गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२०

धक्कादायक ; मुलाच्या उपचाराचा खर्च ऐकून वडिलांचे निधन

मंचर - घरची परिस्थिती नाजूक, त्यात एकुलत्या एक मुलाला मेंदूत रक्‍ताच्या गाठी झाल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल केले. उपचारासाठीचा खर्च ऐकून मानसिक ताणतणावातून घरातील कर्त्या वडिलांचेच निधन झाल्याची घटना वळती (ता. आंबेगाव) घडली. या घटनेमुळे लोखंडे या शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ज्ञानेश्‍वर खंडू लोखंडे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतात कष्ट करून ते उदरनिर्वाह करीत होते. मंगेश हा त्यांचा मुलगा आणि कल्याणी ही मुलगी, असा त्यांचा छोटासा परिवार. मुलगा मंगेश याला मेंदूत रक्‍ताच्या गाठी झाल्या. त्याचा परिणाम डोळ्यांवर होऊ लागल्याने पुणे येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्याला दाखल केले.सुरुवातीला दोन दिवस वडील ज्ञानेश्‍वर लोखंडे हे मंगेशजवळ थांबून होते; परंतु डॉक्‍टरांनी उपचारासाठीचा खर्च तीन लाख रुपये सांगितला. आर्थिक परिस्थिती नसल्याने पैसे जमा होणे शक्‍य नसल्याने वडील ज्ञानेश्‍वर लोखंडे हे बेचैन झाले. पैशांची सोय करण्यासाठी ते वळती गावी आले. मंगेशची आई नंदा यांना पुणे येथे हॉस्पिटलमध्ये मंगेशजवळ पाठवले; पण दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या सुमारास ज्ञानेश्‍वर लोखंडे यांचे हृदयविकाराने निधन झाले.

आर्थिक मदतीचे आवाहन
लोखंडे कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. ग्रामस्थांनी दशक्रियेच्यावेळी वीस हजार रुपये जमवून दिले. समाजातील दानशूर व्यक्‍ती, संस्थांनी मदत करावी, असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे. मदतीसाठी नंदा ज्ञानेश्‍वर लोखंडे यांच्या युनियन बॅंक शाखेतील खाते क्रमांक 550002010013364 या खात्यावर पैसे जमा करावेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2026 जाहीर*यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई चा उपक्रम*मा.सौ. आनंदीबाई दत्तात्रय शिंगारे आदर्श माता म्हणून विशेष सन्मान*

मुंबई - यशवंतराव चव्हाण फाउंडेशन, मुंबई यांच्या वतीने सामाजिक, सहकार ,संस्कृती ,साहित्य ,कला , पत्रकारिता, वैद्यकीय सेवा , क्रीड...