संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शुक्रवार, ३१ जुलै, २०२०
सातारा ; जिल्ह्यातील 163 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित
पंजाब व महाराष्ट्र को.ऑप. बँकेचे खातेदार आणि ठेवीदार यांचे अडकलेले पैसे मिळावेत यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी. ;विधानसभा अध्यक्ष श्री.नाना पटोले
मुंबई दि.३० : पंजाब व महाराष्ट्र को.ऑप. बँकेचे खातेदार आणि ठेवीदार यांचे अडकलेले पैसे मिळावेत यादृष्टीने तातडीने कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात नेमण्यात आलेल्या आरबीट्रेटरने मालमत्ता विकून निधी उभारण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करणे आणि नेमण्यात आलेल्या प्रशासकांनी ठेवीदार, खातेदारांना दिलासा देणे आवश्यक आहे. यासंदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडेही पाठपुरावा केला जाईल, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
माजी विधानपरिषद सदस्य आणि काँग्रेस नेते श्री. चरणसिंग सप्रा आणि अडचणीत सापडलेल्या बँक खातेदारांच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानंतर यासंदर्भात विधानभवन, मुंबई येथे श्रीनाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन आज करण्यात आले. यावेळी ठेवीदार आणि खातेदारांनी आपल्या समस्या मांडल्या. बैठकीस रिझर्व्ह बँकेने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर नेमलेले प्रशासक श्री. जे.बी.भोरीया, सह पोलीस आयुक्त श्री. राजवर्धन सिन्हा, पोलीस उपायुक्त श्री.व वपरोपकारी आदिंसह ठेवीदार आणि खातेदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस तपास योग्य दिशेने सुरु असल्याबद्दल ठेवीदार आणि खातेदारांनी समाधान व्यक्त केले. अनेक ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांना दैनंदिन खर्चासाठी तसेच गंभीर आजार झालेल्या खातेदारांना उपचार खर्चासाठी आणि अन्य खातेदारांच्या कर्जापोटीचे मासिक हफ्ते यांसाठी बँकेवरील प्रशासकाने योग्य मार्ग काढावेत अशा सूचना विधानसभा अध्यक्ष श्री.पटोले यांनी यावेळी दिल्या
गुरुवार, ३० जुलै, २०२०
सातारा ; 49 नागरिकांना दिला डिस्चार्ज; उपचारा दरम्यान 1 महिलेचा मृत्यू 524जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा ; जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित; तर एकाचा मृत्यू
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राना मिळणार नवीन रुग्णवाहिका
मुंबई - राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी शासकीय रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रांना 500 नवीन रुग्णवाहिका पुरविण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात केलेल्या घोषणेची पूर्तता केली असून या नवीन रुग्णवाहिका महिनाभरात उपलब्ध होतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.
यासंदर्भात माहिती देताना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, मार्चमध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या भाषणात उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी राज्यातील आरोग्य केंद्रातील जुन्या झालेल्या 1000 रुग्णवाहिका टप्प्याटप्प्याने बदलून त्याजागी नवीन रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती.
यावर्षी 500 आणि पुढील वर्षी 500 अशा नवीन रुग्णवाहिका देण्यात येणार असे त्यांनी जाहीर केले होते. बऱ्याच आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका जुनाट झाल्या आहेत. त्या दुरूस्तीयोग्य न राहिल्याने निर्लेखित करण्यात आल्या आहेत.
यावर्षी 500 नवीन रुग्णवाहिका घेण्यासाठी 89 कोटी 48 लाख अंदाजित खर्चासाठी प्रशासकीय मान्यता नुकतीच देण्यात आली असून त्यानुसार एक महिन्याच्या कालावधीत नवीन रुग्णवाहिका उपलब्ध होणार असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले.
या 500 नवीन रुग्णवाहिका 253 प्राथमिक आरोग्य केंद्र, 137 ग्रामीण रुग्णालये, 106 जिल्हा व उप जिल्हा तसेच स्त्री रुग्णालये आणि 4 प्रादेशिक मनोरुग्णालये यांना देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
गामीण भागातील शासकीय आरोग्य यंत्रणेच्या रुग्णवाहिका या कायमच टीकेचा विषय ठरतात. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला बळकटी देण्यात येत असून आता नवीन रुग्णवाहिका आल्यावर ग्रामीण व दुर्गम भागातील जनतेला अधिक चांगल्या प्रकारे आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी मदत होणार असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
बुधवार, २९ जुलै, २०२०
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी 31 जुलै 2020 अंतिम तारीख
शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांचे आवाहन
मुंबई, दि. २९ : खरीप हंगामासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आलेली असून योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत खरीप हंगामासाठी दि. ३१ जुलै २०२० असून शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी बँक तसेच आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत विमा अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्यास अंतिम मुदतीच्या पूर्वी ऑनलाईन अर्ज भरता न आल्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येणार नाही.
योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत वाढविणे केंद्र शासनाच्या योजनेच्या मार्गदर्शक सुचनेनुसार अशक्य असल्याने अशा स्वरुपाच्या कोणत्याही चर्चेवर विश्वास न ठेवता नोंदणीसाठी नजीकच्या बँक अथवा आपले सरकार केंद्रामध्ये दिनांक ३१ जुलैपर्यंत विमा हप्त्यासह आणि आवश्यक कागदपत्रांसह विमा प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी केले आहे.
राज्यातील वनहक्क जमीनधारक शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी सविस्तर सूचना कृषि विभागामार्फत जिल्हास्तरावर व संबंधित विमा कंपन्यांना निर्गमित करण्यात आल्या आहेत. योजनेतील सहभागासाठी तात्काळ नजीकच्या विभागीय कृषि सह संचालक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजीकच्या बँक, आपले सरकार सेवा केंद्र (CSC) यांचेशी संपर्क साधावा, असेही कृषि विभागामार्फत कळविण्यात आले आहे.
यापुढे दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा नसेल
नवी दिल्ली, 29 जुलै : महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला त्याच दिवशी दिल्लीत मोदी सरकारने शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्याचं घोषित केलं आहे. यापुढे दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा नसेल किंवा फारशी महत्त्वाची नसेल, असंच या शिक्षण सुधारणा धोरणातून स्पष्ट होतं. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्त्वाचे निर्णय जाहीर केले.
गेली अनेक वर्षं अस्तित्वात असेलेली 10 2 म्हणजे दहावीपर्यंत शालेय आणि बारावीपर्यंत उच्च माध्यमिक वर्ग अशी रचना आता नसेल.
याचा अर्थ पहिली पाच वर्षं प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक वर्ग, त्यानंतर प्राथमिक शिक्षण आणि पुढची तीन वर्षं माध्यमिक वर्ग अशी रचना असेल. शेवटची तीन वर्षं उच्च माध्यमिक वर्गाचं शिक्षण असेल.
काय आहे 5 प्लस 3 प्लस 3 प्लस 4 नवी रचना?
पूर्वप्राथमिकची 3 वर्षं अधिक पहिली आणि दुसरी
तिसरी ते पाचवी - प्राथमिक
सहावी ते आठवी - माध्यमिक
नववी ते बारावी - उच्च माध्यमिक
दहावीनंतर आता जसे सायन्स, कॉमर्स, आर्ट्स अशा शाखा निवडायच्या असतात, ते आता बारावीपर्यंत नसेल. सर्व विद्यार्थ्यांना बारावीपर्यंत समान शिक्षणक्रम शिकवला जाईल. त्यामध्ये vocational म्हणजे प्रत्यक्ष कार्यानुभवावर आधारित व्यावसायिक शिक्षणाला महत्त्व दिलं जाईल, अशी माहिती जावडेकर आणि पोखरियाल यांनी दिली.
केंद्र सरकारने बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन मोठे निर्णय घेतले. केंद्र सरकारने आता देशात आता नव्या शैक्षणिक धोरणाला (New Education Policy) मंजुरी दिली आहे. त्याच बरोबर मनुष्यबळ विकास मंत्रालयाचं (HRD) नावही बलदण्यात आलं असून त्याला आता शिक्षण मंत्रालय (Ministry Of Education) असं म्हटलं जाणार आहे. 1992 नंतर पहिल्यांदाच शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाने नाव बदलण्याबाबत विनंती केली होती. ती केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्य केली आहे.
सातारा ; 68 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 5 जणांचा मृत्यू 834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा ; जिल्ह्यातील 186 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 4 बाधितांचा मृत्यु
मंगळवार, २८ जुलै, २०२०
नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांना कोरोना काळात 50 लाखाचे विमा कवच
मुंबई : कामगार विभागांतर्गत येणाऱ्या नोंदणीकृत सुरक्षारक्षक व माथाडी कामगारांचा समावेश अत्यावश्यक सेवेतील घटक म्हणून करण्याचे व 'कोरोना' संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांनाही ५० लाख रुपयांचे विमा संरक्षक कवच मंजूर करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला. या निर्णयामुळे राज्यातील नोंदणीकृत माथाडी कामगारांना आणि सुरक्षारक्षकांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण कवच उपलब्ध होणार आहे तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी म्हणून रेल्वेतून प्रवास करण्याची सोय उपलब्ध होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, माथाडी कामगारांचे नेते शशिकांत शिंदे, नरेंद्र पाटील आदींसह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अत्यावश्यक सेवेतील घटकांना 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले आहे. हे संरक्षण माथाडी कामगारांना व सुरक्षारक्षकांना देण्यात यावे, अशी मागणी कामगार संघटना, लोकप्रतिनिधींच्या वतीने करण्यात येत होती.
त्यासंदर्भात कामगार विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्या प्रस्तावावर आजच्या बैठकीत विचारविमर्श करण्यात आला व निर्णय घेण्यात आला. कामगार विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या सुरक्षारक्षक मंडळातील नोंदणीकृत सुरक्षारक्षक आणि माथाडी मंडळातील नोंदणीकृत माथाडी कामगार या दोन अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांना वित्त विभागाच्या दि. २९ मे २०२० रोजीच्या शासन निर्णयामध्ये समाविष्ट करुन सुधारित शासन निर्णय तातडीने निर्गमित करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.
'महाराष्ट्र माथाडी हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम, १९६९' अंमलबजावणी करण्यासाठी अधिनियमामधील तरतुदीनुसार राज्यामध्ये ३६ माथाडी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे. या नोंदणीकृत माथाडी मंडळातील कामगारांना हा निर्णय लागू होणार आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रेल्वेच्या माथाडी कामगारांना हा निर्णय लागू नाही.
सरकारकडील आकडेवारीनुसार माथाडी मंडळांमधील नोंदीत कार्यरत माथाडी कामगारांची संख्या १ लाखांहून अधिक असून सद्य:स्थितीमध्ये शासकीय धान्य गोदाम, कृषि उत्पन्न बाजार समिती, घरगुती गॅस प्रकल्प अत्यावश्यक सेवेतील खाजगी कंपन्या आदी ठिकाणी २८ हजारांहून अधिक माथाडी कामगार कार्यरत आहेत. या पुरवठा साखळीत अत्यावश्यक व जीवनावश्यक माल उत्पादनाची चढ-उतार व वाहतूक करणारा माथाडी कामगार घटक महत्त्वाचा आहे. माथाडी कामगारांची सेवा कोविड संसर्गाचे हॉटस्पॉट भागातही असल्याने या निर्णयाचा मोठा लाभ माथाडी कामगारांना होणार आहे.
राज्यात एकूण १५ सुरक्षारक्षक मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे. या सुरक्षारक्षक मंडळामधील नोंदणीकृत सुरक्षा रक्षक हे विविध शासकीय, निमशासकीय, सिव्हिल हॉस्पिटल, शासकीय आस्थापना शासकीय मंडळे, महामंडळे, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था, शासकीय कार्यालये आदी ठिकाणांसह इतर आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षकांची कामे करत आहेत. केंद्र शासनाने दि. २३ मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकानुसार 'सुरक्षा रक्षकांची सेवा' ही अत्यावश्यक सेवा जाहीर करुन या सेवा लॉकडाऊनमध्ये सुरु ठेवलेल्या आहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांचा समावेश अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तीमध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव कामगार विभागाकडून सादर करण्यात आला होता.
सुरक्षा रक्षक मंडळातील सुरक्षारक्षक व माथाडी कामगार यांचा जरी कोरोनालढ्यात थेट समावेश होत नसला तरी सदर यंत्रणेस मदत, सहकार्य व त्यांचे संरक्षण करण्याचे काम सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार करत असल्यामुळे सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार यांना विमा कवच व सानुग्रह अनुदान लागू करण्याचा निर्णय सरकारच्यावतीने आज घेण्यात आला. त्यामुळे सुरक्षा रक्षक आणि माथाडी कामगारांना 'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर ५० लाखांचे विमा संरक्षण कवच देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
सातारा : 67 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 3 जणांचा मृत्यू597 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
दहावी निकालाची तारीख आणि वेळ जाहीर
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या 2020 परीक्षेच्या निकालाची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. (Maharashtra HSC result 2020) उद्या (२९ जुलै २०२०) दुपारी १ वाजता दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
दहावी निकालाची तारीख आणि वेळ (Maharashtra SSC Result 2020 Date & Time)
निकाल | तारीख | वेळ |
Maharashtra SSC Result 2020, महाराष्ट्र एसएससी निकाल २०२० | २९ जुलै २०२० (बुधवार) | दुपारी १:०० वाजता |
*जिल्ह्यातील 135 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 2 बाधितांचा मृत्यु*
पुणे पदवीधर मतदारसंघातुन निवडणूक लढवणार नाही : सारंग पाटील
पुणे;- पदवीधर मतदारसंघाची येऊ घातलेली निवडणूक आपण लढवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रमुख आणि साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
पाटील म्हणाले, "मागील निवडणुकीत पराभूत झाल्यापासून या निवडणुकीत उमेदवारी करायची या जिद्दीने मी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहे. निवडणुकीची तयारी म्हणून मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणीही मी केली. यावेळी थेट आणि ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली आहे. मागील विधानसभा व लोकसभा निवडणुकीत बूथ कमिटी स्तरापर्यंत माझा संपर्क आलेला आहे. कार्यकर्त्यांनीही या निवडणुकीसाठी मोठी तयारी केली आहे. मात्र, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात अनवधानाने सातारा लोकसभेची पोटनिवडणूक लागली.
पोटनिवडणुकीत पक्षाने श्रीनिवास पाटील यांना निवडणूक लढविण्याचा आदेश दिला. ही निवडणूक जिंकल्यानंतर मतदारसंघातील अनेक कामात माझा थेट संपर्क येऊ लागला आहे. तसेच सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदार पाटील यांचे काम पुढे घेऊन जाणे, मतदारसंघातील कामे होणे गरजेचे आहे. जर मी पदवीधर मतदार संघातील निवडणुकीत लक्ष घातलं तर सातारा मतदारसंघातील कामे मागे पडतील. यासाठी मी पदवीधर मतदारसंघातील निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण सारंग पाटील यांनी दिले.
माझा निर्णय निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना मी कळवला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही माझा निर्णय कळविला आहे. पक्षाने कोणालाही उमेदवारी दिली तरी मी यासाठी जबाबदारीने काम करणार असल्याचे सारंग पाटील म्हणाले.
सोमवार, २७ जुलै, २०२०
काळगाव;गीताबाई जाधव यांचे निधन
सातारा ; 55 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 593 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
*सातारा : जिल्ह्यातील 106 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 1 बाधिताचा मृत्यु*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात 27 ते 31 जुलैपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू*
रविवार, २६ जुलै, २०२०
*सातारा : जिल्ह्यातील 122 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 2 बाधितांचा मृत्यु *
कुंभारगाव ; निवास मोरे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
शनिवार, २५ जुलै, २०२०
सातारा : 75 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 3 कोरोनाबाधितांचा मृत्यू 675 जणांचे नमुने तपासणीला
मा.सचिन विक्रम पवार तडसर तालुका कडेगाव, जिल्हा, सांगली, यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
*जिल्ह्यातील 121 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित ; 2 बाधितांचा मृत्यू* *तर 1 मृत व्यक्तीचा संशियत म्हणून नमुना पाठविला तपासणीला*
शुक्रवार, २४ जुलै, २०२०
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात येत्या सात ते आठ दिवसात कोरोना चाचणी होणार - पालकमंत्री बाळासाहेब पाटील
सातारा : 65 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 572 जणांचे नमुने तपासणीला
ढेबेवाडी ; परिसरात बिबट्याचे दर्शन
कुंभारगाव ; प्रा.सचिन पुजारी यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर
सातारा ; जिल्ह्यातील 92 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 3 बाधितांचा मृत्यु
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*
*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...
-
ढेबेवाडी फाट्या जवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, संग्रहित चित्र मलकापूरातील ढेबेवाडी फाटा...
-
विशेष कार्य अधिकारी सुनिल गाढे यांनी कराड येथील कृष्णा हॉस्पीटल येथे तातडीने जाऊन त्याठिकाणी दाखल असलेल्या रुग्णाची ...
-
कुंभारगावातीलअंडी विक्रेत्याकडील लाखाची रोकड लुटणाऱ्या 3 आरोपींना पोलीसांनी ठोकल्या बेड्या. पाटण प्रतिनिधी । पाटण पोलिस ठाण्याच्या स...