न्यूज एरेना इंडिया' या संस्थेने केलेल्या सर्व्हेनुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा, केबिनेट मंत्री शंभूराज देसाई, जयकुमार गोरे पराभवाच्या छायेत;
सातारा जिल्ह्यात विधानसभेच्या आठ जागा असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सहा, तर भाजपला दोन जागा मिळतील, असे या सर्व्हेत म्हटले आहे. यामध्ये फलटण, वाई, कोरेगाव, माण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघात राष्ट्रवादीला अनुकूल वातावरण असल्याचे म्हटले आहे. त्याखालोखाल भाजपला सातारा आणि कराड दक्षिण या दोन जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांच्या रुपाने सातारा जिल्ह्यात काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. मात्र, त्यांचाही आता निवडणूक झाली तर पराभव होईल, असे सर्व्हेत नमूद करण्यात आलेले आहे. कऱ्हाड दक्षिणमध्ये कमळ फुलण्याचा अंदाज असून अतुल भोसले यांच्या रुपाने कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपचा आमदार होईल, अशी शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
कोरेगावमध्ये मागील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांचा शिवसेनेच्या महेश शिंदेंकडून धक्कादायक पराभव झाला होता. मात्र, आता निवडणूक झाली तर शिंदे हे मागील पराभवाचे उट्टे काढण्याचा अंदाज आहे. माणमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे यांना धक्का बसण्याची शक्यता असून या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. मागील निवडणुकीत माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा अवघ्या तीन हजार मतांनी पराभव झाला होता, ते आता निवडणुका झाल्या तर जिंकतील, असे सर्व्हेत म्हटले आहे.शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे सातारा जिल्ह्यातील चेहरा असलेले विद्यमान कॅबिनेट मंत्री शंभूराज देसाई यांच्यासाठी धोक्याची घंटा या सर्व्हेने वाजवली आहे. पाटणमधून देसाई यांचा पराभव होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. या ठिकाणी राष्ट्रवादीचा आमदार होईल, असा अंदाज या सर्व्हेत आहे. येथून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर यांनी शंभूराज देसाईंना कडवी टक्कर दिली होती.राष्ट्रवादीचे बाळासाहेब पाटील, मकरंद जाधव, दीपक चव्हाण, हे तिघे, तर भाजपकडून शिवेंद्रराजेसिंह भोसले हे पुन्हा आमदार होणार, असे हा सर्व्हेत म्हटलेले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात सर्वाधिक धक्कादायक निकाल आता निवडणुका झाल्या तर लागतील, असे यात नमूद कण्यात आलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा