बुधवार, २५ मार्च, २०२०

शहरवासीयांनी नाही पण ग्रामस्थांनी गांभीर्याने घेतले; संकट टाळण्यासाठी मान्याचीवाडीकरांनी गाव सीमाबंद केले

पाटण : तालुक्यातील कुंभारगाव येथील मान्याचीवाडीत गावाबहेरील लोकांना प्रवेशबंदी करण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. कोरोना व्हायरसपासून गावाचा बचाव करण्यासाठी हा निर्णय ग्रामस्थांनी एकमताने घेतला असून गावच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत.

कराड शहरापासून पंचवीस किलोमीटर असलेले कुंभारगाव,मान्याचीवाडी आता ग्रामस्थांनी संपूर्णपणे लॉकडाऊन केले आहे. जवळपास 550 लोकसंख्येच्या गावात मोठी बाजारपेठ आहे. कोरोना सारख्या रोगाशी लढण्यासाठी ग्रामस्थांनी भविष्यामध्ये रोगाची लागण आपल्या गावांमध्ये होऊ नये म्हणून गाव अक्षरशः लॉकडाऊन केले आहे.

AD

 या सोबतच गावातील तरुण सीमेवरील रस्त्यावर पहारा देणार आहेत. या धाडसी निर्णयाचे गावातील रहिवाशांनी स्वागत केले आहे.तसेच सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...