सोमवार, २३ मार्च, २०२०

पहिली ते आठवीची परीक्षा रद्द नववी ते अकरावीची परीक्षा १५ एप्रिल नंतर


मुंबईः महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा वाढता प्रादुर्भाव पाहता, दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. खबरादारी म्हणून शाळा, महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. दहावीच्या एका विषयाचा अखेरचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. याआधी दहावीची परीक्षा वेळेवर होणार असं सांगण्यात आलं होतं. 23 मार्चला होणारा भूगोल विषयाचा पेपर आता 31 मार्चनंतर होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतचा निर्णय घेतला.

सोमवारी होणारा पेपर आता थेट 31 मार्च नंतर होणार असून 31 मार्चनंतर या पेपरच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

याआधी पहिली ते आठवीपर्यंतची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय वर्षा गायकवाड यांनी कालच जाहीर केला होता.

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी दहावीची परीक्षा सध्या सुरू आहे. सोमवारी 23 मार्चला भूगोल आणि सामाजिक शास्त्र -2 चा पेपर आहे. दहावी बोर्डाचा शेवटचा पेपर राहिला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला 3 मार्चपासून सुरुवात झाली आहे. 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत ही परीक्षा नियोजित होती. मात्र राज्यात कोरोनाचं थैमान पाहता, शेवटचा पेपर लांबणीवर टाकला आहे.

पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द

राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना याआधीच 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शुक्रवारी इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. तर नववी ते ११ची परीक्षा १५ एप्रिलनंतर घेण्यात येणार आहे. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात शिक्षण विभागाची बैठक बोलवली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शालेय शिक्षण विभागाने तीन निर्णय घेतले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...