ढेबेवाडी ता.पाटण एकदम पुढ्यात बिबट्याला पाहून मंदुळकोळे खुर्द येथिल एका युवकाची घाबरगुंडी उडाली काय करावे ते त्यास सुचत नव्हते परिसरात बिबट्याचा दिसल्याने घबराट निर्माण झाली आहे त्याचा वावर वाढल्याने लोकांच्यात शेतीची कामास बाहेर पडताना भितीचे वातावरण असून परिसरात आज एका तर उद्या दुसर्या गावात तो लोकांना दिसत आहे
वाल्मिक पठारावरील डोंगराच्या पट्ट्यात असणारा बिबट्या आता डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावात तो येवू लागल्याने संध्याकाळी लोक घरातून बाहेर पडण्यास धजवत नाहीत
काल रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मंदुळकोळे खुर्द येथील भरूगडेवाडी शेजारील मुख्य रस्त्यावर येथील अमित कापसे दुचाकी वरून घरी निघाले असताना बिबट्या वाटेवरून पुढे डोंगराच्या दिशेने जात असलेला दिसला बिबट्या तिथून निघून जाईपर्यंत माझा जीव टांगणीला लागला होता मला काय सुचत नव्हते बिबट्या निघून गेलेनंतर माझा जीव भांड्यात पडला लगेचच मी आजूबाजूच्या लोकांना याची माहिती देऊन सावध केले अशी माहिती अमित कापसे यांनी दिली या परिसरात काहीजणांना याअगोदरही बिबट्याचे दर्शन झाले आहे तसेच डोंगरात शेळीवर हल्ला केलेल्या घटना घडलेल्या आहेत शेजारी मदनेवस्ती येथे काही दिवसांपूर्वी घरच्या शेडातून शेळी नेहून फस्त केली होती तर चार दिवसापूर्वी साबळेवाडी येथिल डोंगराजवळ कुत्रे फस्त केले असल्याचे लोक सांगत आहेत बिबट्याचे पुन्हा या परिसरात हल्ले आणि दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे डुकरांच्या त्रासाने अगोदरच येथिल शेतकरी त्रस्त असून बिबट्याचाही त्रास होवू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढ वनविभागाने या जंगली प्राण्यांच्या पासून होणारे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा