मंगळवार, १७ नोव्हेंबर, २०२०

"दिलखुलास" कार्यक्रमात राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आज मुलाखत

"दिलखुलास" कार्यक्रमात राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आज मुलाखतमुंबई, दि. १६ – माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘विकासाभिमुख निर्णय ‘ या विषयावर गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आणि पणन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. १७ व बुधवार दि. १८ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. तसेच न्यूज ऑन एअर (newsonair) या ॲपवर याच वेळेत ही मुलाखत ऐकता येईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...