कुंभारगाव ता.पाटण : देश व राज्यावर कोरोनाची आपत्ती ओढावली होती. या आपत्तीच्या काळातही महिलांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आपण कोरोनाच्या लढ्यात यशस्वी ठरलो आहे. त्याच प्रमाणे ग्रामपंचायतीमध्ये ५० टक्के आरक्षणाच्या व्यतिरिक्तही अनेक महिला निवडूण आल्या आहेत. महिलांनी प्रगतीची कास धरून गाव विकासात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन सौ.विद्याताई सुभाष मोरे (सरपंच शेंडेवाडी) यांनी कुंभारगाव येथे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सत्कार समारंभात केले.
कुंभारगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतिच्या निवडणूकित कुंभारगावत सत्तातर झाले मा.मुख्यमंत्री प्रथ्वीराज चव्हाण (बाबा) यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवक योगेश पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील विकास आघाडीने 11 जागा पैकी 7 जागा जिंकून सत्ता काबीज केली निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा शाल श्रीपळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित सदस्य श्री. राजेंद्र चव्हाण,श्री. हनुमंत कांबळे,श्री.धनाजी बोरगे सदस्या सौ.सारिका पाटणकर,सौ.शीतल बुरशे,सौ.वैशाली गुरव,सौ. विमल शिबे यांच्या समवेत सौ.मनीषा मोरे श्री.राजेंद्र माने,श्री.अनिल गायकवाड, श्री.राजेंद्र देसाई, श्री.प्रदीप देसाई,श्री.अजित डांगे,श्री.जयवंत पाटील,श्री संजय गुरव,श्री.स्वप्नील माने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा