गुरुवार, २४ ऑक्टोबर, २०२४

विकासाला मतदान करण्याचे शंभूराज देसाई यांचे पाटणवासियांना आवाहन.कुंभारगाव आणि मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात मेळावे संपन्न.

 समृद्ध महाराष्ट्रात समृद्ध पाटण घडवायचे आहे ! - शंभूराज देसाई यांचे प्रतिपादन

विकासाला मतदान करण्याचे शंभूराज देसाई यांचे पाटणवासियांना आवाहन

पाटण मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या जाहीर संवाद मेळाव्यांना सुरुवात.


कुंभारगाव आणि मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटात मेळावे संपन्न

 


 


पाटण

साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज

(बुधवार, दि. २३ ऑक्टोबर २०२४) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाची अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बुधवारपासून पाटण विधानसभा मतदारसंघात शंभूराज देसाई यांच्या जाहीर संवाद मेळाव्यांस सुरुवात झाली आहे. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ग्रामस्थांच्या तुडुंब उपस्थितीत कुंभारगाव आणि मंद्रुळकोळे या जिल्हा परिषद गटांमध्ये बुधवारी शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर संवाद मेळावे संपन्न झाले. यावेळी निवडणुका आल्यावर जे घराबाहेर पडतात, त्यांना ओळखा. सर्वसामान्यांची जाण असणाऱ्या उमेदवाराला विधानसभा निवडणुकीत पाठिंबा द्या, असे सांगत विकासाच्या मुद्द्यावर मतदान करण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी मतदारांना केले.

पाटण विधानसभा मतदारसंघातील कुंभारगाव जिल्हा परिषद गटातील गुढे येथे व मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील ढेबेवाडी येथे बुधवारी शंभूराज देसाई यांचे जाहीर संवाद मेळावे आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. दिलीपराव चव्हाण, पंजाबराव देसाई, विलास गोडांबे, अनिल शिंदे, धनाजी गुजर, मधुकर पाटील, दत्ता चोरगे, मनोज मोहिते, अंकुश महाडिक, जोतीराज काळे, रणजित पाटील, शिवाजी शेवाळे, विकास गिरीगोसावी, नाना साबळे, मनोज पाटील, संभाजी चव्हाण, सचिन यादव, प्रभाकर शेलार, सागर नलवडे आदी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी विधानसभा निवडणुकीत शंभूराज देसाई यांच्या विक्रमी मतांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी शंभूराज देसाई यांनी उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी ते म्हणाले की, आत्ताचा मतदारराजा हा जागृत आहे. त्याला मतदारसंघात कोणी विकासकामे केली आणि कोणी केली नाही, याची पुरेपूर जाणीव आहे. त्यामुळे यावेळी मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत, याची काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे. आजवर पाटण मतदारसंघाचा विकास हेच एकमेव ध्येय ठेवून काम केले आहे. मतदारसंघात विविध विकासकामे मार्गी लावली आहेत. येणाऱ्या काळात पाटण मतदारसंघाला विकासकामाच्या बाबतीत महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शंभूराज देसाई यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पाटण विधानसभा मतदारसंघातील शेवटचे मत मतपेटीमध्ये जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वस्थ बसू नये, अशी सूचना शंभूराज देसाई यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिली. तसेच तालुक्यासाठी दिवसरात्र झटणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आजवर काम केले आहे. समृद्ध महाराष्ट्रात समृद्ध पाटण घडवण्याचे आमचे स्वप्न आहे. त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला साथ देऊन विधानसभेत पुन्हा प्रतिनिधीत्व करण्याची संधी द्या, असे आवाहन शंभूराज देसाई यांनी यावेळी मतदारांना केले. तसेच यावेळी त्यांनी विरोधकांनाही टोले लगावले. विरोधकांनी डोंगरावर पवनचक्की उभारण्याच्या नावाखाली स्वत:चाच लाभ करून घेतल्याचे देसाई यांनी यावेळी सांगितले. मात्र, जिथे कधीकाळी सायकल जाऊ शकत नव्हती, तिथे आता चारचाकी गाड्या पोहोचण्यासारखे गुळगुळीत रस्ते आमच्या कार्यकाळात तयार झाले आहेत. त्यामुळे बोलण्यापेक्षा विकासकामांवर भर देण्याची आमची भूमिका राहिली असून पाटणचा विकास करू शकेल अशा नेत्यालाच विधानसभेत पाठवावे लागेल, हे मतदारांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. तसेच 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशस्वी केली आणि पाच हप्ते मायभगिनींच्या खात्यात जमा झाल्याचे सांगत, यावेळी विकासाला मतदान करण्याचे आवाहन शंभूराज देसाई यांनी सर्व उपस्थितांना केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...