शुक्रवार, १८ ऑक्टोबर, २०२४

वाढदिनीच अक्षय माने ने उचलंल टोकाचं पाऊल..; मृतदेहाजवळ भिंतीवर विटेच्या तुकड्यानं लिहिलं होतं 'सॉरी'

वाढदिनीच अक्षय माने ने उचलंल टोकाचं पाऊल..; मृतदेहाजवळ भिंतीवर विटेच्या तुकड्यानं लिहिलं होतं 'सॉरी'


ढेबेवाडी : वाढदिनीच युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री नाईकबानगर (बनपुरी, ता.पाटण) येथे उघडकीस आली. अक्षय अशोक माने उर्फ बंडा (वय २७) असे संबंधित युवकाचे नाव आहे. ढेबेवाडी पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

याबाबत ढेबेवाडी पोलिसांकडून मिळालेली  माहिती अशी,की  नाईकबानगर (बनपुरी) येथील अक्षय माने याचा श्री क्षेत्र नाईकबा येथे पूजेचे साहित्य विक्रीचा व्यवसाय आहे. काल अक्षयचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याचे नियोजनही घरात सुरू होते. मात्र, दुपारनंतर अक्षय मोबाईलला रेंज मिळत नसल्याने बाहेर जाऊन येतो, असे सांगून घरातून निघून गेला. मात्र, बराच वेळ होऊनही तो न परतल्याने कुटुंबीयांनी मोबाईलवरून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.

संपर्क होत नसल्याने कुटुंबीय व ग्रामस्थांनी त्या परिसरात शोधाशोध करण्यास सुरुवात केल्यावर रात्री आठच्या सुमारास जवळच असलेल्या नाईकबा- अंबवडे खुर्द रस्त्यानजीकच्या पडक्या घरात दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत अक्षयचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी भिंतीवर विटेच्या तुकड्याने 'सॉरी' लिहिल्याचेही आढळले. अक्षयचा परिसरात चांगला लोकसंपर्क असून, त्याने वाढदिनी उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे अनेकांना मोठा धक्का बसला. 

उत्तरीय तपासणीनंतर अक्षयचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. काल सकाळी नाईकबानगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अक्षयच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. बंडा नावाने तो परिसरात परिचित होता. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक डॉ. प्रवीण दाईंगडे, पोलिस उपनिरीक्षक गणेश भोसले, संजय थोरात, पोलिस पाटील दत्तात्रय कुंभार आदींनी भेट दिली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

*पाटण तालुक्यातील ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ७५० विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..*

*पाटण तालुक्यातील  ७८ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील  ७५०  विद्यार्थ्यांना रेनकोटचे वाटप..* पाटण :- पाटण तालुका दुर्गम, डोंगराळ,व...