तळमावले/वार्ताहर
यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने शैक्षणिक विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल काकासाहेब चव्हाण महाविद्यालयाचे प्रा.सचिन पुजारी यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे.
कुंभारगांव ता.पाटण या गावचे सुपुत्र असलेले प्रा.सचिन पुजारी हे विविध सामाजिक उपक्रमात सहभागी असतात. त्यांनी आपल्या प्रभावी सुत्रसंचालनाने विविध कार्यक्रमात छाप उमटवली आहे. प्रा.पुजारी संजिवन प्रतिष्ठान कुंभारगांव मध्ये सचिव या पदावरदेखील कार्यरत आहेत.
प्रा.सचिन पुजारी यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थापक अध्यक्ष संजय सावंत यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर केला आहे.
त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Heartly Congratulations Professor Sachin Pujari, wish you all the best.. regards DRx.Rajendra Shrishail Pujari
उत्तर द्याहटवाHeartly Congratulations Professor Sachin Pujari, wish you all the best.. regards DRx.Rajendra Shrishail Pujari
उत्तर द्याहटवा