बुधवार, २७ जानेवारी, २०२१

तळमावले; आय फोन कंपनीचा चाळीस हजाराचा मोबाईल केला परत ; म्हणाले नाईकबा पावला

तळमावले; आय फोन कंपनीचा चाळीस हजाराचा मोबाईल केला परत ; म्हणाले नाईकबा पावला 

 तळमावले / प्रतिनिधी ; 

सध्याच्या जगात घरातून बाहेर पाऊल टाकल्यानंतर कोणत्या प्रसंगाचा सामना करावा लागेल याचा नेम राहिला नाही, असं म्हटलं जातं. त्यातच सार्वजनिक ठिकाणी अनेकदा चोरीच्या घटनाही समोर येत असतात. मात्र दै. लोकमतचे तळमावले येथील पत्रकार पोपटराव माने यांनी प्रामाणिकपणाचं अनोखं उदाहरण समाजासमोर घालून दिलं आहे. त्यांनी 40 हजार रुपये किंमतीचा आय फोन कंपनीचा मोबाईल प्रामाणिकपणे परत केला.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की दि.25 रोजी पत्रकार पोपटराव माने हे आपल्या वैयक्तिक कामासाठी कराडला जात होते ते तळमावले येथील सार्थक पेट्रोलियम करपेवाडी  येथे आपल्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता त्यानां जमीनीवर मोबाईल सारखी दिसणारी वस्तू दिसली त्यांनी नीट लक्ष देऊन पाहिले तर आय फोन कंपनीचा मोबाईल होता.तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमध्ये चौकशी केली असता त्यापैकी कोणाचा मोबाईल नव्हता.मग त्यांनी पेट्रोल पंपावरील कर्मचारी योगेश लाहीगडे,सुमित सुतार, आदित्य सकट, यांच्याकडे फोन देऊन ते आपल्या कामासाठी कराडला निघून गेले.ते कराडहुन परत आले असता त्यांनी चौकशी केली मोबाईल चे मालक रोहन शेलार फोन घेऊन जाण्यासाठी आले होते त्यावेळी रोहन शेलार यांनी सांगितले की आम्ही इचलकरंजीहुन बनपुरी येथील नाईकबा दर्शनासाठी आलो होतो दर्शन घेऊन परत घरी जाताना पेट्रोल पंपवर तेल भरण्यासाठी थांबलो त्यावेळी फोन पडला असावा.सदर फोन ची शहनिशा केल्यानंतर रोहन शेलार हेच मालक आहेत हे समजले त्यानंतर त्यांना फोन परत करण्यात आला. त्यावेळी त्यांनी पत्रकार माने यांचे आभार मानले आणि म्हणले नाईकबा पावला 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...