पाटण -मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयाचा विदयार्थी कु.हर्षवर्धन सतिश शेजवळ यांची केंद्रीय नवोदय विदयालय सातारा येथे नुकतीच निवड झाली असून तो मोरणा शिक्षण संस्थेचे सचिव व लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे माजी शेती अधिकारी श्री.डी.एम शेजवळ यांचा नातू आहे.या निवडीबद्दल हर्षवर्धनचे महाराष्ट्र राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच सातारा व ठाणे जिल्ह्यांचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाईसाहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा,लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई दादा,युवा नेते जयराज देसाई,आदित्यराज देसाई,विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.एल.केंडे ,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव श्री.एन.एस.कुंभार,तसेच विदयालयातील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,व आजी-माजी विदयार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा