बुधवार, २७ जानेवारी, २०२१

पाटण ; रस्ता सुरक्षा अभियानाबाबत सामुहिक जनजागृती

पाटण ; रस्ता सुरक्षा अभियानाबाबत सामुहिक जनजागृती
तळमावले/वार्ताहर
रस्ता सुरक्षा अभियान 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी, 2021 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी समाजप्रबोधनाच्या माध्यमातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांपर्यंत पोचविण्याचे काम केले जाणार आहे. त्या अनुषंगाने पाटण पोलीस ठाणे पाटण व दि शिवसमर्थ मल्टीस्टेट को.आॅप.क्रे.सोसा.लि; व शिवसमर्थ परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने लोकांना माहिती देण्यात आली. कराड-चिपळूण रोड वरील मल्हारपेठ बाजारपेठेच्या आवारात या माहितीपूर्ण फलकाचे अनावरण करण्यात आले. रस्ता सुरक्षा अभियानात पाटण पोलीस आणि शिवसमर्थ यांच्यावतीने सामुहिक जनजागृती करण्यात आली आहे.
यावेळी पाटण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक एन.आर.चैखंडे, मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुर्यकांत पाटील, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, बाजीराव पवार, संदीप डाकवे, हणमंत बोत्रे, मल्हारपेठ पोलीस ठाणे येथील कर्मचारी वर्ग, शिवसमर्थ  पतसंस्था शाखेचे कर्मचारी, अधिकारी, मल्हारपेठ बाजारपेठेतील व्यापारी वर्ग उपस्थित होते.
यावेळी रस्ता सडक सुरक्षा, जीवन रक्षा, सुरक्षित अंतर सुरक्षित प्रवास अशा माहितीपूर्ण आशयाचे फलकाचे प्रदर्शन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच रस्त्यावरील रिक्षा व इतर वाहने यांना रिप्लेक्टरसाठी रेडीयम लावण्यात आले. तसेच उपस्थितांना शिवसमर्थ च्या वतीने मास्कचे वाटप देखील करण्यात आले.
पेलीस निरीक्षक एन.आर.चैखंडे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान आठवडा किंवा महिन्याभरापुरते न राहता ते वर्षभर पाळावे असेही आवाहन केले. सामाजिक बांधिलकी ठेवून शिवसमर्थ राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक चैखंडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...