सोमवार, २६ जून, २०२३

संजय रावताने बाळासाहेब ठाकरेंचा अवमान थांबवावा , अन्यथा शिवभक्त सातारकर तुमच्या तोंडात शेण घालतील..! - जयवंतराव शेलार

 



सातारा / प्रतिनिधी
ज्याने आपल्या भंपक आणि वाचळवीर तोंडाने ठाकरे सेना संपवली आहे त्या संज्या रावताची लोकनेते किंवा त्यांचे नातू संसदपटू उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर बोलण्याची लायकी नाहीच मात्र त्याने सातारा जिल्ह्यात येऊन हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा केली किंवा त्यांच्या विचारांचा अवमान थांबवला नाही तर त्याच्या तोंडात शेण कोंबण्याची धमक लोकनेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या ठायी नक्की आहे असा इशारा शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की,भंपक आणि खाणेरड्या तोंडाने सुसंस्कृत महाराष्ट्रात घाण काळवणारा संज्या राऊत आज शिवरायांची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यात आला. 
ज्याला त्याचा बाप आणि त्याचा आजोबा नीट सांगता आला नाही तो हरामखोर सातारा जिल्ह्यत येऊन भुंकतो आहे?

बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना स्थापन करत होते तेंव्हा पक्षीय भेद विसरून लोकनेते त्यांच्या पाठीशी होते. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी उभ्या आयुष्यात लोकनेते यांच्या घराण्याकडे  पूर्ण सन्मानाने पाहिले.

लोकनेते यांचे नातू शंभूराज हे हिंदुहृदयसम्राट यांच्या समीप येणार हे समजल्यावर स्वतः बाळासाहेब ठाकरे यांनी "शंभूराजला इकडे बोलवू नका, मीच तिकडे जाणार" असे सांगून शंभुराजेंचा सन्मान केला होता.

तेंव्हा हे भंपक चिटोऱ्या गिरगट बसायचं. त्याला काय हे माहीत? उगाच ट ला ट आणि र ला र लावून शिव्या खाणाऱ्या संज्याला म्हणूनच सारा महाराष्ट्र शिव्यांची लाखोली वाहत आहे.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांनी पहिला लाल दिवा देऊन सन्मान केला आणि शंभूराज यांना आपल्या कवेत घेतले. ही होती बाळासाहेब ठाकरे यांची संस्कृती. 

याच संस्कृतीला तिलांजली देणारा हा संज्या राऊत केवळ लोकनेते, त्यांचे नातू शंभूराज यांचाच नव्हे तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा अवमान करत आहे. 

ठाकरे - देसाई या घराण्यातील ऋणानुबंध हे गेल्या तीन पिढ्यापासून आहेत. आजतागायत यावर कोणी अवाक्षर कोणी बोलले नाही. 
म्हणजेच
कोणी  भुंकला म्हणून हे ऋणानुबंध दुरावणार नाहीत. 

संजय रावताने किमान सातारा जिल्ह्यात येताना तरी तोंडाला लगाम लावावा, नायतर इथली शिवभक्त जनता कोणताही पक्षभेद किंवा गटभेद न ठेवता त्याच्या तोंडात शेण कोंबल्या शिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा ही प्रसिद्धी पत्रकातून देण्यात  आला आहे.


रविवार, २५ जून, २०२३

*पाटण - हर्षवर्धन शेजवळ यांची नवोदयसाठी निवड*

*हर्षवर्धन शेजवळ यांची नवोदयसाठी निवड* 
पाटण -मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचा विदयार्थी कु.हर्षवर्धन सतिश शेजवळ यांची केंद्रीय नवोदय विदयालय सातारा येथे नुकतीच निवड झाली असून तो मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे  माजी शेती अधिकारी श्री.डी.एम शेजवळ यांचा नातू आहे.या निवडीबद्दल हर्षवर्धनचे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्ह्यांचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईसाहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा,युवा नेते जयराज देसाई,आदित्यराज देसाई,विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे ,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री.एन.एस.कुंभार,तसेच विदयालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,व आजी-माजी विदयार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

शुक्रवार, २३ जून, २०२३

रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट, खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण

 

रास्त भाव दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बॅंका, पोस्ट, खासगी बँकाच्या सेवाही उपलब्ध करणार – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण


 

मुंबई, दि. २२ : राज्यातील रास्त भाव दुकानांमधून नागरिकांसाठी राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार व रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कायद्यानुसार सूचीबद्ध खासगी बँकांच्या सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. राज्यामध्ये सुमारे ५३ हजार पेक्षा अधिक रास्त भाव दुकाने असून त्याचा फायदा शहरासह ग्रामीण भागातील जनतेला होणार असल्याचेही श्री. चव्हाण यांनी सांगितले.

दि. १ सप्टेंबर, २०१८ रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात सुलभ, परवडणारी, आणि विश्वासार्ह बॅंक बनविण्याच्या दृष्ट‍िकोनातून इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅंकची सुरुवात केली. धन हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), बिल भरणा, आरटीजीएस आदी सुविधा या बॅंकेतर्फे देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर रास्त भाव दुकानांमध्ये बँकामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध करण्यात येणार आहेत. तसेच या  माध्यमातून रास्त भाव दुकानदारांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रास्त भाव दुकानदारांमध्ये जागरुकता निर्माण करुन जेथे शक्य असेल तेथे बँकेच्या सेवा सुरु करण्यात येणार आहे.

शिधावाटप /रास्त भाव दुकानदारांना  ऐच्छिकरित्या बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून नियुक्त करता येणार आहे.  रास्त भाव दुकानदारांच्या उत्पन्न वाढीसाठी तसेच शहरासोबत ग्रामीण भागातील नागरिकांनाही या उपक्रमातून लाभ होणार आहे.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या संकल्पनेतून दि. 9 डिसेंबर, 2020 रोजी देशातील नागरिकांसाठी सुरु केलेल्या ‘पीएम-वाणी’ या उपक्रमाची राज्यातील शिधावाटप/रास्त भाव दुकानांमधून अंमलबजावणी करण्यास दि. ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरुवात करण्यात आली आहे. पीएम-वाणी  उपक्रमाच्या माध्यमातून रास्त भाव दुकानापासून 150 ते २०० मीटरच्या परिघात येणाऱ्या  सर्व जनतेला रास्त दरात वाय-फाय सुविधेचा लाभ  मिळणार आहे.

तसेच बॅंकिंगच्या या सुविधा प्रत्यक्ष दुकानांमध्ये सुरु करण्यापूर्वी या सुविधेच्या वापराबाबत रास्त भाव दुकानदारांना संबंधित बॅंकेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित बँकेमार्फत या उपक्रमाची अंमलबजावणी, सुविधा व समन्वयासाठी राज्यस्तरावर तसेच जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे, असेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

 

बुधवार, २१ जून, २०२३

कुठरे- कला शिक्षक दीक्षित डी.एस.राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

कुठरे-  कला शिक्षक दीक्षित डी.एस.राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्काराने सन्मानित



तळमावले/वार्ताहर
राजर्शी शाहुंच्या समतावादी नगरीतील धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार त्यांना साहित्यिक व विचारवंत डाॅ.बाबुराव गुरव यांच्या हस्ते देण्यात आला. कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी ट्रस्टच्या अध्यक्षा अॅड.करुणा विमल, प्रमुख पाहुणे आ.ऋतुराज पाटील, प्रा.आ.जयंत आसगांवकर, माजी आमदार राजीव आवळ व अन्य मान्यवर यांच्या हस्ते देण्यात आला.
यावेळी डी.एस.दीक्षित यांच्यासमवेत सौ.रुक्मिणी दीक्षित, चेतन दीक्षित, ज्योती दीक्षित, वैशाली सुतार, रविराज सुतार, गणेश वाईकर, सुनिल आसवले, भोई बी.बी. हे उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल डी.एस.दिक्षीत यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.


शिवतीर्थाबाबतचे राजकारण थांबवा! शिवभक्त लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने पोवई नाक्यावर होणाऱ्या आयलँडबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांची कीव करावीशी वाटते. - पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मांडली भूमिका

 शिवतीर्थाबाबतचे राजकारण थांबवा!

शिवभक्त लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने पोवई नाक्यावर होणाऱ्या आयलँडबाबत गैरसमज पसरवणाऱ्यांची कीव करावीशी वाटते.

- पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मांडली भूमिका

Shambhuraj Desai News: लोकांची मागणी आली तर... मंत्री शंभूराज देसाई यांचे  Dry Day बाबत मोठे विधान! Maharashtra Politics Shivsena Leader Shambhuraj  Desai Big Statement On Dry Day

सातारा : पोवई नाका परिसरात लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या नावाने प्रस्तावित आयलँड सुशोभीकरणाबाबत निराधार वाद निर्माण करत गैरसमज पसरवले जात असताना पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवभक्त असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने होणाऱ्या आयलँडबाबत शिवतीर्थाची किनार लावून सामान्य जनतेच्या मनात जाणीवपूर्वक काही अपप्रवृत्तीच्या मंडळींकडून गैरसमज निर्माण केले जात आहेत. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी देसाई परिवाराला अपार श्रद्धा व आदर असून आयलँडबाबत सामान्य जनतेच्या मनात गैरसमज पसरवणाऱ्यांची कीव करावीशी वाटते, अशी भावना मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी व्यक्त केली. तसेच सातारा जिल्हा आणि राज्याला नवी दिशा देणाऱ्या शिवभक्त लोकनेत्यांच्या बाबतीत सुरू असलेले राजकारण थांबले पाहिजे, असे प्रतिपादन मा. ना शंभूराज देसाई साहेबांनी केले.

पोवई नाक्यावर शिवभक्त लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौकाचे नामकरण केले जाणार असल्याच्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या काहींनी समाजमाध्यमांतून प्रसारित केल्या होत्या. त्यानंतर प्रस्तावित आयलँडबाबत शिवतीर्थ केंद्रस्थानी ठेवून काही मंडळींनी जाणीवपूर्वक विरोधाचे राजकारण सुरू केले. याबाबत मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. छत्रपती शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास जनतेला माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींतील बारा बलुतेदारांना सोबत घेऊनच स्वराज्य कार्य केले. शिवरायांनी आपल्या मावळ्यांपासून स्वतःला कधीच वेगळे केले नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे आणि तो कायम राहील. त्यामुळे सामान्य व सुज्ञ जनता आयलँडबाबत पसरवल्या जाणाऱ्या गैरसमजांना भिक घालणार नाही, असा विश्वास असल्याचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी सांगितले. तसेच सातारा शहरातील शिवतीर्थ हे सातारकरांच्या आणि संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असून याबाबत आम्हा सर्वांना आदराची भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ स्मारकात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने चौक तयार करण्याचे कोणतेही काम प्रस्तावित नाही. तर पोवई नाका परिसरात शिवतीर्थ स्मारक सोडून इतर ठिकाणी आयलँड तयार करण्यासाठीचा प्रस्ताव असून शिवतीर्थाला लोकनेते बाळासाहेब देसाई चौक असे नामकरण करण्याचा कोणताही विचार अथवा प्रस्ताव नाही. शिवतीर्थ परिसर वगळता पोवई नाक्याचा इतर परिसर विस्तृत आहे. त्या ठिकाणी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने स्मारकरूपी आयलँड विकसित करण्यात येणार असल्याचे मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी स्पष्ट केले आहे.

यासंदर्भात मा. ना. शंभूराज देसाई साहेब पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याचा लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यावर मोठा प्रभाव होता. लोकनेते बाळासाहेब देसाई हे खऱ्या अर्थाने शिवभक्त होते. त्यांनी ते प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवून दिले होते. शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा शिवभक्त असलेल्या लोकनेते बाळासाहेब देसाई यांनीच उभा केला आहे. एवढेच नाही, तर मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि शिवाजी पार्क येथील शिवरायांचे पुतळे, कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ यांची उभारणीदेखील लोकनेते बाळासाहेब देसाई यांनीच केली आहे. असे असताना त्यांच्याच बाबतीत दिशाभूल करत केले जात असलेले राजकारण थांबले पाहिजे, असे प्रतिपादन मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी यावेळी केले. तसेच आयलँडबाबत राजघराण्याची काही शंका असल्यास त्यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली जाईल. देसाई परिवाराला आणि लोकनेते बाळासाहेब देसाई प्रेमींना छत्रपती शिवाजी महाराजांविषयी नेहमीच श्रद्धा व आदर आहे आणि कायम राहणार आहे, अशी भावना व्यक्त करत जनतेला सोबत घेऊन पोवई नाका येथे लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आयलँड उभारणारच, अशी निर्धारपूर्वक भूमिका मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी मांडली.

मंगळवार, २० जून, २०२३

न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा, केबिनेट मंत्री शंभूराज देसाई, जयकुमार गोरे पराभवाच्या छायेत;

न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा, केबिनेट मंत्री शंभूराज देसाई, जयकुमार गोरे पराभवाच्या छायेत; 

 महाराष्ट्रात सध्या रोज एक नवीन सर्व्ह होत आहे.त्यातच न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक धक्कादायक निकाल लागतील, असे अंदाज वर्तविण्यात आलेले आहेत.त्यात सातारा जिल्हा त्याचा केंद्रबिंदू असेल, असा हा सर्व्हे सांगतो. त्यात काँग्रेसचे नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विद्यमान कॅबिनेट मंत्री शूंभराज देसाई, भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. 

सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा, तर भाजपला  दोन जागा मिळतील, असे या सर्व्हेत म्हटले आहे. यामध्ये फलटण, वाई, कोरेगाव, माण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघात राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण असल्याचे म्हटले आहे. त्याखालोखाल भाजपला सातारा आणि कराड दक्षिण या दोन जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या रुपाने सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. मात्र, त्यांचाही आता निवडणूक झाली तर पराभव होईल, असे सर्व्हेत नमूद करण्यात आलेले आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये कमळ फुलण्याचा अंदाज असून अतुल भोसले यांच्या रुपाने कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपचा आमदार होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

कोरेगावमध्ये मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेच्या महेश शिंदेंकडून धक्कादायक पराभव झाला होता. मात्र, आता निवडणूक झाली तर शिंदे हे मागील पराभवाचे उट्टे काढण्याचा अंदाज आहे. माणमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना धक्का बसण्याची शक्यता असून या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मागील निवडणुकीत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला होता, ते आता निवडणुका झाल्या तर जिंकतील, असे सर्व्हेत म्हटले आहे.शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील चेहरा असलेले विद्यमान कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी धोक्याची घंटा या सर्व्हेने वाजवली आहे. पाटणमधून देसाई यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार होईल, असा अंदाज या सर्व्हेत आहे. येथून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाईंना कडवी टक्कर दिली होती.राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील, मकरंद जाधव, दीपक चव्हाण, हे तिघे, तर भाजपकडून शिवेंद्रराजेसिंह भोसले हे पुन्हा आमदार होणार, असे हा सर्व्हेत म्हटलेले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धक्कादायक निकाल आता निवडणुका झाल्या तर लागतील, असे यात नमूद कण्यात आलेले आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याकडून रुपये 150/- प्र.मे.टन प्रमाणे ऊसबिल बँक खाती वर्ग. चेअरमन यशराज देसाई यांची माहिती.


 

दौलतनगर दि.19: लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 च्या गळीत हंगाम राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने यशस्वीपणे पार पाडत गळीतास आलेल्या ऊसाच्या एफ.आर.पी.पोटी रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे होणारी रक्कम रु.325.48 लाख संबंधित ऊस पुरवठादारांच्या बँक खाती आजरोजी वर्ग करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यांनी प्रसिध्दीपत्रकांत देण्यात आली आहे.

        पत्रकात पुढे म्हंटले आहे की, आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये 2,16,982.920 मे.टन ऊस गाळप करुन सरासरी 12.07 टक्के साखर उताऱ्याने 2,61,790 क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.कारखान्याची सन 2022-23 चे गळीत हंगामामध्ये अंदाजित निव्वळ देय एफ.आर.फी.रु.2800/- प्र.मे.टन होत असून हंगाम 2022-23 मधील एफ.आर.पी.पोटी रु.2500/- प्र.मे.टन प्रमाणे यापूर्वीच रु. 5424.57 लाख रक्कम ऊस पुरवठादारांना अदा केली आहे. तसेच उर्वरित रकमेपोटी रक्कम रु. 150/- प्र.मे.टन प्रमाणे रु.325.48 लाख आज संबंधित ऊस पुरवठादारांचया बँक खाती आजरोजी वर्ग केली असून संबंधित ऊस पुरवठादारांनी संबंधित सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संबंधित शाखेशी संपर्क साधावा असे सांगत ते पुढे म्हणाले की,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक व महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्कमंत्री व सातारा,ठाणे जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली कारखाना व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन करुन सन 2023-24 च्या गळीत हंगामाची तयारी सध्या सुरु असून आधुनिकीकरणासह विस्तारीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन दुसऱ्या टप्प्याचे कामकाज प्रगतीपथावर आहे.तसेच उर्वरित शिल्लक एफ.आर.पी.पोटी देय रक्कम लवकरच अदा करण्याचा कारखाना व्यवस्थापनाचा प्रयत्न राहणार आहे. तसेच कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक सभासद शेतकरी यांनी आपला पिकविलेला सर्व ऊस आपले लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास नोंद सन 2023-24 चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही शेवटी प्रसिध्दीपत्रकांत केले आहे.


*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...