यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने सामाजिक विभागात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जनसेवा तरुण मंडळ मुंबई (मोरेवाडी) चे अध्यक्ष श्री.निवास विठ्ठल मोरे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर झाला आहे.
यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबई यांच्यावतीने युवकांना त्यांच्या तरुण वयात समाज सेवेसाठी प्रोत्साहन मिळावे. युवकांना सामाजिक हिताची कामे करण्याची गोडी लागावी व सामजिक जडणघडणीतील त्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांच्या कामाचे कौतुक करावे अशा उद्देशाने यशवंतराव चव्हाण फाउंडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सहकार, क्रिडा, क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या समाजातील निवडक लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो
श्री निवास मोरे यांच्या सामाजिक क्षेत्रातील भरीव कामगिरी लक्षात घेऊन यशवंतराव चव्हाण फाउंडेशन मुंबईचे संस्थापक अध्यक्ष श्री.संजय सावंत साहेब यांनी व त्यांच्या संपूर्ण टीमने यशवंतराव चव्हाण पुरस्कार जाहीर केला आहे.
त्यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा