पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगांव येथील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व डाॅ.संदीप डाकवे यांचा 9 जानेवारी हा वाढदिवस. महाराष्ट्रातील प्रसिध्द वक्ते आणि विचारवंत डाॅ.यशवंत पाटणे यांनी त्यांच्याविषयी लिहलेला हा लेख...
!! "स्नेहाचे वृंदावन" !!
व्याख्यानाच्या वाटेवर मला अनेक माणसे भेटतात. काही भुरळ घालतात, लळा लावतात. अधून मधून संवाद साधतात. मैत्रीचा धागा बळकट करतात. संदीप डाकवे हे असेच एक माझ्या व्याख्यान वाटेवरचे ‘स्नेहाचे वृंदावन’ आहे. वृंदावनाचे पावित्रय आणि मांगल्य त्यांनी मैत्रीत जपले आहे.
मला संदीप डाकवे कधी भेटले आठवत नाही. पण त्यांनी ना.आर.आर.पाटील यांचे सुंदर शब्दचित्र रेखाटले. वृत्तपत्रांनी त्यांची नोंद घेतली. खुद्द आबांनी हîा कलावंताचे कौतुक केले आणि ते माझ्या जिव्हाळयाचा विषय झाले.
शब्दचित्र रेखाटणे ही एक दुरापास्त कला आहे. ती संदीपना साधली आहे. कविवर्य विठ्ठल वाघ अशा शब्दचित्रांबाबत ख्यात कीर्त आहेत. कला जेव्हा काळजात भिडते तेव्हा कलावंत समाजमान्य होतो. कला ही एक साधना आहे. संदीप हे कलेचे निष्ठावंत साधक आहेत.
काही माणसे आपण जगाला दिसावे म्हणून उंच डोंगरावर उभी राहतात. तर काही आपल्याला जग दिसावं म्हणून उंच डोंगर चढतात. संदीप डाकवे यांच्या चित्रकारितेतून समाजाचं दर्शन घडते. आजवर त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, बापूजी साळुंखे, शहीद संतोष महाडीक यासारख्या नररत्नांची शब्दचित्रे रेखाटून आपल्या अभिरुचीचे आणि ज्ञानसंस्कृतीचे प्रगल्भ दर्शन घडविले आहे. आपले वेगळेपण सिध्द करण्यासाठी तारुण्याचा काळ हा किती हे संदीप डाकवे यांनी सिध्द करुन दाखवले आहे.
चित्रकारिता हा संदीपचा छंद आहे. पत्रकारिता हे त्यांचे व्रत आहे. ‘दै.नवाकाळ’चे संपादक नीळकंठ खाडिलकर (भाऊ)यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे संदीपने रेखाटली शिवाय पुस्तकातील मजकूराला सुसंगत व्यंगचित्रे रेखाटून आपल्या कारागिरीचे श्रेष्ठत्व सिध्द केले.
संदीप डाकवे हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. शब्द त्यांच्यावर प्रसन्न आहेत. रंगरेषा त्यांच्यावर लुब्ध आहेत. शब्दातून काव्य साकारण्याची कला त्यांना अवगत आहे. विश्वविख्यात ‘पोएट्री माईल स्टोन’ काव्यसंग्रहासाठी त्यांची कविता निवडली गेली. हा त्यांच्या शब्द सामथ्र्याचा आणि प्रतिभेचा सन्मान आहे. ‘स्टार आयकाॅन अॅवार्ड’ पटकावणारे संदीप डाकवे हे खÚया दृष्टीने ‘द प्राईड आॅफ महाराष्ट्र’ आहेत.
ए.टी.डी. ही चित्रकला शिक्षकासाठी आवष्यक असणारी पदविका, संदीप डाकवे यांनी कला निष्ठेने मिळवली. ते इंग्रजी विषयात पदवीधर झाले. पत्रकारितेतील बी.जे., एम.जे. उच्च पदव्याही त्यांनी प्राप्त केल्या. पण त्यांचा जीव रमला तो समाजसेवेत आणि साहित्य कलेल्या प्रांतात. ‘साप्ताहिक शिवसमर्थ’ चे देखणे आणि दर्जेदार संपादन हे त्यांच्यातील उत्कट कलावंताचे आणि ज्ञानवंताचे प्रत्यंतर देते. ‘ग्रामीण माणूस’ हा संदीप डाकवे यांच्या चिंतनाचा व प्रेमाचा विषय आहे. हîा त्यांच्या चिंतनातूनच वृत्तपत्रीय सदरलेखन आकाराला आले. ‘महात्मा गांधी तंटामुक्त गांव मोहिम, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, माणिक मोती, मी सरपंच बोलतोय, वाल्मिकीच्या पठारावरुन’ ही त्यांची सदर लेखने वाचकप्रिय झाली. पत्रकारितेचा एक आदर्श वस्तुपाठ घालून देणारे संदीप डाकवे शासन दरबारी चारदा गौरविले गेले. त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार लाभला. दर्पण पुरस्काराने त्यांच्या गौरवावर शिक्कामोर्तब केले. स्वदेशी भारत सन्मान पुरस्काराने त्यांच्या कर्तृत्वावर मोहर उमटवली. त्यांचे पुस्तक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी प्रकाशित करुन त्यांचा अक्षर गौरव केला आहे. पाटण तालुक्यातील ‘डाकेवाडी’ नावाच्या छोट्या गावात जन्माला आलेला हा कलावंत जेव्हा ‘पत्रकार रत्न’, आणि ‘पत्रकार भूषण’ म्हणून गौरवला जातो, तसेच राष्ट्रीय एकात्मता फेलोशिप पटाकावतो तेव्हा तो साहजिकच आदराचा आणि अभिमानाचा विषय होतो.
पदवी माणसाला पुस्तकी ज्ञान देते पण परिस्थिती माणसाला अनुभवाचे आणि जगण्याचे शहाणपण देते. संदीप डाकवे हे अंधारवाटा तुडवत प्रकाशाच्या दिशेने झेपावणारे, प्रतिकुल परिस्थितीवर मात करीत उंच होत जाणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांची उंची राष्ट्रीय पुरस्काराने वाढली आहे. पण याशिवाय त्यांच्या ठायी असणारी विनम्रता आणि गुणवत्ता यामुळे ती अधिक विलोभनीय झाली आहे. कागदावर, मातीवर, खडूवर, मोरपिसावर, पिंपळपानावर सुंदर कलाकृती रेखाटणारे संदीप डाकवे आज माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्या शुभेच्छा..!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा