कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना संसर्ग वाढू नये म्हणून वेगवेगळ्या प्रकारे लोक प्रयत्न करत आहेत. साताऱ्यात कुठेही सामान्य नागरिकाला पेट्रोल मिळत नाही.
केवळ अत्यावश्यक सेवा देणारे अधिकारी कर्मचारी व्यक्ती, काेराेना नियंत्रण व निर्मुलनासाठी कार्य करणारी व्यक्ती, अत्यावश्यक वस्तू व सेवा संदर्भात कार्य करणारी खाजगी व्यक्ती, वैद्यकीय उपचार किंवा सहाय्याची गरज असणारी व्यक्ती यांनाच पेट्राेल मिळेल अथवा द्यावे अशा सूचना सातारा जिल्हा पेट्राेल डिझेल पंप असाेसिएशन यांना दिल्या आहेत.
तसेच सातारा जिल्ह्यात दाेन रुग्णांचे अहवाल पाॅझिटेव्ह आले आहेत. जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहेनागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा