बुधवार, ८ जुलै, २०२०

काळगाव:- डॉक्टरांना मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

 

काळगाव / वार्ताहर

काळगाव (ता. पाटण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घुसून डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी (दि. ७) दुपारी घडली. याप्रकरणी सावंतवाडी-आचरेवाडी (ता. पाटण) येथील सहा जणांवर ढेबेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. डॉ. मंगेश  खबाले ( वय ३९) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली सविस्तर माहिती अशी की, रविवारी दि. ५ जुलै रोजी सावंतवाडी येथील नामदेव शंकर सावंत (वय ७०) छातीत दुखत असल्याने उपचारासाठी केंद्रात आले होते. त्यांच्यासोबत नातेवाईक नसल्याने डॉ. खबाले यांनी त्यांच्या नातेवाईकांना दवाखान्यात बोलावून पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेतून कराडच्या कृष्णा रुग्णालयात पाठवले.

मात्र, दरम्यानच्या काळात सावंत यांचा मृत्यू झाला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सावंत यांच्या नातेवाईकांनी काळगावच्या आरोग्य केंद्रात जाऊन डॉ. खबाले यांना त्याबाबत जाब विचारत मारहाण केली.
रुग्णासोबत दिलेल्या कागदपत्रावर करोनाचा उल्लेख केल्याने त्यांना कोणत्याही रुग्णालयात घेतले नाही. तुमच्यामुळेच पेशंट गेला, असे मारहाण करणारांचे म्हणणे होते. मारहाण करताना त्यांनी लोखंडी स्टूल फेकल्याने काच फुटून नुकसान झाले तसेच डॉक्टरांना दुखापतही झाली आहे. पोलीस उपअधीक्षक अशोकराव थोरात यांनी तपासासाठी सूचना दिल्या असून सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तमराव भजनावळे तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*   *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...