शुक्रवार, ३ जुलै, २०२०

मारुल ह. ता. पाटण येथील 1 कोरोनाबाधित तर 1 जणांचा मृत्यू; काल मृत्यू पावलेल्या रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित

मारुल ह. ता. पाटण येथील 1 कोरोनाबाधित तर 1 जणांचा मृत्यू; 
काल मृत्यू पावलेल्या रुग्णाचा अहवाल कोरोनाबाधित
सातारा दि. 3: कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे उपचार घेत असलेल्या मारुल ह. ता. पाटण येथील 35 वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोनाबाधित आला आहे.  तसेच क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात दाखल असणाऱ्या शिरवळ ता. खंडाळा येथील 83 वर्षीय कोरोनाबाधित वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 तसेच काल दि. 2 जुलै रोजी क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील सातारा तालुक्यातील लिंब येथील 56 वर्षीय पुरुषाचा सारीने मृत्यू झाला होता. त्याच्या घशातील नमुना कोरोना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. याचा अहवालही कोरोनाबाधित आला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी* *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोरे बापूंसह मान्यवरांकडून गौरव*

*घणसोलीच्या 'आप्पां'चा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस थाटात; मान्यवरांची हजेरी*   *शिवसेना शाखाप्रमुख चंद्रकांत मानेंच्या कार्याचा रमेश मोर...