सोमवार, २७ जुलै, २०२०

सातारा ; 55 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 593 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

55 नागरिकांना दिला डिस्चार्ज; 593 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

सातारा दि. 27 :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 55 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 593 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
 यामध्ये खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील कुंभारवाडा येथील 60 वर्षीय पुरुष, बाजार पेठ येथील 60 वर्षीय महिला, पळशी रोड येथील 33 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 30 वर्षीय पुरुष व 54 वर्षीय महिला, पिंपरी बु. येथील 21 वर्षीय पुरुष. 
 जावली  तालुकयातील पुनवडी येथील 25, 73 व 90 वर्षीय पुरुष, 13 वर्षाचा मुलगा, 55, 65 वर्षीय महिला, दापवडी येथील 38 वर्षीय पुरुष व 2 वर्षाचा मुलगा व 7 वर्षाची मुलगी.
 वाई तालुक्यातील यशवंतनगर येथील 11, 8 व 6 वर्षाची बालके, शेंदुर्जणे येथील 39 व 40 वर्षीय  पुरुष, वाई येथील 35 वर्षीय महिला , पाचवड येथील  35 वर्षीय महिला.
 महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी येथील 35 वर्षीय पुरुष,
 कोरेगांव तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील 70 वर्षीय पुरुष.
 माण तालुक्यातील दहिवडी येथील 83 वर्षीय पुरुष.
 खटाव तालुक्यातील डिस्कळ येथील 35 वर्षीय पुरुष.
 सातारा तालुक्यातील कन्हेर येथील 40, 35 व 35 वर्षीय महिला. 
 पाटण तालुक्यातील नवसारे येथील 42 वर्षीय पुरुष, नारळवाडी येथील 20 वर्षीय महिला, मिरगांव येथील 44 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला व 13 वर्षाची मुलगी, कोयनानगर येथील 60 वर्षीय महिला व 45 वर्षीय पुरुष, साईकडे येथील 19 वर्षीय तरुण,  कासुर्डे येथील 33 वर्षीय पुरुष, घोटील येथील 35 वर्षीय पुरुष.
 कराड तालुक्यातील वराडे येथील 32, वर्षीय पुरुष व 23, 35 वर्षीय महिला, 17 व 15 वर्षीय युवक, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 29 वर्षीय डॉक्टर, वसंतगड येथील 31 वर्षीय महिला, पेर्ले येथील 20 वर्षीय तरुण, 16 वर्षीय तरुणी व 42 वर्षीय महिला, पोटाळे येथील 32 वर्षीय पुरुष.
 फलटण तालुक्यातील फरांदवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, चव्हाणवाडी येथील 53 व25  वर्षीय पुरुष,42 व 22 वर्षीय महिला. 
593 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
 क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 35, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 95, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  34, कोरेगांव येथील 16, वाई येथील 67, शिरवळ येथील 39, रायगवा 55, पानमळेवाडी 24, मायणी 19, महाबळेश्वर 16, पाटण 61, दहिवडी 15, व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 17 असे एकूण  593 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराउ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचीही माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...