भारतमाता प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - प्रा.अरुण घोडके
तळमावले/वार्ताहर
जीवनाचे यशस्वीपण आपल्या विचारांवर अवलंबून असते. आपले विचार आपल्या संगतीवर अवलंबून असतात. भारत माता प्रतिष्ठानचे यशस्वीपण त्यांच्या विचार आणि कार्यकत्र्यांवर आहे. भारतमाता प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन प्रसिध्द शिवव्याख्याते प्रा.अरुण घोडके यांनी व्यक्त केले ते रेठरे बद्रुक येथील भारतमाता प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे, जि.प.सदस्या शामला
घोडके, ग्रा.पं.रेठरे च्या सरपंच सुवर्णा कापुरकर, माजी जि.प.सदस्य डाॅ.राजकुमार पवार, माजी बालकल्याण समिती सभापती सुशिला साळुंखे, कृष्णा सह.साखर कारखान्याचे संचालक वसंतराव साळुंखे, ग्रा.पं.रेठरेच्या उपसरपंच शिवाजी दमामे, पत्रकार दिलीप धर्मे व इतर मान्यवर उपस्थित होते.
गेली 10 वर्षे 26 जानेवारी या दिवशी भारतमाता प्रतिष्ठान च्या वतीने भारतमाता प्रतिमेचे पूजन केले जाते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लोकांचा गौरव केला जातो. हे खरंच उल्लेखनीय आहे. आपली भावी पिढी कर्तृत्वान, धैर्यवान, शीलवान, संस्कारक्षम व्हावी हे भारतमातेचे स्वप्न आहे. त्या अनुषंगाने भारतमाता प्रतिष्ठानचे कार्यकर्ते काम करताहेत हे कौतुकाची बाब आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘‘समाजासाठी कोरोना काळात काम केलेल्या निस्वार्थी लोकांचा सत्कार भारतमाता प्रतिष्ठानच्यावतीने प्रेमाची शाल, स्मृतीचिन्ह, रोपटे देवून केले जात आहे हे अनमोल आहे.’’ व्याख्यानावेळी प्रा.अरुण घोडके यांचे शिवचरित्रावरील अनेक प्रसंग डोळयांसमोर उभे केले. तसेच भारतमातेसाठी सानेगुरुजी यांनी लिहलेले भारतमातेसाठीचे गीत सर्वांकडून वदवून घेतले. यामुळे वातावरण एकच भारावून गेले. डाॅ.राजकुमार पवार, पिनु कावरे यांना भारतमाता प्रतिष्ठानच्यावतीने पुरस्कार देवून गौरवण्यात आले
याप्रसंगी डाॅ.संदीप डाकवे, मुजावर मॅडम यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाची भारतमाता प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन याने केली. मान्यवर व सत्कारमुर्तीचे स्वागत सन्मानचिन्ह, षाल व श्रीफळ देवून करण्यात आले.
कार्यक्रमाचे संयोजन उत्तम धर्मे आणि हणमंत गायकवाड यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव साळुंखे यांनी केले. सुत्रसंचालन रामभाऊ सातपुते यांनी तर आभारप्रदर्शन हेमंत धर्मे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरदार मोरे, संतोष कोष्टी, रविंद्र नलवडे व भारतमाता प्रतिष्ठानचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा