बीजिंग : करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या करोना व्हायरसने अत्तापर्यंत जगभरात हजारो बळी घेतले आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखीन एका व्हायरसची भर पडली आहे. 'हंता' नावाचा जीवघेणा व्हायरस चीनमध्ये पसरम्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.
'हंता' नावाचा जीवघेणा व्हायरसमुळे चीनमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर 32 लोकांची तपासणी करण्यात येत आहे. आधीच कोरोनावर औषध न सापडल्यामुळे जगभरात 16 हजार पेक्षा जास्त लोकाना प्राण गमवावे लागले आहे. त्यात आता हंताची भर पडली आहे.
युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू
चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार युन्नान प्रांतामध्ये एका व्यक्तीचा हंता या व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.हा व्यक्ती बसमधून प्रवास करत होता. या व्यक्तीला हंता व्हायरसची लागण झाली होती. यावेळी बसमध्ये 32 प्रवासी होते. आता त्यांची देखील तपासणी करण्यात आली आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या या माहितीनुसार सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*कळगावमध्ये बिबट्याचा कहर! घराशेजारील गोठ्यात घुसून 3 गाभण शेळ्या केल्या ठार, मुंबईहून गावी आलेल्या शेतकऱ्याचे स्वप्न उद्ध्वस्त*
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथे काल (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने थेट घराशेजारील गोठ्यात घुसून शेळ्यांवर भीषण हल्ला केल्याची...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा