शनिवार, २ नोव्हेंबर, २०२४

समाजसेवक योगेश पाटणकर यांना मातृशोक, आईचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन.उद्या रक्षाविसर्जन व जलदान विधी.

समाजसेवक योगेश पाटणकर यांना मातृशोक, आईचे वयाच्या ७४ व्या वर्षी निधन.उद्या रक्षाविसर्जन व जलदान विधी.

कुंभारगाव ता. पाटण येथे समाजसेवक व राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री योगेश पाटणकर यांना मातृशोक झाला आहे. योगेश पाटणकर यांच्या मातोश्री श्रमती सुमन पाटणकर यांचे काल दिनांक 1 नोव्हेंबर 2024 रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद  निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात  मुले, मुली, सुना नातवंडे, परतोंडे असा मोठा परीवार आहे. रक्षाविसर्जन व जलदान विधी उद्या रविवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ठीक ०९.३०  वाजता वैकुंठधाम आनंदनगर ( कुंभारगाव ) येथे होणार आहे.

गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार!- शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन पाटणमध्ये केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदानाच्या रूपात देण्याचे शंभूराज देसाई यांचे आवाहन मल्हारपेठ नाडे विभागाचा संवाद मेळावा संपन्न.

 

विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार!- शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन

पाटणमध्ये केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदानाच्या रूपात देण्याचे शंभूराज देसाई यांचे आवाहन

मल्हारपेठ नाडे विभागाचा संवाद मेळावा संपन्न.


 

 

" साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज "

मल्हारपेठ बुधवार, दि. २४ ऑक्टोबर  : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारपासून पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या जाहीर संवाद मेळाव्यास सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या प्रचंड उपस्थितीत मल्हारपेठ विभागामध्ये बुधवारी शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर संवाद मेळावा संपन्न झाला. यावेळी विरोधकांकडे विरोध करण्यासाठी कोणताही मुद्दा नसल्याने बिनबुडाचे आरोप करत आहेत, तसेच त्यांचे 'फेक नॅरेटिव्ह' खोडून काढण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी केले. तसेच विकासाचा मुद्दा घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार असून पाटणमध्ये केलेल्या विकास कामांची पोचपावती मतदानाच्या रूपात देण्याचे आवाहन ना.शंभूराज देसाई यांनी यावेळी मतदारांना केले. 

            पाटण विधानसभा मतदारसंघातील मल्हारपेठ व नाडे विभागातील कार्यकर्त्यांचा बुधवारी ना.शंभूराज देसाई यांचा जाहीर संवाद मेळावा मल्हारपेठ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी आर.बी.पवार, विश्वनाथ पानस्कर, विजय पवार,किरण दशवंत, सुनील पानस्कर, विजय शिंदे, अशोक डिगे,पांडरंग नलवडे,शशिकांत निकम,राजकुमार कदम,सुनील पानस्कर,विजयराव देशमुख,पांडूरंग शिरवाडकर,उत्तमराव मोळावडे,प्रकाश पवार,नाथा जाधव,विजय सरगडे यांचेसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी विधानसभा निवडणुकीत ना.शंभूराज देसाई यांच्या विक्रमी मतांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला. तसेच यावेळी मल्हारपेठ विभागातील मातंग समाजातील कार्यकर्ते बंधू-भगिनींनी ना.शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. 

               यावेळी ना. शंभूराज देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, पाटण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांचे दाखले माझे कार्यकर्ते मतदारांना देतील. तसेच वाड्यामध्ये अडकलेली आमदारकी सर्वसामान्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न माझ्या रूपाने पाटणवासियांनी केला. गेल्या पाच वर्षांत ०२ हजार 10 कोटी रुपयांची कामे पाटण विधानसभा मतदारसंघात केल्याचे शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले. पाटणवासियांच्या अडचणीच्या काळात विरोधक कुठेही फिरकले नाहीत आणि आता निवडणुकीच्या काळात ते सर्वांच्या दरवाज्यावर जाताहेत. ज्या ग्रामपंचायतीमधून माझ्यावर त्यांनी टिका केली, ती ग्रामपंचायतसुद्धा आता त्यांच्या ताब्यात राहिलेली नाही,अशा शब्दांत शंभूराज देसाई यांनी पाटणकरांच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.   

               तसेच आम्ही विकासकामांमध्ये कधीही गटातटाचे राजकारण केले नाही. पाटणमध्ये ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर केले. पाटणमध्ये पोलिस प्रशिक्षण केंद्राची मंजुरी घेतली असून, लवकरच त्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती शंभूराज देसाई यांनी याप्रसंगी उपस्थितांना दिली. पाटण विधानसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर ही निवडणूक लढवण्याचा निर्धार शंभूराज देसाई यांनी प्रसंगी बोलून दाखवला आणि विकासाला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

विकासाला मतदान करण्याचे शंभूराज देसाई यांचे पाटणवासियांना आवाहन.कुंभारगाव आणि मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात मेळावे संपन्न.

 समृद्ध महाराष्ट्रात समृद्ध पाटण घडवायचे आहे ! - शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन

विकासाला मतदान करण्याचे शंभूराज देसाई यांचे पाटणवासियांना आवाहन

पाटण मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या जाहीर संवाद मेळाव्यांना सुरुवात.


कुंभारगाव आणि मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात मेळावे संपन्न

 


 


पाटण

साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज

(बुधवार, दि. २३ ऑक्टोबर २०२४) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारपासून पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या जाहीर संवाद मेळाव्यांस सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या तुडुंब उपस्थितीत कुंभारगाव आणि मंद्रुळकोळे या जिल्हा परिषद गटांमध्ये बुधवारी शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर संवाद मेळावे संपन्न झाले. यावेळी निवडणुका आल्यावर जे घराबाहेर पडतात, त्यांना ओळखा. सर्वसामान्यांची जाण असणाऱ्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा द्या, असे सांगत विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी मतदारांना केले.

पाटण विधानसभा मतदारसंघातील कुंभारगाव जिल्हा परिषद गटातील गुढे येथे व मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील ढेबेवाडी येथे बुधवारी शंभूराज देसाई यांचे जाहीर संवाद मेळावे आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. दिलीपराव चव्हाण, पंजाबराव देसाई, विलास गोडांबे, अनिल शिंदे, धनाजी गुजर, मधुकर पाटील, दत्ता चोरगे, मनोज मोहिते, अंकुश महाडिक, जोतीराज काळे, रणजित पाटील, शिवाजी शेवाळे, विकास गिरीगोसावी, नाना साबळे, मनोज पाटील, संभाजी चव्हाण, सचिन यादव, प्रभाकर शेलार, सागर नलवडे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई यांच्या विक्रमी मतांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी शंभूराज देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, आत्ताचा मतदारराजा हा जागृत आहे. त्याला मतदारसंघात कोणी विकासकामे केली आणि कोणी केली नाही, याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे यावेळी मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. आजवर पाटण मतदारसंघाचा विकास हेच एकमेव ध्येय ठेवून काम केले आहे. मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. येणाऱ्या काळात पाटण मतदारसंघाला विकासकामाच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेवटचे मत मतपेटीमध्ये जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वस्थ बसू नये, अशी सूचना शंभूराज देसाई यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिली. तसेच तालुक्यासाठी दिवसरात्र झटणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आजवर काम केले आहे. समृद्ध महाराष्ट्रात समृद्ध पाटण घडवण्याचे आमचे स्वप्न आहे. त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला साथ देऊन विधानसभेत पुन्हा प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्या, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी यावेळी मतदारांना केले. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांनाही टोले लगावले. विरोधकांनी डोंगरावर पवनचक्की उभारण्याच्या नावाखाली स्वत:चाच लाभ करून घेतल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. मात्र, जिथे कधीकाळी सायकल जाऊ शकत नव्हती, तिथे आता चारचाकी गाड्या पोहोचण्यासारखे गुळगुळीत रस्ते आमच्या कार्यकाळात तयार झाले आहेत. त्यामुळे बोलण्यापेक्षा विकासकामांवर भर देण्याची आमची भूमिका राहिली असून पाटणचा विकास करू शकेल अशा नेत्यालाच विधानसभेत पाठवावे लागेल, हे मतदारांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी केली आणि पाच हप्ते मायभगिनींच्या खात्यात जमा झाल्याचे सांगत, यावेळी विकासाला मतदान करण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी सर्व उपस्थितांना केले.


शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

वाढदिनीच अक्षय माने ने उचलंल टोकाचं पाऊल..; मृतदेहाजवळ भिंतीवर विटेच्या तुकड्यानं लिहिलं होतं 'सॉरी'

वाढदिनीच अक्षय माने ने उचलंल टोकाचं पाऊल..; मृतदेहाजवळ भिंतीवर विटेच्या तुकड्यानं लिहिलं होतं 'सॉरी'


ढेबेवाडी : वाढदिनीच युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री नाईकबानगर (बनपुरी, ता.पाटण) येथे उघडकीस आली. अक्षय अशोक माने उर्फ बंडा (वय २७) असे संबंधित युवकाचे नाव आहे. ढेबेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत ढेबेवाडी पोलिसांकडून मिळालेली  माहिती अशी,की  नाईकबानगर (बनपुरी) येथील अक्षय माने याचा श्री क्षेत्र नाईकबा येथे पूजेचे साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. काल अक्षयचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याचे नियोजनही घरात सुरू होते. मात्र, दुपारनंतर अक्षय मोबाईलला रेंज मिळत नसल्याने बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, बराच वेळ होऊनही तो न परतल्याने कुटुंबीयांनी मोबाईलवरून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

संपर्क होत नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्या परिसरात शोधाशोध करण्यास सुरुवात केल्यावर रात्री आठच्या सुमारास जवळच असलेल्या नाईकबा- अंबवडे खुर्द रस्त्यानजीकच्या पडक्या घरात दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत अक्षयचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी भिंतीवर विटेच्या तुकड्याने 'सॉरी' लिहिल्याचेही आढळले. अक्षयचा परिसरात चांगला लोकसंपर्क असून, त्याने वाढदिनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. 

उत्तरीय तपासणीनंतर अक्षयचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. काल सकाळी नाईकबानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षयच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. बंडा नावाने तो परिसरात परिचित होता. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश भोसले, संजय थोरात, पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार आदींनी भेट दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

मंगळवार, १५ ऑक्टोबर, २०२४

ढेबेवाडी फाट्याजवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली,


ढेबेवाडी फाट्याजवळ शस्त्रधारी टोळक्याने कारमधून हवालाची 3 कोटींची रक्कम लुटली, 

       संग्रहित चित्र
मलकापूरातील ढेबेवाडी फाटा येथे शस्त्रधारी पाच जणांच्या टोळक्याने कारमधील 3 कोटींची रक्कम लुटली. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. लुटलेली रक्कम हवाला मार्फत मुंबईहून दक्षिण भारतात नेली जात होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली असून मोठ्या रकमेची लूट होवूनही रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा नोंद झाला नव्हता. फिर्यादीकडेही कसून चौकशी सुरू असून फिर्याद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मुबंईला हवाल्याने पैसे पोचविणाऱ्या कंपनीचा काऱभार दक्षिण भारतात मोठ्या शहरात आहे. संबंधित कंपनीची कार सुमारे 3 कोटींची रक्कम घेऊन सोमवारी रात्री मुंबईहून दक्षिण भारतात पैसे पोच करण्यासाठी निघाली होती. ती कार निघाली होती. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कार कराडमध्ये आली. मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यावर कारला वाहन आडवे मारून ती अडविण्यात आली.
त्या कारमधून पाच ते सहा जण उतरले. त्यांच्याकडे पिस्तुलांसह धारदार शस्त्रे होती. त्याचा धाक दाखवून त्यांनी कारमधील सुमारे 3 कोटींची रक्कम लंपास केली. ती रक्कम घेवून ते मुंबईच्या दिशेने पळाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांची तपासाची सुत्रे हलली आहे. त्यानुसार चौघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. यातील मुख्य सुत्रधार अद्यापही पोलासांच्या हाती लागलेला नाही. उद्यापर्यंत यातील रक्कम व संशयीत अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान, महामार्गावर झालेल्या मोठ्या लुटीमुळे अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर येथे तळ ठोकून होत्या. पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर, पोलिस निरिक्षक राम ताशीलदार यांच्यासह डीबी, एलसीबीच्या व पोलिस उपाधीक्षकांच्या पथकाने तपासाची सुत्रे हलवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही तपासले असून त्यानुसार आधारावर तपासाला गती दिली आहे. चोरी प्रकरणात पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर; 'या' दिवशी होणार मतदान.

 महाराष्ट्र विधानसभा निवडणुका जाहीर; 'या' दिवशी होणार मतदान.


 

 

महाराष्ट्रात एका टप्प्यात विधानसभा निवडणुक होणार आहे. आज दि. १५ ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीची तारीख जाहिर केली. महाराष्ट्रात दि.२० नोव्हेंबरला मतदान होणार असून दि. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

महाराष्ट्रात ३६ जिल्ह्यातील विधानसभांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. दि. २६ नोव्हेंबर रोजी विधानसभेचा कार्यकाळ संपत असून विधानसभा निवडणूकीकडे सर्वांचे वेध लागले होते. त्यातच मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केला आहे. तरी उमेदवारांना दि. १८ ऑक्टोंबरपासून दि. २९ ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्यानंतर दि. ३० ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होणार आहे. तसेच उमेदवारांना दि. ४ नोव्हेबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे. त्याचबरोबर दि. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून दि. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

गुरुवार, १० ऑक्टोबर, २०२४

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन

टाटा समुहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे निधन.


टाटा उद्योगसमुहाचे प्रमुख रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

बुधवारी (दि.9) साडे अकरा वाजता त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाने भारतासह जगभरातील उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे.

दोन दिवसांपुर्वी रक्तदाब कमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत होत्या. त्यानंतर 'काळजीचे कोणतेही कारण नाही. वैद्यकीय तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात आणले गेले आहे' असे त्यांच्याकडून कळवण्यात आले होते. मात्र बुधवारी ब्रीज कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मावळली आहे.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...