शनिवार, १५ फेब्रुवारी, २०२०

पशु पक्ष्यांच्या रेस्क्युसाठी खासगी संस्थेची निवड करा ; नगरसेविका वैशाली शेवाळे

मुंबई प्रतिनिधी ;-
मुंबईत मोठ्या प्रमाणात सरपटणार्‍या प्राण्यांसह बर्‍याचदा जखमी अवस्थेत पशु पक्षी आढळून येतात. त्यामुळे सर्पमित्रांसह पक्षी प्रेमी संस्थांची नावे व क्रमांक महापालिकेच्या संकेतस्थळ व प्रभाग कार्यालयांमध्ये प्रदर्शित करण्यात यावीत. तसेच महापालिकेच्यावतीने पशु पक्ष्यांना वाचवण्यासाठी खासगी स्वयंसेवी संस्थांची नेमणूक महापालिकेने करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. त्यानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
मुंबईतील निवासी भागांमध्ये सर्प आढळून आल्यास त्यांची हत्या न करता त्यांना सर्पमित्रांच्या सहाय्याने प्राणिसंग्रहालयात सोडण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात यावे तसेच सर्प मित्रांची नावे, संस्था, संपर्क क्रमांक यासंदर्भातील माहिती महापालिकेच्या संकेतस्थळासह विभाग कार्यालयातील दर्शनी भागात करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका वैशाली शेवाळे यांनी ठरावाच्या सुचनेद्वारे केली होती
परंतु ही बाब महापालिकेच्या अखत्यारितील नसल्याचे सांगत महापालिकेने आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. तसेच सर्प मित्रांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्याची तयारी दर्शवली होती.
परंतु हा प्रस्ताव पटलावर आला असता शिवसेना नगरसेवक सचिन पडवळ यांनी, पशु पक्षी प्रेमी संस्थांची निवड महापालिकेच्यावतीने करण्याची सूचना केली. आज मुंबईतील अनेक वन विभागासह डोंगराळ भागांमध्ये सरपटणारे प्राणी बाहेर येत असतात. त्यामुळे ही समस्या आहेतच. शिवाय अनेक ठिकाणी पक्षी तसेच प्राणीही कुठेतरी अडकून पडतात. त्यांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत असतात. त्यामुळे महापालिकेने खासगी पशु पक्षी प्रेमी संस्थेची नेमणूक केल्यास त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या प्राण्यांसह पक्ष्यांचीही काळजी घेतली जावू शकते, असे विधी समिती अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...