बुधवार, २९ जुलै, २०२०

सातारा ; 68 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान 5 जणांचा मृत्यू 834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

68 नागरिकांना दिला डिस्चार्ज;उपचारा दरम्यान  5 जणांचा मृत्यू
  834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

  सातारा दि. 29 :  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 68 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 834 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच कराड तालुक्यातील दोन पुरुष,  जावली  तालुक्यातील दोन पुरुष व कोरेगांव तालुक्यातील एक पुरुष असे एकूण पाच जणांचा  मृत्यू झाला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

 घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 55 वर्षीय महिला, 
 जावली तालुक्यातील दापवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 33, 75,75,54,28,50 वर्षीय महिला 19 वर्षीय तरुणी व 11,13,3 वर्षीय बालीका व 76, 56 वर्षीय पुरुष, 
 सातारा तालुक्यातील सातारा येथील 31 वर्षीय पुरुष, तामजाई नगर येथील 30 वर्षीय पुरुष, विमल सिटी येथील 65,25,47 वर्षीय महिला,   खावली येथील 30 वर्षीय पुरुष, कर्मवीर नगर खिंडवाडी येथील 37 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष,  
 वाई तालुक्यातील शेंदुर्जणे येथील 30, 28 वर्षीय महिला 65, 48 वर्षीय पुरुष, 4 वर्षीय बालीका, 13,12 वर्षीय बालक, सायगांव येथील 64 वर्षीय महलिा, बोपेगांव येथील 35 वर्षीय पुरुष,
 खटाव तालुक्यातील खटाव येथील  50 वर्षीय महिला, डिस्कळ येथील 58, 59 वर्षीय महिला.
 कराड तालुक्यातील सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष 20 वर्षीय महिला, मलकापूर येथील 40,43 वर्षीय पुरुष, मिरगाव येथील 35 वर्षीय पुरुष, वराडे येथील 45 वर्षीय महिला, वनवासमाची येथील 60 वर्षीय पुरुष, चिखलेवाडी येथील 17 वर्षीय युवक.
 पाटण तालुक्यातील पाटण येथील 53 वर्षीय पुरुष, कासणी येथील 53 वर्षीय पुरुष, 
 महाबळेश्वर तालुक्यातील गोडवली येथील 2 वर्षाची बालीका, 22,25,46,20 व 50 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष.
 फलटण येथील लक्ष्मीनगर येथील 42,49,45 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला व 19 वर्षीय तरुणी, वारेवस्ती खामगांव येथील 62,24,52,25,22,70,26 वर्षीय पुरुष व 55,45,20 वर्षीय महिला, साखरवाडी येथील 50 वर्षीय महिला.
 माण तालुक्यातील दहिवडी येथील 65 वर्षीय पुरुष. 
834 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
 क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 22, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  35, कोरेगांव येथील 5, वाई येथील 121,खंडाळा 75,  रायगाव 61, पानमळेवाडी 115, मायणी 49, महाबळेश्वर 20, दहिवडी 14, खावली येथे 132 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 104 असे एकूण  834 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराउ येथे तपासणी करीता पाठविण्यात आले. 
उपचारा दरम्यान 5 जणांचा मृत्यू
  क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथे रेठरे बु.  ता. कराड येथील 75 वर्षीय पुरुष, सायगांव ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष व वाठार ता. कोरेगांव येथील 64 वर्षीय पुरुष या तीन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये गुरुवार पेठ कराड येथील 36 वर्षीय पुरुष व भुतेघर ता. जावली येथील 53 वर्षीय पुरुष या दोन कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाला आहे. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली. 
घेतलेले एकूण नमुने 27346
एकूण बाधित 3526
घरी सोडण्यात आलेले 1933
मृत्यू 128
उपचारार्थ रुग्ण 1465

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...