सोमवार, २५ जानेवारी, २०२१

अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा - तहसिलदार आशा होळकर

अवैध विक्री झालेल्या जमिनी होणार सरकारजमा - तहसिलदार आशा होळकर
  सातारा दि. 25 : कुळ कायद्याच्या जमिनीच्या खरेदी - विक्रीवर बंदी असतानाही अवैधरित्या कुळकायद्याच्या जमिनीचे व्यवहार करुन जमिनी विकल्याचे सातारा तालुक्यात प्रकार घडले आहेत. तहसिलदार कार्यालयाने केलेल्या पाहणीमध्ये अशी 56 प्रकरणे आढळून आली असून पैकी 2 प्रकरणांध्यम दंड भरुन घेण्यात आला व 10 प्रकरणांमध्ये दंड भरण्याबाबत अंतिम स्मरणपत्र देण्यात आले आहे. दंड न भरल्यास संबंधितांच्या जमिनी सरकार जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. एकूण शिल्लक 44 प्रकरणात सुनावणी सुरु असल्याची माहिती तहसिलदार श्रीमती आशा होळकर यांनी दिली. 
 कुळकायद्याच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीवर सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र तरीही जमिन खरेदी-विक्री व्यवहार होत असल्याचे सातारा तालक्यात निदर्शनास आले आहे. मात्र असे व्यवहार झाले असतील तर सरकारला बाजारभावाच्या 50 टक्के रक्कम दंड म्हणून भरावयाची असते त्यानंतर जमिनीबाबत झालेला खरेदी-विक्री व्यवहार नियमित होते. मात्र अनेक वर्षापासून कुळकायद्याच्या जमिनीची खरेदी-विक्री  व्यवहार झाले आहेत. अनेकांनी त्याचा सरकारी दंड भरलेला नाही. तालुक्यात आत्तापर्यंत असे 54 व्यवहार समोर आले असून 2 जणांनी रु. 3 लाख 43 हजार 150 इतकी दंडाची रक्कम भरलेली आहे. उर्वरित अनेकांनी अजूनही दंड भरलेला नाही . त्यामुळे त्यांच्या जमिनी सरकार जमा करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचेही श्रीमती होळकर यांनी सांगितले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...