सोमवार, ११ मे, २०२०

सातारा ;- आज जिल्ह्यात पंधरा कोरोना मुक्त, जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना

आज जिल्ह्यात पंधरा कोरोना मुक्त, जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना
सातारा दि. 11 ( जि. मा. का ): आज सातारा जिल्ह्यातील 15 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले. जिल्ह्यासाठी दिलासादायक घटना आहे. यामध्ये कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 11 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे एकूण 15 रुग्णांची   14 व 15 दिवसा नंतर पुन्हा चाचणी करण्यात आली. या चाचणीमध्ये हे 15 कारोना बाधीत रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. या 15 जणांना आज घरी सोडण्यात आले.
कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 11 जणांना कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश  भोसले, या कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर  यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी डॉक्टर्स, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
आत्तापर्यंत क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथून 8 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथून 23 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 4 असे जिल्ह्यातील  एकूण 35 रुग्ण कारोना मुक्त  झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

132 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल
सातारा दि. 11 (जि.मा.का) :  क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे3, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 66, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 31, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 18 व ग्रामीण रुग्णालय वाई येथे 14 असे एकूण 132 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...