सोमवार, २३ मार्च, २०२०

सातारा ; सापडला पहिला रुग्ण


सातारा: काल विलगीकरण कक्षात दाखल केलेल्या ४५ वर्षीय महिलेला खोकला असल्यामुळे रात्री उशिरा संशयित म्हणून शासकीय रुग्णालय येथे विलगीकरण कक्षात दाखल केले होते. या महिलेचा रिपोर्ट एन.आय.व्ही. पुणे यांच्याकडून प्राप्त झाला असून ही महिला कोविड-१९ बाधित असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

या महिलेला उच्च रक्तदाबाचा त्रास १५ वर्षापासून आहे. त्यावर उपचार चालू आहेत. सध्या या महिलेचा रक्तदाब नियंत्रणात आहे. तसेच या महिलेला सध्या विलगीकरण कक्षात ठेवले असून प्राथमिक तपासण्यानंतर या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले आहे.

कोणीही घाबरून जावू नये, जिल्हा प्रशासन पूर्णपणे दक्ष आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांनी जिल्हा प्रशासानाला मदत करावी.
- शेखर सिंह. जिल्हाधिकारी, सातारा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...