बुधवार, २५ मार्च, २०२०

नवी दिल्ली : प्रयोगशाळेत नव्हे तर नैसर्गिकरित्या 'कोरोना' व्हायरसची 'निर्मिती'

नवी दिल्ली :  - 

एका संशोधनानुसार कोरोना विषाणूच्या जीनोम सीक्वेन्सचा अभ्यास करताना समोर आले की, कोरोना विषाणू (सार्स-सीओव्ही -2) ची उत्पत्ती प्रयोगशाळेत नाही तर नैसर्गिकरित्या झाली आहे. अमेरिकेच्या स्क्रिप्स रिसर्च इन्स्टिट्यूटसह अन्य संस्थांमधील शास्त्रज्ञांनी देखील संशोधनात असे म्हटले आहे की कृत्रिमरित्या हा विषाणू तयार झाला आहे, याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.

या अहवालात असेही म्हटले आहे की चिनी अधिकाऱ्यांनी आधीच या साथीच्या आजारास ओळखले होते. कोविड -१९ चे प्रकार झपाट्याने वाढत आहेत कारण हा विषाणू एका व्यक्तीच्या शरीरात आल्यानंतर दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरत आहे.हा विषाणू स्पाइक प्रोटीन तयार करतो, त्यास एखाद्या हुक सारखे वापरुन मानवी पेशीला एखाद्या कोल्ड ड्रिंकच्या डब्याप्रमाणे उघडतो आणि त्यात प्रवेश करतो.

नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतातून विकसित झाले हे स्पाइक्स

अहवालानुसार, या स्पाइक प्रोटीनला एखाद्या प्रयोगशाळेत अनुवांशिक अभियांत्रिकीसह विकसित करणे शक्य नाही. हे विज्ञानाच्या लोकप्रिय नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताद्वारे विकसित झाले आहे. हे आतापर्यंत ज्ञात असलेल्या कोणत्याही विषाणूच्या रचनेपेक्षा भिन्न आहे.

अफवांना विराम, सिद्धांतास बळकटी

कोरोना विषाणू एका चिनी प्रयोगशाळेतून बाहेर पडला आणि लोकांपर्यंत पोहोचला अशा अफवांना संशोधनाने विराम दिला आहे. त्याचबरोबर अमेरिकेकडून चीनमध्ये हा विषाणू पसरवल्याचा आरोपही नाकारण्यात येत आहे. या साथीच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर वैज्ञानिकांनी सांगितले होते की, हा विषाणू वन्यजीव (शक्यतो वटवाघूळ किंवा पॅंगोलिन) खाल्ल्याने कुण्या एका चिनी नागरिकापर्यंत पोहोचला आणि तेथून इतर मानवांना संसर्ग झाला. विषाणूची निर्मिती होण्याचे दोन गृहीते आहेत.

१) कुण्या एका जीवात निर्मित झाली आणि मानवामध्ये आला

हा विषाणू कुण्या एका जीवात नैसर्गिक निवडीद्वारे विकसित झाला आणि नंतर तो मानवांमध्ये आला. मागील कोरोना विषाणू 'सार्स' सिव्हेट (अंगावर ठिपके असलेला एक मांजराच्या जातीचा प्राणी) आणि 'मर्स' उंटातून आले होते. सध्याचा विषाणू वटवाघुळातून आला असावा असा विश्वास वर्तवण्यात आला आहे कारण तो त्यात आढळणाऱ्या विषाणूसारखाच आहे.

२) हा मनुष्यांमध्ये विकसित झाला असावा

असे मानण्याचे कारण की याच्याशी मिळताजुळता विषाणू पॅंगोलिन जीवात आढळतो. आणि मनुष्य या जीवांना खात असतो. त्यामुळे हा विषाणू मानवात येतो. हळूहळू नैसर्गिक निवड सिद्धांताद्वारे याने स्पाइक प्रोटीन बनविणे शिकले आणि मानवी पेशींमध्ये पोहोचण्याची क्षमता प्राप्त केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...