कुंभारगाव : सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मोरेवाडी येथे आज केली घटस्थापना
तळमावले / वार्ताहर
मोरेवाडी कुंभारगाव ता.पाटण येथील ग्रामदैवत सिद्धनाथ माता जोगेश्वरी मंदिर मोरेवाडी ता.पाटण आज (ता. 16) घटस्थापना करण्यात आली. आजपासून उपवासाला सुरुवात झाली उपवास काळातील 12 दिवस देवाला पोषाखाद्वारे वेगवेगळे रूप दिले जाते. बलिप्रतिपदा, दीपवाली पाडव्याला मंदिरामध्ये घटस्थापना करून उपवासाची सुरुवात होते व एकादशीला दि.26 नोव्हेंबर रोजी उपवासाची सांगता होणार आहे. अशी माहिती श्री.दिलीप घाडगे यांनी दिली.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सात ते आठ महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मंदिरे बंद आहेत; परंतु राज्य सरकारने आजपासून (साेमवार) मंदिरे खुली करण्यास परवानगी दिली आहे.योगायोगाने आज श्री.सिद्धनाथ मंदिरात घटस्थापना करण्यात आली. सात महिन्यांपासून बंद असणारे मंदिर आज दिवाळी पाडव्याला उघडून घटस्थापना झाल्यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा