवर व सत्कारमुर्तीचे स्वागत सन्मानचिन्ह, षाल व श्रीफळ देवून करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन उत्तम धर्मे आणि हणमंत गायकवाड यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव साळुंखे यांनी केले. सुत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी तर आभारप्रदर्शन हेमंत धर्मे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरदार मोरे, संतोष कोष्टी, रविंद्र नलवडे व भारतमाता प्रतिष्ठानचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.

एसपी अजयकुमार बन्सल यांना 7000 वी कलाकृती भेट

एसपी अजयकुमार बन्सल यांना 7000 वी कलाकृती भेट

तळमावले/वार्ताहर
सातारा जिल्हयाचे एसपी अजयकुमार बन्सल यांना विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी 7000 वी कलाकृती भेट दिली. ‘व्हेरी गुड, खुपच सुंदर’ अशा शब्दांत अजय कुमार बन्सल यांनी डाकवे यांचे कौतुक केले. एसपी अजयकुमार बन्सल देखील डाकवे यांच्या या अनोख्या भेटीने भारावले. त्यांनी संदीप डाकवे यांनी विविध उपक्रमांची माहिती घेत त्यांना शुभेेच्छा दिल्या. कलेच्या विविध माध्यमात काम करत असलेल्या डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत सेलिब्रिटी, विविध क्षेत्रातील दिग्गजांना रेखाचित्र, शब्दचित्र, अक्षरगणेशा देवून ‘सरप्राईज भेटी’ दिल्या आहेत.
यापूर्वी डाॅ.संदीप डाकवे यांनी 100 वे रेखाचित्र अग्रलेखांचे बादशहा पद्मश्री नीलकंठ खाडीलकर, 500 वे रेखाचित्र पद्मश्री डाॅ.प्रकाश आमटे, 1000 वे रेखाचित्र अभिनेते भरत जाधव, 2000 वे रेखाचित्र अभिनेते सुबोध भावे यांना, 3000 वे रेखाचित्र अभिनेत्री अश्विनी महांगडे यांना, 4000 वे स्केच सुप्रसिध्द गायिका कविता राम यांना, 5000 वे रेखाचित्र सातारा जिल्हयाच्या माजी एसपी तेजस्वी सातपुते यांना, 6000 वे रेखाचित्र सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांना तर 7000 वे स्केच एसपी अजयकुमार बन्सल यांना दिले आहे. विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी या कलेतून मिळणारे मानधन गरजूंना देवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातूनही विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले आहेत.

बहुमत तुमचे सरपंच आमचा ! सरपंचपदाची लॉटरी कोणाला लागणार?

बहुमत तुमचे सरपंच आमचा ! सरपंचपदाची लॉटरी कोणाला लागणार? 

तळमावले / प्रतिनिधी

 ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता सरपंचपदासाठी "धुमशान' सुरू झाले आहे. सरपंचपदाचे आरक्षण आज शुक्रवार (ता. 29) जाहीर होणार आहे. आपल्या गावाला कशा प्रकारचे आरक्षण पडणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. बहुमत असलेल्या गटाकडे जर आरक्षित उमेदवार नसेल तर सरपंच होणार विरोधी गटाचा हे मात्र नक्की त्यामुळे नवीन निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांसह पॅनेलप्रमुख व मतदारांमध्येही धाकधूक वाढली आहे. 

यावर्षी ग्रामपंचायत निवडणुकांनंतर सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या.काही ग्रामपंचायती मतदानापूर्वीच बिनविरोध निवडल्या गेल्या होत्या.काही गावात निवडणूक झाली होती. निवडणूक झालेल्या गावांत निवडून आलेल्यांपैकी आरक्षण कसे पडणार? याबाबत अनिश्‍चितता असल्याने जास्त जागा निवडून आणणारेही सुद्धा  गोंधळात सापडले आहेत, तर काही ठिकाणी काठावर बहुमत असले तरी सर्व आरक्षणाचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. याची खरी गंमत होणार आहे. तर काही ठिकाणी बहुमत एका गटाकडे आणि सरपंच मात्र विरोधी गटाचा, असेही विरोधी चित्र रंगणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुका या पक्षीय पातळीवर न लढता त्या स्थानिक पातळीवर आघाड्या करूनच लढविल्या गेल्या असल्या तरी निकालानंतर मात्र त्याला पक्षीय तसेच तालुका पातळीवरील गटाचे स्वरूप आले आहे. तालुका पातळीवरील नेतेमंडळी व त्यांची समर्थक मंडळी "आमच्याच जास्त ग्रामपंचायती आल्या' असे ढोल वाजवत सांगत आहेत. त्यामुळे मूळ निवडणुका झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या मात्र दुपटीने वाढली आहे. आता सरपंचपदाचे आरक्षण असल्याने हा वाद आणखीन वाढणार आहे. त्यामुळे आरक्षणानंतरही हे फोडाफोडीचे व वादविवादाचे राजकारण याचा खेळ रंगणार असून, त्यातून वादही होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे गावकारभाऱ्याच्या सत्तेसाठीच्या हालचाली गतिमान होणार आहेत.

तालुक्‍यातील सर्वच ग्रामपंचायतींच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या. आता आरक्षणानंतर सरपंचपदाची निवडही खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडले जावे व गावच्या विकासासाठी प्रयत्न करावा, अशी माफक अपेक्षा मतदार व ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे. एकूणच, या वेळेस बहुमतापेक्षा सरपंचपदाचे आरक्षणच पडणार "लय भारी' हेच खरे.

जीव टांगणीला !
निवडणुका म्हटले की, जय - पराजय आलाच. परंतु ग्रामपंचायत लढवणे म्हणजे खूपच कठीण काम आहे, याचा प्रत्यय भल्या-भल्यांना आला आहे. परंतु, 29 तारखेला आरक्षण सोडतीकडे सर्वांचे डोळे लागले आहेत. आरक्षण काय पडणार? कोणत्या गटाला सरपंचपदाची लॉटरी लागणार? या कोलाहलाने व नवीन गाव कारभारी कोण होणार? या विचाराने नवनिर्वाचित सदस्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. सरपंच निवडीनंतर मात्र तालुका पातळीवरील नेत्यांचे दावे-प्रतिदावेही खोटे ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

पाटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 234 

अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 20, महिला 10, खुला 10,

अनुसूचित जमाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, 

नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  63, महिला 32, खुला 31, 

सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 150, महिला 75, खुला 75, 

एकुण सरपंचांची  पदे 234 आहेत

गुरुवार, २८ जानेवारी, २०२१

*सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी बँकांनी कार्यरत रहावे* *- खासदार श्रीनिवास पाटील*

*सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी बँकांनी कार्यरत रहावे*
  *- खासदार श्रीनिवास पाटील*
सातारा दि.28 :  सर्व बँकांनी सामाजिक जबाबदारी समजून सर्व सामान्य व्यक्तीच्या विकासासाठी कार्यरत रहावे. तसेच पिक कर्जाचे वाटप 100 टक्के करावे, अशा सूचना खासदार श्रीनिवास पाटील यांनी दिल्या.
जिल्हा सल्लागार समितीची बैठक आज नियोजन भवनात झाली. यावेळी खासदार श्री. पाटील बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, महाराष्ट्र बँकेचे उपअंचल प्रबंधक श्रीकृष्ण झेले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे, यांच्यासह विविध बँकांचे व्यवस्थापक, प्रतिनिधी उपस्थित होते.
चालु वर्षासाठी 7 हजार 500 कोटीचा पतपुरवठा प्राथमिक क्षेत्रासाठी अग्रणी बँकेने तयार केला आहे. त्यापैकी राष्ट्रीयकृत, सहकारी तसेच खासगी बँकांद्वारे 5 हजार 571 कोटी रुपयांचा कर्जपुरवठा करण्यात आला आहे. सर्व बँकांनी आपले उद्दिष्ट 100 टकके पूर्ण करा, असेही खासदार श्रीनिवास पाटील यांनी या बैठकीत सांगितले.
खरीपासाठी 1 हजार 682 कोटी कर्ज वाटप केले असून उद्दिष्टाच्या 105 टक्के काम बँकांनी साध्य केले आहे, असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या बैठकीत सांगितले. 
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी राष्ट्रीय ग्रामीण जिवन उन्नती योजनेची माहिती देवून सर्व बँकांनी योजनेंतर्गत यावर्षी बचत गटांना उद्दिष्टानुसार वित्त पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

*उत्साहाचा खळखळता झरा: प्रा. पी. डी. पाटील.*निवृत्ती? छेजगण्याची नवी आवृत्ती!!!

*उत्साहाचा खळखळता झरा: प्रा. पी. डी. पाटील.*

निवृत्ती? छे
जगण्याची नवी आवृत्ती!!!
प्रत्येक माणसाला दोन प्रकारची वय असतात: एक शारीरिक वय व दुसरे मानसिक वय. असेच 25 वर्षे मानसिक वय असलेले प्राध्यापक पी. डी. पाटील सर शारीरिक वयाच्या 58 व्या वर्षी आपल्या दैदिप्यमान प्रदीर्घ सेवेतून 31 जानेवारी, 2021 रोजी निवृत्त होत आहेत.
    प्रा. पी. डी. पाटील सर यांच्याविषयी बोलावे तितके कमीच आहे. ते आणि मी, आम्ही एकाच वांग खोऱ्यातील. त्यांच्याविषयी प्रकट होण्याची मला संधी मिळाली याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. एखादी व्यक्ती किती वर्षे जगली यापेक्षा ती कशी जगली याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाटील सर म्हणजे एक अष्टपैलू, सदाबहार, निगर्वी, उत्तम संघटक, अजातशत्रू असं व्यक्तिमत्व आहे. नोकरी करण्याबरोबरच समाजाची बांधिलकी त्यांनी पहिल्यापासूनच जपलेली आहे.
      आपण ज्या मातीमध्ये जन्म घेतला त्या मातीसाठी आणि त्या मातीतील सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी केले पाहिजे या एकाच देहातून सरांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे.
   ज्याप्रमाणे दुधात साखर विरघळून गोडवा निर्माण होतो, त्याप्रमाणे काही माणसे आयुष्यात साखरेसारखी विरघळतात. पी. डी. पाटील सर म्हणजे एक उत्साहाचा खळखळता झरा.लोकांच्या सुखामध्ये नेहमीच वर्दळ असते पण प्रत्येकाच्या दुःखात  झटणारे व्यक्तीमत्व म्हणजे पी. डी. पाटील सर. समाजात दुःख देणार्‍यांची संख्या आज दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या दुःखरुपी वाळवंटात सापडलेला थंडगार झरा म्हणजे पी. डी. पाटील सर. सरांना मी सन 2004 पासून ओळखत आहे.पण या इतक्या वर्षात त्यांनी जाणीवपूर्वक मला कधीच दुःख दिले नाही. वरिष्ठपणाचा त्यांनी कधीही आव आणलेला नाही. फळ देणारे झाड नेहमी झुकलेले असते पण ते शोभून दिसते. त्यांच्या वागण्या-बोलण्यात नेहमीच नम्रता दिसून आली.महाविद्यालयात इतकी वर्षे नोकरी करूनही त्यांनी नवीन लोकांना जाणीवपूर्वक त्रास कधीच दिला नाही, उलट अडचणीच्या वेळी त्यांनी वेळोवेळी मदतच केली.ते प्रत्येक वेळी बोलायचे की आपण काम करत असताना पाठीमागे बोलणाऱ्यांची संख्या खूप असते पण आपण तिकडे कधीही लक्ष द्यायची नाही.उलट अधिक जोमाने काम करत राहायचे मग आपल्या कामातून त्यांना आपोआप उत्तर मिळत जाते. अडचणीच्या वेळी शांत डोक्याने कसे काम करावे हे त्यांच्याकडून खूप शिकावयास मिळाले. इतक्या वर्षात ते कधीही धीर-गंभीर झालेले पहावयास मिळाले नाही. त्यांनी कधीच दुसऱ्यांचे खच्चीकरण केले नाही उलट वेळोवेळी आम्हाला पुढे आणण्याचा प्रयत्न केला.
    संघटन कौशल्य कसे असावे हे त्यांच्याकडूनच शिकावे.प्रीतिसंगम हास्य क्लबच्या मदतीने त्यांनी समाजातील लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा खूप प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.वर्गातील तास असो, महाविद्यालयातील कोणताही कार्यक्रम असो, नाहीतर समाजातील काहीही कार्यक्रम असो, या विनोदवीराला तिथे खूप मागणी असते.महाविद्यालयातील सर्व कार्यक्रमात आम्हाला त्यांनी डोळ्यांच्या कडा ओल्या होईपर्यंत, गाल दुखेपर्यंत हसवून एक प्रकारे आमच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न केला आहे.
सहलीचे नियोजन कोणी करावे तर उत्तर मिळते पी. डी. पाटील सर. सहलीसाठी प्रथम खिशातून पैसे काढणारे तेच असतात. त्या सहलीचे उत्तम नियोजन कसे करावे हे त्यांच्याकडून खूप शिकायला मिळाले.मी त्यांच्याबरोबर अनेक वेळा सहलीला गेलो आहे त्यावेळी प्रत्येकाच्या तोंडात पी. डी., पी. डी. हेच शब्द असतात,म्हणजे ते किती लोकमान्य नेतृत्व आणि व्यक्तिमत्व आहे आपणास कळून येते.
     फिटनेसचा दर्जा काय असावा हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतरच समजते. आज आपल्यातून ते निवृत्त होत आहेत यावर आपला अजिबात विश्वास बसत नाही. त्यांना व्यायामाची आणि ट्रेकिंगची प्रचंड आवड आहे. महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वच गड त्यांनी सर केलेले आहेत.शरीर संपत्ती ही सर्वांगसुंदर संपत्ती असते, याची त्यांना पुरेपूर जाण आहे.
  "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ll
त्यांनी आपली सेवा इमानेइतबारे केली.क्रीडा क्षेत्राचे शिक्षक असल्याने त्यांनी अनेक राज्य व देश पातळीवर असे खेळाडू घडविले आहेत. आजही त्यांचे अनेक उच्च पदावरील विद्यार्थी त्यांची आठवण काढतात, यातूनच त्यांची शिक्षक म्हणून चांगली ओळख तयार होते. विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीच्या वेळीही त्यांनी वेळोवेळी मदत केली आहे.आपण समाजामध्ये निस्वार्थीपणे चांगले काम केले की  निसर्गाकडूनही परतफेड म्हणून आपल्याला चांगले फळ मिळते.सरांचे दोन्ही चिरंजीव चांगल्या पदावरती सध्या कार्यरत आहेत. पाटण तालुका कबड्डी असोसिएशन तसेच काकासाहेब चव्हाण महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटना यासारख्या अनेक संघटनांमध्ये सर सध्या कार्यरत आहेत.
  नाजूक पाकळ्या किती सुंदर असतात, रंगीत कळ्या रोजच उमलत असतात. नजरेत भरणारी सर्वच असतात पण हृदयात राहणारी माणसे तुमच्या सारखी माणसं फारच कमी असतात.अशा या सदाबहार प्रा. पी. डी.पाटील सरांना दीर्घायुष्य लाभो आणि उर्वरित त्यांचे आयुष्य उत्तरोत्तर बहरत जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना!!!!

 
शब्दाकंन ;  प्रा. सुरेश यादव.
शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड.

बुधवार, २७ जानेवारी, २०२१

तळमावले; आय फोन कंपनीचा चाळीस हजाराचा मोबाईल केला परत ; म्हणाले नाईकबा पावला

तळमावले; आय फोन कंपनीचा चाळीस हजाराचा मोबाईल केला परत ; म्हणाले नाईकबा पावला 

 तळमावले / प्रतिनिधी ; 

सध्याच्या जगात घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागेल याचा नेम राहिला नाही, असं म्हटलं जातं. त्यातच सार्वजनिक ठिकाणी अनेकदा चोरीच्या घटनाही समोर येत असतात. मात्र दै. लोकमतचे तळमावले येथील पत्रकार पोपटराव माने यांनी प्रामाणिकपणाचं अनोखं उदाहरण समाजासमोर घालून दिलं आहे. त्यांनी 40 हजार रुपये किंमतीचा आय फोन कंपनीचा मोबाईल प्रामाणिकपणे परत केला.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की दि.25 रोजी पत्रकार पोपटराव माने हे आपल्या वैयक्तिक कामासाठी कराडला जात होते ते तळमावले येथील सार्थक पेट्रोलियम करपेवाडी  येथे आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता त्यानां जमीनीवर मोबाईल सारखी दिसणारी वस्तू दिसली त्यांनी नीट लक्ष देऊन पाहिले तर आय फोन कंपनीचा मोबाईल होता.तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये चौकशी केली असता त्यापैकी कोणाचा मोबाईल नव्हता.मग त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी योगेश लाहीगडे,सुमित सुतार, आदित्य सकट, यांच्याकडे फोन देऊन ते आपल्या कामासाठी कराडला निघून गेले.ते कराडहुन परत आले असता त्यांनी चौकशी केली मोबाईल चे मालक रोहन शेलार फोन घेऊन जाण्यासाठी आले होते त्यावेळी रोहन शेलार यांनी सांगितले की आम्ही इचलकरंजीहुन बनपुरी येथील नाईकबा दर्शनासाठी आलो होतो दर्शन घेऊन परत घरी जाताना पेट्रोल पंपवर तेल भरण्यासाठी थांबलो त्यावेळी फोन पडला असावा.सदर फोन ची शहनिशा केल्यानंतर रोहन शेलार हेच मालक आहेत हे समजले त्यानंतर त्यांना फोन परत करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकार माने यांचे आभार मानले आणि म्हणले नाईकबा पावला 

 

पाटण ; रस्ता सुरक्षा अभियानाबाबत सामुहिक जनजागृती

पाटण ; रस्ता सुरक्षा अभियानाबाबत सामुहिक जनजागृती
तळमावले/वार्ताहर
रस्ता सुरक्षा अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले जाणार आहे. त्या अनुषंगाने पाटण पोलीस ठाणे पाटण व दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रे.सोसा.लि; व शिवसमर्थ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांना माहिती देण्यात आली. कराड-चिपळूण रोड वरील मल्हारपेठ बाजारपेठेच्या आवारात या माहितीपूर्ण फलकाचे अनावरण करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानात पाटण पोलीस आणि शिवसमर्थ यांच्यावतीने सामुहिक जनजागृती करण्यात आली आहे.
यावेळी पाटण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक एन.आर.चैखंडे, मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, बाजीराव पवार, संदीप डाकवे, हणमंत बोत्रे, मल्हारपेठ पोलीस ठाणे येथील कर्मचारी वर्ग, शिवसमर्थ  पतसंस्था शाखेचे कर्मचारी, अधिकारी, मल्हारपेठ बाजारपेठेतील व्यापारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी रस्ता सडक सुरक्षा, जीवन रक्षा, सुरक्षित अंतर सुरक्षित प्रवास अशा माहितीपूर्ण आशयाचे फलकाचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रस्त्यावरील रिक्षा व इतर वाहने यांना रिप्लेक्टरसाठी रेडीयम लावण्यात आले. तसेच उपस्थितांना शिवसमर्थ च्या वतीने मास्कचे वाटप देखील करण्यात आले.
पेलीस निरीक्षक एन.आर.चैखंडे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान आठवडा किंवा महिन्याभरापुरते न राहता ते वर्षभर पाळावे असेही आवाहन केले. सामाजिक बांधिलकी ठेवून शिवसमर्थ राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक चैखंडे यांनी केले.

मंगळवार, २६ जानेवारी, २०२१

महिलांनी प्रगतीची कास धरून गाव विकासात पुढाकार घ्यावा - सरपंच विद्याताई मोरे

महिलांनी प्रगतीची कास धरून गाव विकासात पुढाकार घ्यावा - सरपंच विद्याताई मोरे
कुंभारगाव ता.पाटण : देश व राज्यावर कोरोनाची आपत्ती ओढावली होती. या आपत्तीच्या काळातही महिलांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आपण कोरोनाच्या लढ्यात यशस्वी ठरलो आहे. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के आरक्षणाच्या व्यतिरिक्तही अनेक महिला निवडूण आल्या आहेत. महिलांनी प्रगतीची कास धरून गाव विकासात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सौ.विद्याताई सुभाष मोरे (सरपंच शेंडेवाडी) यांनी कुंभारगाव  येथे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभात केले.
कुंभारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतिच्या निवडणूकित कुंभारगावत  सत्तातर झाले मा.मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक योगेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीने 11 जागा पैकी 7 जागा जिंकून सत्ता काबीज केली निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य श्री. राजेंद्र चव्हाण,श्री. हनुमंत कांबळे,श्री.धनाजी बोरगे सदस्या सौ.सारिका पाटणकर,सौ.शीतल बुरशे,सौ.वैशाली गुरव,सौ. विमल शिबे यांच्या समवेत सौ.मनीषा मोरे  श्री.राजेंद्र माने,श्री.अनिल गायकवाड, श्री.राजेंद्र देसाई, श्री.प्रदीप देसाई,श्री.अजित डांगे,श्री.जयवंत पाटील,श्री संजय गुरव,श्री.स्वप्नील माने उपस्थित होते.

सोमवार, २५ जानेवारी, २०२१

अर्थसंकल्प ; कोणत्या वस्तूंची कस्टम ड्यूटी घटण्याची शक्यता?

अर्थसंकल्प ; कोणत्या वस्तूंची कस्टम ड्यूटी घटण्याची शक्यता?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून पुढील आठवड्यात सादर केल्या जाणाऱ्या अर्थसंकल्पात अनेक वस्तूंवरील सीमा शुल्क म्हणजे कस्टम ड्यूटी घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यात फर्निचरचा कच्चा माल, तांब्याचं भंगार, काही रासायनिक द्रव्य, टेलीकॉम उपकरणं आणि रबरच्या उत्पादनांचा समावेश आहे. तसंच PTI च्या वृत्तानुसार पॉलिश केलेले हिरेस रबराचं सामान. चमड्याचे कपडे, दूरसंचार उपकरण आणि गालिचा अशा 20 प्रॉडक्ट्सच्या आयात शुल्कातही कपात केली जाऊ शकते.(Customs duties on many items are likely to be reduced in the Union Budget)

कोणत्या वस्तूंची कस्टम ड्यूटी घटण्याची शक्यता?

फर्निचरसाठी वापरलं जाणारं काही लाकूड आणि हार्डबोर्ड अशा वस्तूं सीमा शुल्कातून मुक्त केल्या जाऊ शकतात. तर मिळालेल्या माहितीनुसार आपल्या देशातून फर्निचरची निर्यात खूप कमी होते. तर चीन आणि व्हिएतनाम हे फर्निचरचे प्रमुख निर्यातदार देश आहेत. सरकार डांबर आणि तांब्यांच्या भंगारावरील सीमा शुल्कही कमी करण्याचा विचार करु शकतं. सरकारने स्वदेशी पुनर्निमाणाला चालना देण्यासाठी पावलं उचलली आहेत. एअर कंडीशनर आणि एलईडी लाईटसह अनेक क्षेत्रासाठी उत्पादन आधारित पुनर्निमाण योजना सुरु करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर वर उल्लेख केलेल्या वस्तूंवरील सीमा शुल्क कमी केल्यास आत्मनिर्भर भारत अभियानाला चालना मिळेल आणि स्वदेशी वस्तूंच्या निर्मितीत तेजी येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सातारा ; जिल्ह्यातील शाळांना 5 वी ते 8 वी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी जिल्हादंडाधिकारी यांनी केले आदेश जारी

सातारा ; जिल्ह्यातील शाळांना 5 वी ते  8 वी  चे वर्ग  सुरु करण्यास परवानगी
जिल्हादंडाधिकारी यांनी केले आदेश जारी 
 सातारा दि. 25 : उप सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग सूचनेनुसार  27 जानेवारी 2021 पासून राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता 5 वा ते 8 वी चे वर्ग सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. 
 या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील  तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारानुसार सातारा जिल्ह्यात  27 जानेवारी पासून इयत्ता 5 वी ते इयत्ता 8 वी चे वर्ग  शासनाच्या दि. 15.6.2020 व दि. 10.11.2020 च्या परिपत्रकान्वये निर्गमित  करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी दिली आहे.
   परिपत्रकातील मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास त्यांचेविरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनिय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमूद केले आहे.
 

अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा - तहसिलदार आशा होळकर

अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा - तहसिलदार आशा होळकर
  सातारा दि. 25 : कुळ कायद्याच्या जमिनीच्या खरेदी - विक्रीवर बंदी असतानाही अवैधरित्या कुळकायद्याच्या जमिनीचे व्यवहार करुन जमिनी विकल्याचे सातारा तालुक्यात प्रकार घडले आहेत. तहसिलदार कार्यालयाने केलेल्या पाहणीमध्ये अशी 56 प्रकरणे आढळून आली असून पैकी 2 प्रकरणांध्यम दंड भरुन घेण्यात आला व 10 प्रकरणांमध्ये दंड भरण्याबाबत अंतिम स्मरणपत्र देण्यात आले आहे. दंड न भरल्यास संबंधितांच्या जमिनी सरकार जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. एकूण शिल्लक 44 प्रकरणात सुनावणी सुरु असल्याची माहिती तहसिलदार श्रीमती आशा होळकर यांनी दिली. 
 कुळकायद्याच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र तरीही जमिन खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याचे सातारा तालक्यात निदर्शनास आले आहे. मात्र असे व्यवहार झाले असतील तर सरकारला बाजारभावाच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावयाची असते त्यानंतर जमिनीबाबत झालेला खरेदी-विक्री व्यवहार नियमित होते. मात्र अनेक वर्षापासून कुळकायद्याच्या जमिनीची खरेदी-विक्री  व्यवहार झाले आहेत. अनेकांनी त्याचा सरकारी दंड भरलेला नाही. तालुक्यात आत्तापर्यंत असे 54 व्यवहार समोर आले असून 2 जणांनी रु. 3 लाख 43 हजार 150 इतकी दंडाची रक्कम भरलेली आहे. उर्वरित अनेकांनी अजूनही दंड भरलेला नाही . त्यामुळे त्यांच्या जमिनी सरकार जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही श्रीमती होळकर यांनी सांगितले. 

तळमावले : ‘स्पंदन’ दिनदर्शिकेने ‘ईशिता’ला दिला मदतीचा हात

तळमावले : ‘स्पंदन’ दिनदर्शिकेने ‘ईशिता’ला दिला मदतीचा हात
फोटो कॅप्शन: मुलीची आजी तारुबाई पाचुपते यांचेकडे रोख रक्कम देताना डाॅ.संदीप डाकवे, सोबत पुंडलिक पाचुपते, सत्यम पाचुपते, पुष्पा पाचुपते, रोहित पाचुपते

तळमावले/वार्ताहर
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी संस्था, ट्रस्ट, सामाजिक कार्यकर्ते असे दिनदर्शिका काढतात. अशीच दिनदर्शिका पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देखील तयार केली आहे. मात्र या दिनदर्शिकेसाठी मिळालेल्या जाहिरात मुल्यातून सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करण्यात आले आहे. पाचुपतेवाडी (गुढे) येथील कु.ईशिता अमोल पाचुपते या चिमुरडीच्या शस्त्रक्रियेसाठी पाच हजार रुपये रोख स्वरुपात दिनदर्शिकेला मिळालेल्या जाहिरात मुल्यातून देण्यात आले आहेत. सदर रक्कम मुलीची आजी तारुबाई पाचुपते यांचेकडे सुपुर्द करण्यात आली. यावेळी सत्यम पाचुपते, रोहित पाचुपते, पुंडलीक पाचुपते, पुष्पा पाचुपते व अन्य उपस्थित होते. ईशिताच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन ही यावेळी ट्रस्टच्या माध्यमातून करयात आले आहे.
ग्लेझ आर्ट पेपरवर बहुरंगी छपाई केलेल्या दिनदिर्शिकेत  विभागातील यात्रा, उत्सव, महापुरुषांच्या जयंती, दिनविशेष इ.ची माहिती दिली आहे.यामुळे लोकांना आपल्या कामाचे अचूक नियोजन करता येवू शकते. विभागातील नवोदित व्यावसायिक, उद्योजक, मित्र परिवार यांच्या जाहिराती माफक दरात छापल्या आहेत. केवळ सोशल मिडीयावरुन केलेल्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे सदर दिनदर्शिका प्रकाशित करता आली आहे. विशेष म्हणजे दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर व्यसनमुक्तीचा लोगो छापून आपले वेगळेपण जपले आहे.
या जाहिरातीचे प्रकाशन ऊसतोड कामगारांच्या हस्ते ऊसाच्या फडात शिवारामध्ये करुन कामगारांना मान देण्याच्या वेगळी संकल्पना ट्रस्टने यावर्षी राबवली होती. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रत्येक उपक्रमातून समाजासाठी काही तरी करता यावे हा उद्देश असल्याचे मत संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले आहे.
यापूर्वी ट्रस्ट च्या माध्यमातून नाम फाऊंडेशनला 35 हजार, केरळ पुरग्रस्तांना 21 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना 5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला 5 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी 4 हजार, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 ला 3 हजार, भारत के वीर या खात्यात 1 हजार जमा केले आहेत. विशेष म्हणजे ट्रस्टने हे सर्व उपक्रम लोकसहभागातून राबवले आहेत.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला नावीण्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ. रेश्मा डाकवे व इतर पदाधिकारी यांचे विशेष मार्गदर्शन लाभते.

: मान्यवर व सेलिब्रिटींकडून दिनदर्शिकेचे कौतुक:
गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई, सामाजिक कार्यकत्र्या सुनिती सु.र., सपोनि संतोष पवार, सुप्रसिध्द गायिका कविता राम, अमेय हिंदळेकर, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, श्रीनिवास वाळवेकर या मान्यवरांसह फुलाला सुगंध मातीचा, तुझ्या इश्काचा नाद खुळा, श्रीमंतघरची सुन, सांग तू आहेस ना?, लाडाची लेक ग मी, दख्खनचा राजा-जोतिबा या मालिकांच्या सेटवरील सेलिब्रिटींनी स्पंदन दिनदर्शिकेचे व ट्रस्ट सामाजिक उपक्रमांचे कौतुक केेले आहे.


शुक्रवार, २२ जानेवारी, २०२१

वेदनेतून काव्य जन्माला येते - सुनिती सु.र.

वेदनेतून काव्य जन्माला येते - सुनिती सु.र.

तळमावले/वार्ताहर
कोणतेही काव्य हे अनुभवातून जन्माला येते, वेदनेतून जन्माला येते. ‘साठवण’ या कवितासंग्रहाला सुख दुःखाची झालर आहे असे प्रतिपादन जन आंदोलनाच्या राष्ट्रीय  समन्वयक सुनिती सु.र. यांनी केले. त्या कवि प्रदिप पाटील यांच्या ‘साठवण’ या कवितासंग्रहाच्या प्रकाशनप्रसंगी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर पं.स.सदस्या सीमाताई मोरे, कुसुमताई करपे, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, कवी प्रदीप पाटील, कवी उध्दव पाटील, कवी व लेखक अनिल म्हमाणे, लक्ष्मण पाटील, कार्यकारी  अभियंता सुरेान हिरे, सहाय्यक अभियंता रोहिणी चव्हाण व अन्य मान्यवर उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला होता. काकासाहेब चव्हाण काॅलेज तळमावले आणि प्रयास प्रकाशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशनाचा हा समारंभ आयोजित केला होता.
वांग मराठवाडीच्या धरणामुळे मी 20 वर्षे येथील लोकांची सुख दुःखे अनुभवत आहे. आपल्याला आपला गाव सोडून जावे लागते त्यावेळी काय अवस्था होते ही मी अनुभवली आहे. कवी प्रदीप पाटील यांचा कवितासंग्रह हा याचेच प्रतिनिधीत्व करतो असेही सुनिती सु.र. पुढे बोलताना म्हणाल्या.
अनिल म्हमाणे म्हणाले की, साठवण हा कवितासंग्रह लढण्याची नेहमी आठवण करुन देत राहील. सदर कविता संग्रह हा साहित्य प्रवाहाच्या विरुध्द आहे. ऋणानुबंधांना बोलते करण्याचे काम या पुस्तकाने केले आहे.
याप्रसंगी कवी प्रदीप पाटील, सीमा मोरे, कुसुमताई करपे, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात रोपटयाला पाणी
घालून करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत पुस्तक आणि साठवण काव्यसंग्रहाची प्रतिमा असलेले सन्मानचिन्ह देवून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जी.एन.पोटे यांनी केले. सुत्रसंचालन डाॅ.संदीप डाकवे तर आभारप्रदर्शन अॅड.अधिक चाळके यांनी केले.
कार्यक्रमास मेंढ गावातील बहुतांशी लोक उपस्थित होते. कार्यक्रमावेळी अनेकांना धरणाच्या, आपल्या गावच्या आठवणीने भरुन आले. कवी प्रदीप पाटील व सुनिती सु.र. यांचा कंठ देखील दाटून आला होता. प्रकाशनाच्या कार्यक्रमात भावनिकता आल्याने या कार्यक्रमाने एक वेगळी उंची गाठली होती. महाविद्यालयीन मुले यांनी देखील या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

गुरुवार, २१ जानेवारी, २०२१

*सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट*

*सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट* 
सातारा दि. 21  :  सन 2020 ते 2025 या कालावधीतील सरपंच पदांचा आरक्षणाचा कालावधी दि. 1 एप्रिल 2020 ते दि. मार्च 2025 असा  राहिल . सातारा जिल्ह्यातील बिगरअनुसूचित  क्षेत्रातील ग्रामपंचायतीच्या सरपंच  आरक्षणाची प्रवर्ग निहाय व जिल्हा निहाय संख्या  निश्चित करण्यात आलेली असून मुंबई  ग्रामपंचायत  ( सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 मधील नियम 2 अ मधील पोट नियम (3) (अ)(ब) व 4 अन्वेय प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराद्वारे  जिल्हाधिकारी, सातारा  यांच्याकडून , याद्वारे सोबत जोडलेल्या अनुसूची मध्ये दर्शविलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग आणि महिला (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्ग यातील महिलासह ) यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट करण्यात येत आहेत.

पाटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 234* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 20, महिला 10, खुला 10, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  63, महिला 32, खुला 31, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 150, महिला 75, खुला 75, एकुण सरपंचांची  पदे 234 आहेत

*कराड तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 200* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 25, महिला 13, खुला 12, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1, महिला 0, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  54, महिला 27, खुला 27, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 120, महिला 60, खुला 60, एकुण सरपंचांची  पदे 200 आहेत.

*सातारा तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 196* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण  21  महिला 11, खुला 10 अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1, सोडती द्वारे 1 पद निश्चित करणे नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  53, महिला 27, खुला 26,सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 121, महिला61, खुला 60, एकुण सरपंचांची  पदे 196  आहेत.
*कोरेगांव तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 142* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 13, महिला 7, खुला 6, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1 महिला 1, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  38, महिला 19, खुला 19, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 90, महिला 45, खुला 45, एकुण सरपंचांची  पदे 142 आहेत.
*जावली तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 125*अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 9, महिला 5, खुला 4, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 2, महिला 1, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  34, महिला 17, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 80, महिला 40, खुला 40, एकुण सरपंचांची  पदे 125 आहेत.
*वाई  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 99* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 9, महिला 5, खुला 4, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 2, महिला 1, खुला 1, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  27, महिला 14,, खुला 13, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 61, महिला 31, खुला 30, एकुण सरपंचांची  पदे 99 आहेत
*महाबळेश्वर  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 77*अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 7, महिला 4, खुला 3, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 5, महिला 3, खुला 2, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  21, महिला 11,, खुला 10, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 44, महिला 22, खुला 22, एकुण सरपंचांची  पदे 77आहेत
*खंडाळा  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 63* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 6, महिला 3, खुला 3, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  17, महिला 9, खुला 8, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 40, महिला 20, खुला 20, एकुण सरपंचांची  पदे 63 आहेत
*फलटण तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 131* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 1, महिला 10, खुला 9, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 1,  सोडती द्वारे 1 पद निश्चित करणे. नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  35, महिला 18, खुला 17, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 76, महिला 38, खुला 38, एकुण सरपंचांची  पदे 131 आहेत
*माण  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 95 *अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 12, महिला 6, खुला 6, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  26, महिला 13, खुला 13, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 57, महिला 29, खुला 28, एकुण सरपंचांची  पदे 95 आहेत
*खटाव  तालुक्यातील एकुण ग्रामपंचायतींची संख्या 133* अनुसूचित जाती सरपंचांची पदे एकूण 13, महिला 7, खुला 6, अनुसूचित जमाती   सरपंचांची  पदे एकूण 0, महिला 0, खुला 0, नागरीकांचा मागास प्रवर्ग सरपंचांची  पदे एकूण  36, महिला 18, खुला 18, सर्वसाधारण प्रवर्ग  सरपंचांची  पदे एकुण 84, महिला 42, खुला 42, एकुण सरपंचांची  पदे 133आहेत.
 यांच्यासाठी सातारा जिल्ह्यातील एकूण 1495 ग्रामपंचायतीमधील सरपंच पदे विनिर्दिष्ट करीत आहे. असे जिल्हाधिकारी, शेखर सिंह यांनी कळविले आहे.

आरक्षणाची संख्या जाहीर झाल्यानंतर आता तहसीलदार तालुका पातळीवर ग्रामपंचायतीनुसार लोकसंख्येच्या आधारावर उतरत्या क्रमाने सरपंचपदाची सोडत प्रक्रिया राबविणार आहेत. ग्रामविकास विभागाने जाहीर केलेल्या नियोजनानुसार आता केवळ तालुक्यातील एकूण प्रवर्गानुसार सरपंचपदे आरक्षित करण्यात आलेली आहेत. ग्रामपंचायत नुसार आरक्षणाचे नियोजन तहसीलदार पातळीवर केले जाणार आहे.
सरपंचपदाची कार्यवाही गेल्या डिसेंबरमध्येच केली जाणार होती. परंतु या प्रक्रियेला स्थगिती दिल्यामुळे २१ जानेवारी नंतर म्हणजेच ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनंतर आरक्षणाची प्रक्रिया राबविली जावी असे निर्देश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. त्यामुळे येत्या २८ तारखेला तालुका पातळीवर त्या-त्या ग्रामपंचायत निहाय आरक्षण पडणार आहे.

                                                                     

*दहावी-बारावीची परीक्षेची तारीख ठरली वाचा सविस्तर*

*दहावी-बारावीची परीक्षेची तारीख ठरली वाचा सविस्तर*

मुंबई दि.21 : कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीची लेखी परीक्षआ येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे.
तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते.

सातारा ; हिंगणी व बिदाल मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू रिपोर्टही निगेटिव्ह

हिंगणी व बिदाल मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू रिपोर्टही  निगेटिव्ह 
सातारा दि.21 : माण तालुक्यातील हिंगणी व बिदाल येथील कोंबड्या  दगावल्या होत्या. दगावलेल्या कोंबड्याचे नमुने  तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोग शाळेत  पाठविण्यात आले होते. याचे बर्ड फ्लूचे रिपोर्ट  निगेटिव्ह आले आहेत. तरी नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी केले आहे.
 यापुर्वी कराड तालुक्यातील मौजे हणबरवाडी येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्या होत्या. ते रिपोर्टही  निगेटिव्ह आले होते. 

सरपंचपदाचे आरक्षण इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात ; काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पॅनलप्रमुखांची वाढली डोकेदुखी .

सरपंचपदाचे आरक्षण  इच्छुकांनी देव ठेवले पाण्यात ; काठावर बहुमत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये पॅनलप्रमुखांची वाढली डोकेदुखी .


सातारा दि.२१ सरपंचपदाचे आरक्षण आपल्याच पारड्यात पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. तर, गावात कोण होणार 'किंगमेकर' या चर्चेला उधाण आले आहे.

सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत ८७८ सरपंच निवडले जाणार आहेत. जिल्हाधिकारी थोड्याच दिवसांत आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करतील. त्याआधी प्रत्येक तालुक्याला आरक्षणाचा कोटा कळीवण्यात येणार आहे.

आरक्षण सोडतीसाठी नवनिर्वाचित सदस्य तसेच पॅनलप्रमुखांची उपस्थिती असणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला, नागरिकांचा इतर मागास प्रवर्ग यांच्यासाठी राखीव असलेले आरक्षण या सोडतीत काढले जाणार आहे.

तालुक्यातील तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात ही आरक्षण सोडत होणार आहे.

महिलांसाठी ५० टक्के आरक्षण राहणार आहे. तसेच इतर प्रवर्गांसाठी शासनाने जाहीर केलेल्या आरक्षणाच्या तरतुदीनुसार ही सोडत घेतली जाणार आहे. प्रत्येक गावात आरक्षण सोडतीबाबत उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. 

ज्या ठिकाणी काठावरचे बहुमत आहे अथवा आरक्षित जागा एकच निवडून आलेली आहे, त्याच्याशी पॅनलप्रमुख संधान साधून आहेत. आरक्षण जाहीर झाल्यानंतर निवडून आलेल्या उमेदवारांची पळवापळवी मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.अनेक ठिकाणी काठावर बहुमत प्राप्त झालेल्या ग्रामपंचायतींच्या पॅनलप्रमुखांची चांगलीच पंचाईत झाली आहे.पॅनल सत्तेत आणण्यासाठी सदस्यांना बांधून ठेवण्याची डोकेदुखी त्यांच्या पाठीमागे लागल्याने त्यांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. त्यात सरपंच पदाचे आरक्षण काय निघेल, याकडेही त्यांच्या नजरा लागल्या असून, आरक्षणानानुसार आतापासूनच आकडेमोड सुरू झाली आहे. काही सदस्य फुटण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांना मंदिरासमोर नेऊन देवाच्या शपथा दिल्या जात आहेत.

बुधवार, २० जानेवारी, २०२१

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

ग्रामपंचायत निवडणुकीतील उमेदवारांना ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्चाचा हिशेब सादर करण्याची सुविधा

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई, दि. 20  : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मतदार, उमेदवार, राजकीय पक्ष, निवडणूक यंत्रणा आदींसाठी उपयुक्त असलेल्या ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे ग्रामपंचायतींच्या निवडणुका लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

श्री. मदान यांनी सांगितले की, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ नुसार निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांना निवडणुकीच्या निकालानंतर ३० दिवसांच्या आत एकूण खर्चाचा हिशेब सादर करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत आणि पद्धतीने खर्च सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र घोषित करण्यात येते.त्यादृष्टीने उमेदवारांच्या सोयीसाठी राज्य ‍निवडणूक आयोगाने ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’द्वारे खर्च सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ही सुविधा ऐच्छिक स्वरूपाची आहे ; परंतु याद्वारे किंवा पारंपरिक पद्धतीने विहित मुदतीत खर्च सादर करणे बंधनकारक आहे.

निवडणूक खर्च सादर करण्याच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका याचिकेवर निकाल देताना केली होती. त्यादृष्टीने ‘ट्रू व्होटर मोबाईल ॲप’ उपयुक्त ठरत आहे. त्याचा वापर 2017 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून मोठ्या प्रमाणावर करण्यात येत आहे. यात निवडणूक खर्चाचा हिशेब सादर करण्याबरोबरच मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्राचे ठिकाण शोधणे, उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रातीला माहिती जाणून घेणे आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. निवडणुकांशी संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी मतदार यादी बनविणे, मतदान केंद्रांचा नकाशा तयार करणे, महत्वाचे अहवाल सादर करणे, मतदानाची आकडेवारी देणे आदी सुविधा आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका लढविलेल्या 80 हजार उमेदवारांनीदेखील हे ॲप डाऊनलोड केले आहे, असेही श्री. मदान यांनी सांगितले.

स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह मोठ्या उत्साहाने संपन्न
तळमावले प्रतिनिधी
तळमावले दि.19 (ता.पाटण) काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले येथे दि. १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये या "स्वामीं विवेकानंद सप्ताह"चे आयोजन करण्यात आले होते.
सदर  सप्ताह अंतर्गत १२ जानेवारीला सप्ताहाचा शुभारंभ ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो निरीक्षक श्री.संतोष पवार साहेब  यांच्या शुभहस्ते  करण्यात आला.
१३ जाने २०२१ विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.याावेळी प्रमुख पाहुण्या सौ.शोभाताई भुलूगडे सरपंच ताईगडेवाडी ग्रामपंचायत उपस्थित होत्या.

दि.१४ जाने २०२१ रोजी समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथप्रदर्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मा. यशवंत पाटील (सामाजिक कार्यकर्ते ,तळमावले) व मा.संजय लोहार (अध्यक्ष वांगव्हॅली पत्रकार संघ ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दि १५ जाने २०२१ रोजी विद्यार्थ्यांचे  निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
दि.१६ जाने २०२१ रोजी "दुर्गसंवर्धन" या विषयावर शिव व्याख्याते मनोहर यादव सर यांचे व्याख्यान झाले .
दि.१८ जाने २०२१ प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर ) यांचा जन्मदिवस ज्ञानशिदोरी दिन व विवेकदिप ग्रंथाचे वाचन करण्यात आले.
दि १९ जाने २०२१ रोजी प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबीराचा शुभारंभ मा.कुसुमताई करपे (आदर्श महाराष्ट्र राज्य  कृषीभूषण
 पुरस्कार प्राप्त ) यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर प्रयास प्रकाशन व काकासाहेब चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवि प्रदिप पाटील यांचा "साठवण" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा सुनिती सु.र (जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक ) यांच्या शुभहस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गाडे सर  होते या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रा.भास्कर पाटील, प्रा.सौ.मिनाक्षी पाटील,प्रा.विक्रांत सुपूगडे, प्रा. महेश चव्हाण, प्रा.सचिन पुजारी , प्रा.सौ.मनिषा शिंदे यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने संपन्न झाला


 








कुठरे ; पवारवाडी ग्रामपंचायतीत श्रीराम पॅनेलची एकहाती सत्ता

कुठरे ; पवारवाडी ग्रामपंचायतीत श्रीराम पॅनेलची एकहाती सत्ता 
कुठरे / प्रतिनिधी
ग्रामपंचायत पवारवाडी (कुठरे) ता.पाटण निवडणूकीत श्री राम पॅनल पवारवाडी यांनी 7-0 नी विजयी आघाडी घेत एकहाती सत्ता मिळवली आहे.
एकूण 7 जागा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये 5 जागा बिनविरोध निवडणूक आल्या होत्या तर 2 जगासाठी निवडणूक झाली यामध्ये श्रीराम पॅनेलचे 2 उमेदवार आणि 2 अपक्ष 2 उमेदवार अशी थेट अटीतटीची  लढत झाली यामध्ये श्रीराम पॅनेल चे दोन्ही उमेदवार विजयी झाले.यामध्ये हनुमान वॉर्ड मधून सौ.भाग्यश्री विजय लोहार 195 मतांनी निवडून आल्या तर विरोधी उमेदवारला फक्त 51 मते मिळाली आणि श्रीराम वॉर्ड मधून श्री.महेश संपतराव लोहार 119 मतांनी निवडून आले आणि विरोधी उमेदवाराला फक्त 61 मते मिळाली यामुळे दोन्ही पराभूत उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली.

बिनविरोध निवड झालेले उमेदवार
श्री.अंकुश पाटील,सौ.रुपाली पवार,सौ.माधवी जगदीश कदम,श्री.दत्तप्रसाद कदम,सौ.कोमल कदम.
सर्व विजयी सदस्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला.
सर्व विजयी उमेदवारांचे पवारवाडी व मुंबई ग्रामस्थ यांच्यावतीने हार्दिक अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  श्रीराम पॅनेलचे नेतृत्व करणारे मा.अविनाश पवार ,राजू पवार सर,रमेश पवार सर,अधिक लोहार ,शिवाजी कदम तानाजी लोहार ,हेमंत कदम ,शामराव कदम(साहेब) संभाजी कदम सर ,रामचंद्र कदम(नाना),हरीश पवार , लालासाहेब चव्हाण सर ,विकास पवार ,वसंत मुंढेकर,मंगेश कदम,सचिन कदम,आनंदा कदम गुरुजी ,लक्ष्मण लोहार,अशोक पवार, शंकर पवार (दादा) विलास पवार ,दिलीप पवार सर्व ग्रामस्थ पवारवाडी, मुंबई तसेच युवा कार्यकर्ते मोरया ग्रुप,सार्व.गणेश मंडळ,ललकार गणेश मंडळ नेहरू युवा मंडळ, शिव स्वराज्य प्रतिष्ठान सर्व बचत गट, महिला मंडळ ,वरिष्ठ नागरिक या सर्वांनी मोलाचे योगदान देऊन पॅनल मधील सर्व सदस्यांना मार्गदर्शन करून निवडून आणले सर्वांचे श्री अविनाश पवार (दादा) यांनी आभार मानले.

पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीचे विजयी उमेदवार

पिंपळगाव रोठा : तानाजी मुळे, सुषमा घुले, मनीषा सुपेकर, महादेव पुंडे, सुरेखा वाळूज, मनीषा पुंडे, अमोल घुले, स्वप्निल जगताप, स्मिता घोडके.

कजुर्ले हर्या : साहेबराव वाफारे, सुनीता मुळे, जनाबाई आंधळे, भाऊसाहेब शिर्के, पंढरीनाथ उंडे, शांताबाई बर्डे, लहू धुळे, झुंबरबाई आंधळे, मिनीनाथ शिर्के, दुर्गा आंधळे, संजीवनी आंधळे.

कळस : निवृत्ती गाडगे, सविता गाडगे, दत्तात्रय गाडगे, विजया काणे, सविता गलांडे, भाऊसाहेब गाडगे, वैशाली येवले, राहुल येवले.

पाडळी दर्या : विजय खोसे, अर्चना खोसे, वैशाली जाधव, रामदास खोसे, सुरेखा खोसे, लता खोसे, मारुती खोसे.

जाधववाडी : योगिता राऊत, पुष्पा राऊत, राणी सोमवंशी, विठ्ठल जाधव, वैभव जाधव, उषा जाधव.

शेरी कासारे : सचिन मुळे, स्वाती मुळे, सुदाम मुळे, मनीषा वाघुले, वसंत पोखरकर, नंदा जाधव.

पठारवाडी : ऊर्मिला सुपेकर, मारुती पठारे, श्रद्धा पवार, भिका पठारे, दौलत सुपेकर, नंदा पवार, शंकर पठारे, सुरेखा पठारे, शारदा बोरगे.

कुरुंद : चेतन उबाळे, कैलास कोठावळे, शोभा खेमनर, अनिल कर्डीले, सुरेखा थोरात, कल्पना भोसले, गणेश मध्ये, प्रमिला शेंडगे, नंदा कारखिले.

हंगा : नीता रासकर, वनिता शिंदे, राजेंद्र दळवी, सविता नगरे, रूपाली दळवी, जगदीश साठे, सुलोचना लोंढे, राजेंद्र शिंदे, माया साळवे, मेघा नगरे, बाळू दळवी.

मालकूप : राहुल घागळे, सुभाष गांगुर्डे, रूपाली शिंदे, जयश्री शिंदे, संजय काळे, रेश्मा ठाणगे.

काळकूप : संगीता शिंदे, कमल अडसूळ, संदीप कदम, किसन शिंदे, किरण अडसूळ, महेंद्र सालके, रंजना खरमाळे, राजू कदम, ताराबाई कदम.

पानोली : प्रशांत साळवे, शिवाजी शिंदे, सुजाता गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अनुसूया खामकर, मंगल जाधव, संदीप गाडेकर, मोहिनी भगत, बायसा काळोखे.

वडुले : संतोष गट, स्वाती निमोनकर, आशा भापकर, सुषमा कंद, शहाजी खामकर, आरती सोनवणे.

तिखोल : रोहिणी ठाणगे, रजिया इनामदार, भाऊसाहेब ठाणगे, उज्ज्वला ठाणगे, रेखा ठाणगे, राजू ठाणगे, शैला ठाणगे, योगिता कावरे, अनिल तांबडे.

पिंपरी पठार : मनीषा भोर, शीतल पागिरे, अनिल शिंदे, युवराज शिंदे, अर्चना तिकोने, वसंत शिंदे, आनंदाबाई शिंदे.

वेसदरे : बाळू रोकडे, संगीता जाधव, मंदाबाई ताठे, दीपक पडळकर, अनिल तिकोने, कविता तिकोने.

कासारे : शिवाजी निमसे, शैला धनवट, धोंडिभाऊ खरात, कमल दातीर, शंकर कासुटे.


सारोळा आडवाई : परशराम फंड, संगीता फंड, बाबाजी महांडुळे, कुंदा आबुज, दत्ता शिंदे, पूजा महांडुळे, कोमल महांडुळे.

म्हसोबा झाप : प्रकाश गाजरे, संगीता जाधव, सखूबाई हांडे, दादाभाऊ पवार, राणी वाळुंज, योगिता आहेर, गोविंद आंग्रे, पद्माबाई दुधवडे.

लोणी हवेली : अशोक कोल्हे, शिवाजी थोरे, सीमा कोल्हे, अमोल दुधाडे, संजीवनी दुधाडे, जान्हवी दुधाडे, शत्रुघ्न नवघणे, कोमल सोंडकर, सुषमा दुधाडे.

दरोडी : मंगल बेलोटे, गुलनाज मुजावर, शरद कड, सुमन पावडे, अनिल पावडे, बाबाजी चौगुले, जयश्री चौगुले, शिवाजी पावडे.

धोत्रे बुद्रुक : रोशनी रोडे, जालिंदर भांड, नीलम भांड, अश्विनी गांगुर्डे, योगिता राहीज, बाबासाहेब सासवडे, योगिता कसबे, परुबाई भांड, मच्छिद्र भांड.

ढोकी : बाबासाहेब धरम, संतोष धरम, ज्योती नऱ्हे, शिंधूबाई पवार, चंद्रभागा मोरे, कलिम पठाण, सुभद्रा नर्हे, बाळासाहेब नर्हे.

पाबळ : तुकाराम कवडे, अनुसूया गोरडे, विद्या कवडे, दादासाहेब पाडले, सुशीला कवडे, सोनाली कापसे, आशा कवडे.

हिवरे कोरडा : सुभाष माळी, सुदाम कोरडे, सपना अडसूळ, संतोष जराड, शकील शेख, रोहिणी वाळूज, ज्योती घागळे, मंगल अडसूळ, उज्ज्वला कोरडे.

बाभूळवाडे : प्रमोद खणकर, निशिगंधा बोरुडे, धनंजय जगदाळे, सविता जगदाळे, भावना जगदाळे, बाळू नवले, संदीप चिकने, रंजना जगदाळे, वैशाली जगदाळे.

वडगाव आमली : प्रशांत ढोणे, निर्मला जाधव, वनिता ढोणे, सुधीर पट्टेकर, अमोल पवार, मनीषा डेरे, आशा गायकवाड.

भांडगाव : उमेश खरमाळे, सुचिता उकडे, जनाबाई खरमाळे, अशोक खरमाळे, उज्ज्वला खरमाळे, प्रसाद शिंदे, शोभा पवार.

डिकसळ : भाऊसाहेब चौधरी, अलका शिंदे, कविता काकडे, साहेबराव चौधरी, आशा येवले, अजय सूर्यवंशी, लता शिंदे.

पोखरी : नामदेव करंजकर, बाळू शिंदे, झुंबरबाई पवार, सीताराम केदार, अनुसूया मधे, संगीता शेलार, अशोक खैरे, सविता मधे, हिराबाई पवार.

सावरगाव : इन्द्रवन माने, गंगाराम चिकने, वैशाली चिकणे, प्रदीप गुगळे, हिराबाई थोरात, नंदा शिंदे, रवींद्र गायखे, जयश्री गोडसे, सुरेखा मगर.

वासुंदे : शंकर बर्वे, रामदास झावरे, संजीवनी शिर्के, किशोर साठे, नभाबाई केदार, सुमन सैद, पोपट साळुंखे, छाया वाबळे, बाळासाहेब शिंदे, विमल झावरे, किसाबाई उगले.

राळेगणसिद्धी : जयसिंग मापारी, मंगल पठारे, मंगल मापारी, लाभेश औटी, अनिल मापारी, सुनीता गाजरे, धनंजय पोटे, स्नेहल फटागडे, मंगल उगले.

खडकवाडी : श्रीरंग रोकडे, अविता चिकणे, दत्तात्रय गायकवाड, अक्षय ढोकळे, अर्चना गगरे, धनंजय ढोकळे, नंदा माळी, नंदा हुलावळे, विकास रोकडे, शोभा शिंदे, अनिता रोकडे.

अक्कलवाडी : भाऊसाहेब नरवडे, मंदा ढोकळे, संगीता शिकारे, सीताराम नरवडे, विमल नरवडे, संपत शिकारे, सुनीता नरवडे.

वारणवाडी : अर्जुन पिंगळे, मंदा केदार, पुष्पा करंडे, संजय काशीद, संतोष मोरे, आशाबाई थोरात, जाणकू दुधवडे, रोशनी काशीद.

कातळवेढा : वैशाली भाईक, चंद्रभागा भाईक, पीयूष गाजरे, धनश्री खटाटे, मंगल पवार, संभाजी डोगरे, भाऊसाहेब डोगरे, दीपाली लामखडे.

दैठणे गुंजाळ : पांडुरंग गुंजाळ, उज्ज्वला आंग्रे, जयश्री जासूद, लता गुंजाळ, विलास गुंजाळ, मल्हारी गुंजाळ, विमल येवले, अनिता गुंजाळ, सचिन गुंजाळ.

तळमावले: स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह मोठ्या उत्साहाने संपन्न

तळमावले: स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह मोठ्या उत्साहाने संपन्न

तळमावले प्रतिनिधी
तळमावले दि.19 (ता.पाटण) काकासाहेब चव्हाण महाविद्यालय तळमावले येथे दि. १२ जानेवारी ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये या "स्वामीं विवेकानंद सप्ताह"चे आयोजन करण्यात आले होते.
सदर  सप्ताह अंतर्गत १२ जानेवारीला सप्ताहाचा शुभारंभ ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पो निरीक्षक श्री.संतोष पवार साहेब यांच्या शुभहस्ते  करण्यात आला.
दि.१३ जाने. २०२१ विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळावा म्हणून चित्रकला व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.याावेळी प्रमुख पाहुण्या सौ.शोभाताई भुलूगडे सरपंच ताईगडेवाडी ग्रामपंचायत उपस्थित होत्या.
दि.१४ जाने. २०२१ रोजी समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथप्रदर्शनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मा. यशवंत पाटील (सामाजिक कार्यकर्ते ,तळमावले) व मा.संजय लोहार (अध्यक्ष वांगव्हॅली पत्रकार संघ ) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दि. १५ जाने. २०२१ रोजी विद्यार्थ्यांचे  निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला.
दि.१६ जाने.२०२१ रोजी "दुर्गसंवर्धन" या विषयावर शिव व्याख्याते मनोहर यादव सर यांचे व्याख्यान झाले .
दि.१८ जाने. २०२१ प्राचार्य अभयकुमार साळुंखे (कार्याध्यक्ष श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था,कोल्हापूर ) यांचा जन्मदिवस "ज्ञानशिदोरी" दिन व "विवेकदिप" ग्रंथाचे वाचन करण्यात आले.
दि.१९ जाने. २०२१ रोजी प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबीराचा शुभारंभ मा.कुसुमताई करपे (आदर्श महाराष्ट्र राज्य  कृषीभूषण पुरस्कार प्राप्त ) यांच्या हस्ते करण्यात आले.तद्नंतर प्रयास प्रकाशन व काकासाहेब चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कवि प्रदिप पाटील यांचा "साठवण" या काव्यसंग्रहाचे प्रकाशन सोहळा मा. सुनिती सु.र (जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक ) यांच्या शुभहस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अरुण गाडे सर  होते या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रा.भास्कर पाटील, प्रा.सौ.मिनाक्षी पाटील,प्रा.विक्रांत सुपूगडे, प्रा. महेश चव्हाण, प्रा.सचिन पुजारी , प्रा.सौ.मनिषा शिंदे यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.

थकीत वीजबिल भरा : नाहीतर वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे महावितरणचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश !

थकीत वीजबिल भरा : नाहीतर वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे महावितरणचे सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश !

मुंबई, दि. 19 : वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसूल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडित करण्याचे आदेश महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

डिसेंबर 2020 अखेर राज्यात एकूण 63 हजार 740 कोटी रुपयांची थकबाकी असून यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. आता जर ग्राहकांनी वीज बिल भरले नाही तर वीज पुरवठा खंडित करण्याशिवाय महावितरणसमोर पर्याय उरलेला नाही.

डिसेंबरअखेर राज्यातील कृषिपंप ग्राहकांकडे 45 हजार 498 कोटी रुपयांची थकबाकी आहे तर वाणिज्यिक, घरगुती व औद्योगिक ग्राहकांकडे 8485 कोटी रुपये व उच्चदाब ग्राहकांकडे 2435 कोटी रुपयांची थकबाकी आहे.

राज्यात मार्च 2020 मध्ये कोविड 19 मुळे लॉकडाऊनच्या काळात थकबाकीपोटी वीज पुरवठा खंडित न करण्याचा महावितरणने निर्णय घेतला होता व उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा डिसेंबर अखेरपर्यत खंडित न करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या.थकबाकीदार ग्राहकांना वीज बिल सुलभ हत्यामध्ये भरण्याची सवलत महावितरणने दिलेली आहे. सोबतच थकबाकीवर विलंब आकार न लावण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. तसेच ग्राहकांच्या वीज बिलासंबंधी तक्रारी असल्यास त्या तात्काळ सोडविण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.

लॉकडाऊनच्या काळात खाजगी वीज वितरण कंपन्यांनी थकबाकी वसूल करण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाची रितसर परवानगी घेऊन सप्टेंबर 2020 मध्ये थकबाकी वसुलीची मोहीम मुंबई व मुंबई उपनगरात चालू केली व थकबाकीपोटी अनेक ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला. मात्र उर्जामंत्री डॉ राऊत यांनी डिसेंबर अखेरपर्यंत थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणला निर्देश दिले होते. परंतु आता थकबाकीचा डोंगर वाढल्याने दैनंदिन कामकाज चालविणे महावितरणला शक्य होत नसल्याने, बँकांची व इतर देणी व कर्मचाऱ्यांचा पगार देणेही कठीण होत आहे.

ग्राहकांना वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणला वीज खरेदीसाठी पुरवठादारांना रोजच पैसे द्यावे लागतात. प्रचंड वाढलेल्या थकबाकीमुळे आता यापुढे थकबाकी वसूल करण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांना जानेवारीपासून मोहीम राबविण्याचे निर्देश महावितरणने दिले असून थकबाकी वसुलीत कसूर करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावरही कारवाईचे संकेत दिले आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी आपल्या वीज बिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

मंगळवार, १९ जानेवारी, २०२१

काळगाव;- पंजाबराव देसाई यांची एकहाती सत्ता

काळगाव दि.18 ता.पाटण : 
पाटण तालुक्यातील काळगाव ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे प.स.सदस्य पंजाबराव देसाई व सुरेश पाटील यांच्या शिवशंभो ग्रामविकास परिवर्तन पॅनलनं 
 एकहाती सत्ता मिळवली आहे.काळगाव मध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा अटीतटीचा सामना रंगला होता. काळगाव ग्रामपंचायतीत एकूण 11 जागा आहेत. त्यातील 1 जागा बिनविरोध झाली होती. 10 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये सर्वच्या सर्व  म्हणजे 10 जागा शिवसेनेचे पुरस्कृत उमेदवार निवडून आले आहेत.तर
राष्ट्रवादीच्या निनाई देवी ग्रामविकास परिवर्तन पॅनलला मात्र इथे भोपळाही फोडता आला नाही.त्यामुळे ग्रामपंचायतीवर पंजाबराव देसाई ,सुरेश पाटील यांच्या नेतृत्वातील शिवशंभो ग्रामविकास परिवर्तन पॅनलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे.
विजयी उमेदवार ;- वसंतराव देसाई,सौ.संजीवनी नलवडे,महादेव पाटील,सौ.सुजाता मानुस्करे , शंकर कुष्टे,शिवाजी पवार,सौ.राखी काळे,सौ.सविता लोटळे, बाबुराव मस्कर,सौ.स्वाती सुतार,
बिनविरोध निवड झालेल्या सौ.स्वाती संजय बावडेकर. 
निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला.




सोमवार, १८ जानेवारी, २०२१

कुंभारगाव ; कुंभारगाव ग्रामपंचायतीमध्ये सत्ताबदल


कुंभारगाव दि.18 (ता. पाटण) येथील ग्रामपंचायतीमध्ये मा.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (बाबा) गटाचे समाजसेवक योगेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली 11 पैकी 7 जागा जिंकून कुंभारगावात सत्तातर केले आहे. विरोधी कुंभारगाव ग्रामविकास पॅनेलने चार जागांवर विजय मिळवला आहे.

पाटण तालुक्यातील अत्यंत संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या कुंभारगाव ग्रामपंचायतीमध्ये अत्यंत चुरशीने मतदान झाले होते. शिवसेना व राष्ट्रवादी  विरुद्ध  काँग्रेस अशी चांगलीच टक्कर झाली होती यामध्ये मा.मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या गटाने बाजी मारली आहे.

 कुंभारगाव विकास आघाडीने वर्चस्व मिळवत सात जागा जिंकल्या.

कुंभारगाव विकास आघाडीचे  विजयी उमेदवार

श्री.हणमंत आकाराम कांबळे,सौ.वैशाली संजय गुरव,सौ.सारिका योगेश पाटणकर,राजेंद्र मोहनराव चव्हाण, बाळकृष्ण शिबे, सौ.शीतल जयवंत बुरशे, धनाजी रामचंद्र बोरगे,


कुंभारगाव ग्रामविकास पॅनेलचे विजयी उमेदवार  -नंदकुमार नामदेव खटावकर,महादेव मारुती वरेकर,सौ.रेखा सचिन कळत्रे,सौ.प्रतील उमेश घाडगे

कुंभारगाव विकास आघाडीचे नेतृत्व योगेश पाटणकर,भगवानराव पाटील, राजेंद्र चव्हाण,  संपतराव चव्हाण, यांनी केले. तर विरोधी कुंभारगाव ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व संजय देसाई, डॉ.दिलीप चव्हाण यांनी केले. निकालानंतर विजयी उमेदवारांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष व्यक्त केला.

पाटण ; तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई गाटची सरशी

पाटण ; तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई गाटची सरशी

पाटण दि.18  तालुक्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनने भरारी घेतली आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींत शंभुराज देसाई गाटची सरशी झाली आहे. तर पाटणकरांची पिछेहाट झाली आहे.

पाटण तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखालील स्थानिक गटाच्या पॅनेलने सर्वाधिक ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे. तर सत्यजितसिंह पाटणकर यांच्या गटाची पिछेहाट झाली आहे. मंत्री शंभूराज देसाई यांच्या स्थानिक गटाने 41 ग्रामपंचातींवर वर्चस्व मिळवित सत्ता मिळविली आहे.तर विरोधी गटाची केवळ 20 ग्रामपंचायतीत सत्ता आली आहे. पाटण तालुक्यात 107 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. यामध्ये 35 ग्रामपंचायती बिनविरोध आल्या. प्रत्यक्षात 72 ग्रामपंचायतीत निवडणूक झाली.

ग्रामपंचायतींचे निकाल

गृहमंत्री शंभूराज देसाई (शिवसेना) गट - 41, पाटणकर गट - 20, महाविकास आघाडी - 2, राष्ट्रवादी - भाजप - 1, राष्ट्रीय काँग्रेस - 1, समान - 7

मंत्री शंभूराज देसाई गट - मुळगाव, कोकिसरे, गोकुळ तर्फ पाटण- सत्तांतर, पेठ शिवापूर, चोपडी, त्रिपुडी - सत्तांतर, शिंदेवाडी, सोनवडे, वाटोळे - सत्तांतर, हुंबरळी- सत्तांतर, चोपदारवाडी, मणदुरे, आंबळे, वाडीकोतावडे, धावडे, दिवशी खुर्द-सत्तांतर, कातवडी- सत्तांतर, मुंद्रुळहवेली-सत्तांतर, ठोमसे-सत्तांतर, कसणी, कोरीवळे-सत्तांतर, बाचोली, मुरुड- सत्तांतर, चव्हाणवाडी, मस्करवाडी, बोडकेवाडी, मालोशी-सत्तांतर, मोरेवाडी, उमरकांचन-सत्तांतर, बाबंवडे, जानुगडेवाडी, पवारवाडी, शिद्रुकवाडी, धामणी- सत्तांतर, काढणे, काळगाव, हावळेवाडी, मानेवाडी - सत्तांतर, खोनोली, निगडे, चव्हाणवाडी (धामणी)

पाटणकर गट - काळोली, मेंढेघर, तामकडे, नेचल, सुळेवाडी-सत्तांतर, मेंढोशी, चिटेघर, साखरी, डोंगळेवाडी, टोळेवाडी, नावडी- सत्तांतर, सोनायचीवाडी, शिंगणवाडी- सत्तांतर, पापर्डे-सत्तांतर, कोचरेवाडी, केळोली, कुटरे, चिखलेवाडी, करपेवाडी - सत्तांतर कामरगाव.

राष्ट्रीय काँग्रेस - कुंभारगाव, राष्ट्रवादी - भाजप तारळे.

समान - पाठवडे, काहीर, पिपंळोशी, सुपगडेवाडी, चाफोली, कवडेवाडी, बोंद्री.

महाविकास आघाडी - गुढे, खळे.

बुधवार, १३ जानेवारी, २०२१

‘दख्खनचा राजा जोतिबा’ च्या सेटवर शिवसमर्थ दिनदर्शिकेचे प्रकाशन

‘दख्खनचा राजा जोतिबा’ च्या सेटवर शिवसमर्थ दिनदर्शिकेचे प्रकाशन

तळमावले/वार्ताहर
‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा-जोतिबा’ या सेटवर शिवसमर्थ दिनदर्शिकचे दिमाखदार प्रकाशन करण्यात आले. सुप्रसिध्द अभिनेते दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या मार्गदर्शनाखाली माधुरी देसाई पाटकर, अमेय हिंदळेकर, कोठारे व्हीजनची संपूर्ण टीम, ज्योतिबाची भूमिका साकारणारे अभिनेते विशाल निकम, महालक्ष्मीची भूमिका साकारणारी अभिनेत्री निशा परुळेकर, चोपडाई ची भूमिका साकारणारी अभिनेत्री सई कल्याणकर व इतर कलावंत मान्यवर उपस्थित होते.
मराठी परंपरा, मराठी प्रवाह ही नवी टॅगलाईन घेवून स्टार प्रवाह ही वाहिनी सध्या मालिकांचे प्रक्षेपण करत आहे. स्टार प्रवाह ने वेळोवेळी प्रसारित केलेल्या मालिकांचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. ग्रामीण भागावर या मालिकांचा पगडा असल्याचे दिसून येत आहे. दैनंदिन मालिकांबरोबरच स्टार प्रवाहने देव देवतांच्यावर मालिका बनवून आपला वेगळा ठसा उमटवला आहे. यामध्ये विठू माउली, देवा श्री गणेशा, श्री गुरुदेव दत्त अशा दर्जेदार मालिका बनवून आपला वेगळा प्रेक्षक वर्ग तयार केला आहे. ‘दख्खनचा राजा-जोतिबा’ ही मालिकादेखील लोकांच्या पसंतीस उतरली आहे.
शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या कुशल नेतृत्वाखाली संस्थेच्यावतीने माहितीपूर्ण दिनदर्शिका प्रकाशित केली जात आहे. या दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर प्रत्येक वर्षी एका देवदेवतांचे चित्र छापले जाते. यावर्षी कुलदैवत श्री ज्योतिबा यांचे चित्र छापले होते. त्यामुळे या दिनदर्षिकेचे प्रकाशन ‘दख्खनचा राजा जोतिबा’ या मालिकेच्या सेटवर करण्यात यावे असे ठरवण्यात आले होते. त्या अनुषंगाने सदर प्रकाशन करण्यात आले.
या प्रकाशनप्रसंगी संस्थेच्यावतीने संतोष देसाई, संदीप डाकवे, रणजितसिंह निंबाळकर, महेश जाधव, विजय मोहीते, छायाचित्रकार अनिल देसाई व इतर पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, शिवसमर्थ च्या वतीने राबवण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कलावंतांनी कौतुक केले.

सोमवार, ११ जानेवारी, २०२१

मराठा आरक्षणसंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक

मराठा आरक्षणसंदर्भात आज नवी दिल्लीत वकिलांची बैठक 

मुंबई, दि. 11 : सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाच्या पुढील सुनावणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज, 11 जानेवारी रोजी नवी दिल्लीत बैठक होणार आहे.आज सायंकाळी 5 वाजता नवीन महाराष्ट्र सदनमध्ये होणाऱ्या या बैठकीला उपसमितीचे सदस्य बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील, अनिल परब यांच्यासह राज्य शासनाने नेमलेले वरिष्ठ विधीज्ञ, शासकीय तसेच खासगी याचिकाकर्त्यांचे वकील उपस्थित राहणार आहेत. मराठा समाज व शासकीय वकिलांमध्ये समन्वय साधण्यासाठी राज्य शासनाने नेमलेल्या पाच खाजगी वकिलांच्या समितीचे सदस्यदेखील या बैठकीत ऑनलाईन सहभागी होणार आहेत.मराठा आरक्षणाबाबत येत्या 25 जानेवारीपासून दैनंदिन स्तरावर नियमित सुनावणी करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मागील सुनावणीत जाहीर केले होते.

रविवार, १० जानेवारी, २०२१

गुटखा विकताय सावधान ; होईल दहा वर्षाची शिक्षा

गुटखा विकताय सावधान ; होईल दहा वर्षाची शिक्षा
मुंबई, दि. ८ : अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेचे कलम 188 लागू होते,असा निर्णय उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यासाठी अन्न व औषध प्रशासन मंत्री  डॉ राजेंद्र शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व  राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन सोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व त्यासोबत कलम 328 हे आरोपीविरुद्ध लावणे आवश्यक आहे, अशी स्वतंत्र अभिमत याचिका सर्वोच्च न्यायालयात नोव्हेंबर 2020 मध्ये दाखल केली, त्यावर सर्वोच्च न्यायालयाने, औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या आदेशाला दि.7 जानेवारी 2021 रोजी स्थगिती दिलेली आहे.

महाराष्ट्र राज्यात, सार्वजनिक आरोग्याच्या हेतूने व जनहित लक्षात घेता गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थावर 2012 पासून अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदींच्या अधीन राहून अन्नसुरक्षा आयुक्त यांनी बंदी घातलेली आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या सेवन करण्यामुळे मुख कर्करोग तसेच इतर गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्याधी निर्माण होतात हे वैज्ञानिक संशोधनाअंती सिद्ध झालेले आहे. त्या अनुषंगाने विविध संशोधन झालेले असून, त्यांनी प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये यांचा विस्तृत प्रमाणावर उल्लेख केलेला आहे.  या सर्व बाबींचा विचार करता महाराष्ट्रात  गुटखा, पान मसाला, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी व इतर तत्सम पदार्थांच्या उत्पादन/ वाहतूक/ विक्री/ साठा/ वितरण यावर बंदी घालण्यात आलेली आहे. या बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नियम व नियमन 2011 त्याचबरोबर भारतीय दंड संहिता कलम 188 व 328 यांचा समावेश होऊन आरोपीविरुद्ध संबंधित न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्यात येत होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी तसेच नगर व धुळे जिल्ह्यातील काही व्यापाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध लावण्यात येणाऱ्या भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व 328 च्या संदर्भात उच्च न्यायालय, खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका दाखल केल्या होत्या. त्यांचा एकत्रित निकाल मार्च 2016 मध्ये घोषित झाला. उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी याच फक्त उल्लंघन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर लागू होतात असे नमूद केले.

या निकालाच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्र अभिमत याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी होऊन अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी बरोबर भारतीय दंड संहितेच्या तरतुदी लागू होतात असा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने देऊन, सर्व तेरा याचिका  रिमांड बॅक केल्या व त्याची  पुन्हा सुनावणी होऊन  उच्च न्यायालय ,खंडपीठ औरंगाबाद  यांनी 15 ऑक्टोबर 2020 रोजी निकाल घोषित केला की, अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदी सोबत फक्त भारतीय दंड संहितेच्या कलम 188 लागू होते. तथापि न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरुद्ध डॉ. शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेऊन व पाठपुरावा केला व राज्य सरकार तर्फे अन्न सुरक्षा व मानदे कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन सोबतच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 व त्यासोबत कलम 328 हे आरोपीविरुद्ध लावणे आवश्यक आहे असे सर्वोच्च न्यायालयात सरकारी अभियोक्ता श्रीयुत चिटणीस ,पाटील यांच्या मार्फत स्वतंत्र अभिमत याचिका नोव्हेंबर 2020 मध्ये दाखल केल्या, त्यावर मा. सर्वोच्च न्यायालयाने, औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायालयाच्या आदेशाला दिनांक 7 जानेवारी 2021 रोजी स्थगिती दिलेली आहे.

ही कार्यवाही  अन्न सुरक्षा आयुक्त अभिमन्यू काळे तसेच वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय त्याचबरोबर विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव, विधी व न्याय विभागाचे औरंगाबादचे उपसचिव श्री. चव्हाण, सहसचिव श्री. कदम, सरकारी अभियोक्ता श्रीयुत यावलकर (खंडपीठ, औरंगाबाद) सहआयुक्त आढाव, यांचे मार्गदर्शनाखाली सह आयुक्त औरंगाबाद विभाग श्री .वंजारी, सहाय्यक आयुक्त नांदेड, श्री. बोराळकर, अन्न सुरक्षा अधिकारी औरंगाबाद फरीद सिद्दिकी यांनी पूर्ण केली.

शनिवार, ९ जानेवारी, २०२१

पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डाॅ.संदीप डाकवे यांचा 9 जानेवारी हा वाढदिवस. महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते आणि विचारवंत डाॅ.यशवंत पाटणे यांनी त्यांच्याविषयी लिहलेला हा लेख...

पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डाॅ.संदीप डाकवे यांचा 9 जानेवारी हा वाढदिवस. महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते आणि विचारवंत डाॅ.यशवंत पाटणे यांनी त्यांच्याविषयी लिहलेला हा लेख...
 !! "स्नेहाचे वृंदावन" !!

व्याख्यानाच्या वाटेवर मला अनेक माणसे भेटतात. काही भुरळ घालतात, लळा लावतात. अधून मधून संवाद साधतात. मैत्रीचा धागा बळकट करतात. संदीप डाकवे हे असेच एक माझ्या व्याख्यान वाटेवरचे ‘स्नेहाचे वृंदावन’ आहे. वृंदावनाचे पावित्रय आणि मांगल्य त्यांनी मैत्रीत जपले आहे.
मला संदीप डाकवे कधी भेटले आठवत नाही. पण त्यांनी ना.आर.आर.पाटील यांचे सुंदर शब्दचित्र रेखाटले. वृत्तपत्रांनी त्यांची नोंद घेतली. खुद्द आबांनी हîा कलावंताचे कौतुक केले आणि ते माझ्या जिव्हाळयाचा विषय झाले.
शब्दचित्र रेखाटणे ही एक दुरापास्त कला आहे. ती संदीपना साधली आहे. कविवर्य विठ्ठल वाघ अशा शब्दचित्रांबाबत ख्यात कीर्त आहेत. कला जेव्हा काळजात भिडते तेव्हा कलावंत समाजमान्य होतो. कला ही एक साधना आहे. संदीप हे कलेचे निष्ठावंत साधक आहेत.
काही माणसे आपण जगाला दिसावे म्हणून उंच डोंगरावर उभी राहतात. तर काही आपल्याला जग दिसावं म्हणून उंच डोंगर चढतात. संदीप डाकवे यांच्या चित्रकारितेतून समाजाचं दर्शन घडते. आजवर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, शहीद संतोष महाडीक यासारख्या नररत्नांची शब्दचित्रे रेखाटून आपल्या अभिरुचीचे आणि ज्ञानसंस्कृतीचे प्रगल्भ दर्शन घडविले आहे. आपले वेगळेपण सिध्द करण्यासाठी तारुण्याचा काळ हा किती हे संदीप डाकवे यांनी सिध्द करुन दाखवले आहे.
चित्रकारिता हा संदीपचा छंद आहे. पत्रकारिता हे त्यांचे व्रत आहे. ‘दै.नवाकाळ’चे संपादक नीळकंठ खाडिलकर (भाऊ)यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे संदीपने रेखाटली शिवाय पुस्तकातील मजकूराला सुसंगत व्यंगचित्रे रेखाटून आपल्या कारागिरीचे श्रेष्ठत्व सिध्द केले.
संदीप डाकवे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. शब्द त्यांच्यावर प्रसन्न आहेत. रंगरेषा त्यांच्यावर लुब्ध आहेत. शब्दातून काव्य साकारण्याची कला त्यांना अवगत आहे. विश्वविख्यात ‘पोएट्री माईल स्टोन’ काव्यसंग्रहासाठी त्यांची कविता निवडली गेली. हा त्यांच्या शब्द सामथ्र्याचा आणि प्रतिभेचा सन्मान आहे. ‘स्टार आयकाॅन अॅवार्ड’ पटकावणारे संदीप डाकवे हे खÚया दृष्टीने ‘द प्राईड आॅफ महाराष्ट्र’ आहेत.
ए.टी.डी. ही चित्रकला शिक्षकासाठी आवष्यक असणारी पदविका, संदीप डाकवे यांनी कला निष्ठेने मिळवली. ते इंग्रजी विषयात पदवीधर झाले. पत्रकारितेतील बी.जे., एम.जे. उच्च पदव्याही त्यांनी प्राप्त केल्या. पण त्यांचा जीव रमला तो समाजसेवेत आणि साहित्य कलेल्या प्रांतात. ‘साप्ताहिक शिवसमर्थ’ चे देखणे आणि दर्जेदार संपादन हे त्यांच्यातील उत्कट कलावंताचे आणि ज्ञानवंताचे प्रत्यंतर देते. ‘ग्रामीण माणूस’ हा संदीप डाकवे यांच्या चिंतनाचा व प्रेमाचा विषय आहे. हîा त्यांच्या चिंतनातूनच वृत्तपत्रीय सदरलेखन आकाराला आले. ‘महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, माणिक मोती, मी सरपंच बोलतोय, वाल्मिकीच्या पठारावरुन’ ही त्यांची सदर लेखने वाचकप्रिय झाली. पत्रकारितेचा एक आदर्श वस्तुपाठ घालून देणारे संदीप डाकवे शासन दरबारी चारदा गौरविले गेले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लाभला. दर्पण पुरस्काराने त्यांच्या गौरवावर शिक्कामोर्तब केले. स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराने त्यांच्या कर्तृत्वावर मोहर उमटवली. त्यांचे पुस्तक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी प्रकाशित करुन त्यांचा अक्षर गौरव केला आहे. पाटण तालुक्यातील ‘डाकेवाडी’ नावाच्या छोट्या गावात जन्माला आलेला हा कलावंत जेव्हा ‘पत्रकार रत्न’, आणि ‘पत्रकार भूषण’ म्हणून गौरवला जातो, तसेच राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पटाकावतो तेव्हा तो साहजिकच आदराचा आणि अभिमानाचा विषय होतो.
पदवी माणसाला पुस्तकी ज्ञान देते पण परिस्थिती माणसाला अनुभवाचे आणि जगण्याचे शहाणपण देते. संदीप डाकवे हे अंधारवाटा तुडवत प्रकाशाच्या दिशेने झेपावणारे, प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत उंच होत जाणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांची उंची राष्ट्रीय पुरस्काराने वाढली आहे. पण याशिवाय त्यांच्या ठायी असणारी विनम्रता आणि गुणवत्ता यामुळे ती अधिक विलोभनीय झाली आहे. कागदावर, मातीवर, खडूवर, मोरपिसावर, पिंपळपानावर सुंदर कलाकृती रेखाटणारे संदीप डाकवे आज माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा..!

शुक्रवार, ८ जानेवारी, २०२१

छायाचित्रकार अनिल देसाई यांचा विशेष गौरव

छायाचित्रकार अनिल देसाई यांचा विशेष गौरव

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी (कुंभारगांव) येथील महालक्ष्मी फोटो स्टुडिओचे मालक व वांगव्हॅली पत्रकार संघाचे सदस्य छायाचित्रकार अनिल देसाई यांचा पत्रकार दिनानिमित्त पाटणचे प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार, प्राचार्य डाॅ.अरुण गाडे, श्रीनिवास वाळवेकर, डाॅ.चंद्रकांत बोत्रे, डाॅ.सुभाष ताईगडे, डाॅ. धनंजय कुंभार, डाॅ. अजय सपकाळ, संघाचे संस्थापक चंद्रकांत चव्हाण, संजय लोहार, मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, आरोग्य कर्मचारी इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह, पुस्तक व गुलाबपुष्प देवून विशेष गौरव करण्यात आला.
जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित केलेल्या ‘माझे कुटूंब माझी जबाबदारी’ या स्पर्धेत अनिल देसाई व त्यांचे सहकारी यांनी केलेल्या शाॅर्टफिल्मला द्वितीय क्रमांक मिळाला होता. तसेच कोरोनाच्या कालावधीत त्यांनी मास्कचे वाटप केले होते. या कार्याची दखल घेवून त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.
या सत्काराबद्दल त्यांचे वांगव्हॅली पत्रकार संघाचे संस्थापक चंद्रकांत चव्हाण, अध्यक्ष संजय लोहार, तुषार देशमुख, डाॅ.संदीप डाकवे, नितीन बेलागडे, अमोल चव्हाण, प्रमोद पाटील, बाळासाहेब रोडे, हरीष पेंढारकर, पोपट झेंडे, पोपट माने, प्रदीप माने, विजय सुतार, अमित शिंदे, राजेंद्र पुजारी, पी.जी.जंगाणी सर, सुरेश पाटील व अन्य मान्यवर यांनी अभिनंदन केले.

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...