गुरुवार, २२ एप्रिल, २०२१

राज्यात आज दि २२ एप्रिल २०२१ रोजी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध

राज्यात आज दि २२ एप्रिल २०२१ रोजी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध


मुंबईः वाढत्या कोरोना संकटाचे कारण देत ठाकरे सरकारने महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध जाहीर केले. राज्यात गुरुवार २२ एप्रिल २०२१ रोजी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू होतील. हे कडक निर्बंध शनिवार १ मे २०२१ रोजी सकाळी सात वाजेपर्यंत आहेत. strict restrictions in maharashtra

  1. महाराष्ट्रातील केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये पाच कर्मचारी अथवा एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के एवढ्या उपस्थितीत कार्यरत राहणार. अत्यावश्यक सेवा आणि कोरोना संकटाशी संबंधित कामकाज करणाऱ्या विभागांना यातून वगळले आहे. तिथे आवश्यकतेनुसार ५० ते १०० टक्के उपस्थितीला परवानगी.
  2. लग्न समारंभासाठी कोविड प्रोटोकॉल लागू. फक्त दोन तासांकरिता जास्तीत जास्त २५ जणांची उपस्थिती असेल. या कालावधीत लग्नाचे सर्व विधी पूर्ण करण्याचे बंधन आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास यजमानाला ५० हजार रुपयांचा दंड केला जाईल.
  3. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची परवानगी आहे. इतरांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास मनाई आहे.
  4. खासगी वाहतुकीसाठी चालक आणि प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के एवढ्या प्रवाशांना परवानगी. रिक्षात चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी. नियमाचे उल्लंघन झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड.
  5. बसमध्ये उभ्याने प्रवासाला मनाई तसेच खासगी बसमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेलाच परवानगी.
  6. प्रवासात ओळखपत्र बाळगण्याचे बंधन
  7. किराणा मालाची विक्री, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री, भाजीपाला विक्री, फळेविक्री तसेच अंडी, मटण, मासे चिकन यांची विक्री तसेच कृषी संबंधित उत्पादनांची विक्री आणि सेवा, पशूखाद्य विक्री, सर्व प्रकारच्या इंधनची विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत होणार
  8. पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहक वाहने यांच्यासाठीची इंधन विक्री नियमित वेळेनुसार
  9. हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डीलिव्हरी सुरू
  10. धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, भाजीपाला तसेच फळे-फुले यांचे बाजार बंद, द्वार विक्री अथवा वितरणास परवानगी
  11. ऑनलाइन शॉपिंग सुरू, होम डीलिव्हरी सुरू
  12. वाइन शॉप बंद, दारूची होम डीलिव्हरी सुरू
  13. सरकारी, निमसरकारी आणि खासगी शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद
  14. सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद
  15. स्टेडियम आणि मैदाने प्रेक्षकांसाठी बंद तसेच व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी चालणे वा धावणे वा इतर व्यायाम बंद
  16. अत्य़ावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद
  17. वर्क फ्रॉम होम सुरू; वित्तीय कार्यालये सुरू पण इतर खासगी कार्यालये बंद
  18. सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, मॉल बंद
  19. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम बंद

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 1695 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 37 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1695 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 37 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 21 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1695  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 37 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 120, सदरबझार 6, रविवार पेठ 2, सोमवार पेठ 2, मंगळवार पेठ 8, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 1, शनिवार पेठ 1,  माची पेठ 1, भावनी पेठ 1, केसरकर पेठ 2, प्रतापगंजपेठ 1, शाहुपूरी 5,  शाहुनगर 7, समर्थ मंदिर 1, रामाचा गेाट 1,अतीत 1, पंताचागोट 1, पिरवाडी 1, जवळवाडी  1, विलासपूर 2, गोडोली 17, कोडोली 10,   सदरबझार 4, मोळाचा ओढा 1, पाटकळ 1, सैदापुर 1,काशीळ 3, कृष्णानगर 2,जरडेश्वर नाका 1, चंदनगर 1,  संगमनगर 6,करंजे 8, विकासनगर 3, विसावानाका 2, मल्हारपेठ 1, केसरकरपेठ 1,  देवी कॉलनी 5, तामजाईनगर 1, चिंचणेर निंब 4,कोंडवे 1,लिंबगोवे 1,नांदगाव 1, क्षेत्र माहुली 6, शहापूर 2, सोनगाव 2, भरतगाव 2, खिंडवाडी 3, जकातवाडी 1, अनेवाडी 1,मापरवाडी, संभाजीनगर 1, दौलतनगर 1, भोसले मळा 1, गोरेगांव 1, वर्ये 4, काहीनवाडी 1,   पानेरीसालवे 1, भाडळे 1, कोलवडी रेवडी 1, देगांव 1, शिवथर 1, अंगापुर 1, जैतापुर 2, नागेवाडी 1, ठोसेघर 1, दत्तनगर 1, गोजेगांव 2, कुरुल 1, दरे बु. 2, दरे त. 4, कारी 1, नागठाणे 4,  पाडळी 1, सोनगांव 2, कुशी 52,  खोजेवाडी 16, धोंडेवाडी 1, कळंबे 1, कामेरी 1, देगांव 1, कळंबी 1, धनवडेवाडी 1, तळवी 1, आरफळ 1, शिरगांव 1, नुने 3, तासगांव 1, वेचले 1, वर्णे 1, आरेदरे  1, संभाजीनगर 1, वांजळवाडी 1, कोपर्डे 5,धावडशी 1, चिचनेर निंब 4, धोंडेवाडी 1, 

*कराड तालुक्यातील* कराड 16, सोमवार पेठ 1, मंगळवार पेठ 2,बुधवार पेठ 1, शनिवार पेठ 6, रविवारपेठ 1, बनवडी 1,शामगाव 1, विंग 1,कोयना वसाहत 3,मलकापूर 13, विद्यानगर 1,आगाशिवनगर 7,मालखेड 1, औंड 2,पोतले 1, वाडोली 1,कडेगाव 4, ओगलेवाडी 1,बेलवडे 1, कपिल 2, वडगाव 2,  चचेगाव 1, पाडळी 1, शेरोली 1, शेवाळवाडी उंडाळे 5, रेठरे बु. 2, किरपे 1, बनवडी 3, सैदापुर 2, घोगाव 1, उंब्रज 3, येळगाव 1,  पोटळे 1, वाघेरी 4, काले 4, कार्वेनाका 3, कार्वे 3,  वारुंजी 1, तडवळे 3, सुपणे 2, परळे 1, कोरेगांव 2, चरेगांव 1, तळबीड 3, हजारमाची 7, पाडळी 1, पारळे 1, तांबवे 2, मसुर 2, वाडोली निळेश्वर 8, वाठार 1, येलगांव 1, वारुंजी 1, पार्ले 1, 

*पाटण तालुक्यातील* पाटण 9, मराठवाडी 1 , मानेगाव 1, तारळे 14,करपेवाडी 2, बनापुरी 1, रामशेतवाडी 1,रामल्ला 1, मल्हारपेठ  5, येरळ 4, आडुळ 1, म्हावशी 1, कावरवाडी 1, बनपुरी 4, वेखंडवाउी 1, सणबुर 1, 

*फलटण तालुक्यातील* फलटण 39, लक्ष्मीनगर 2, विडणी 18,मंगळवार  पेठ 2, बुधवार पेठ 2,  रविवार पेठ 2, आदर्की 5,धनगरवाडा 1, कोळकी 4,साठेवाडी 2, पवारगल्ली 1, चौधरवाडी 6,साखरवाडी 2,निबंळक 2, निंभोरे 2, सांगवी 3,आसू 3, खुंटे 3, राजाळे 4,वाडळे 1, अलगुडेवाडी 3,सोनगाव 1,जावळी 8,शिंदेनगर 3,वजेगाव 1,बरड 1, कुरवली 2,तरडगाव 24,घाडगेमळा 2 , मुळीकवाडी 3, तडवळे 4, पाडेगाव 8, तांबवे 10,  वाहेगांव 1,   राजुरी 2, अरडगांव 4,  चव्हाणवाडी 3, धावळवाडी 2,  शिंदेवाडी 2, विठ्ठलवाडी 3, मलठण 9, फडतरवाडी 3, फरांदवाडी 2, राजाळे 1, धुळदेव 1, सोनगांव 1, कोरेगांव 1, सुरवडी 1, काळज 1, जिंती 1, सासकल 1, कांबळेश्वर 1, निंबळक 1, दुधेबावी 2, 
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, गुरसाळे 1,वडूज 10, वरुड 1 , पेडगाव ,लोणी 1,   भुरकवाडी 1, पुसेगांव 12, नेर 1, विसापुर 3,  कुमठे 2, निढळ 5, फडतरवाडी 5,  गोसाव्याचीवाडी 3, ओंडीताणे 1, जायगांव 1, खबालवाडी 17, कातरखटाव 6, वसंतगड 1, औंध 7, वेटणे 7, खतगुण 4,वर्धनगड 2,  
*माण तालुक्यातील* मोही 4, मार्डी 2, रानंद 1, खुटबाव 1, दहिवडी  4, टाकेवाडी 1, नरवणे 12, धिवड 1, बिदाल 8, मलवडी 2, जाधववाडी 1, कोळेवाउी 3, 
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 13, देऊर 6,पळशी 2,बनवडी 1,बिचुकले 5,वाठार 3,आर्वी 5,पिंपोडे 1, किन्हई 1, एकंबे 9, रहितमपुर 6, नागझरी 2, वेळंग 2, नाहरवाडी 1, साप 2, वाठार स्टे. 9, कठापुर 1, पिंपोडे 2, पिंपोडे बु. 3, सातारा रोड 1, कण्हेरखेड 1, अनुभलेवाडी 1, अंबवडे 2, भाडळे 10, किन्हई 1, आसगांव 2, रुई 1, सासुर्वे 1, धामणेर 1, कण्हेरखेड 1, जांब 1, सोळशी 2, 
           *खंडाळा तालुक्यातील * खंडाळा 6, शिरवळ 15, बावडा 1, लोणंद 28 ,अंधोरी 7, पाडळी 1, बाळुपाटलाचीवाडी 1, शिंदेवाडी 3, देवघर 2, खेड बु. 2, वाघोशी 1, 
*वाई तालुक्यातील* वाई 16, रविवार पेठ 6, गणपती आळी 13, फुलेनगर 4, सिध्दनाथवाडी 4, बावधन 4, शहाबाग 1, चिकली 1,पाचवड 5, भुईज 2, मापरवाडी 1, निकमवाडी 1, माळदेववाडी 4, विरमाडे 14, नायगांव 2, धावळी 1, शेंदुर्जणे 2, पसरणी 1, आसवली 1, व्याजवाडी 2, मेणवली 1, केंजळ 2, अनपटवाडी 1, बावधन 3, परखंदी 1, चांडक 1, लोहारे 3, गुळुंब 2, आसले 1, खानापुर 1, वेळे 3, सुरुर 1, कवठे 2, चिंधवली 3, कवठे 3, आनेवाडी 1, पांडे 3, सिध्दनाथवाडी 1, एकसर 1, धोमकॉलनी 1, सुलतानपुर 1, शिरगांव 1, भुईंज 1, दरेवाडी 1, बोपर्डी 2, धर्मपुरी 1, धावडी 2, सोनगिरवाडी 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 38, पाचगणी 20, डॉ.साबणे रोड 1,महाडनाका 3, लिंगमाळा 2, तापोळा 1, मेटगुताड 1,  भिलार 4, तायघाट 2, लिंगमळा 1, तळदेव 4, 
*जावली  तालुक्यातील*  जावली 11, अंबेघर2,रामवाडी 1,बहुले 3, कुडाळ 2,अखाडे 3,म्हसवे 3, आसणी  11,सरताळे 1, कुरुलोशी 13, केळघर 3, करंडी 1,महामुलकरवाडी 1,  जीला 1, तेटली 1, पावशेवाडी 6, मारोवळे 2, कुसुंबी 3, पिंपरी 1, म्हाते बु. 5, काळोशी 1, कुडाळ 24, बामणोली 2, जवळवाडी 1, ओझर्डे 1, 
 *इतर* 3, करंजे खानापूर 1,कुभांर टेक1,सलापे 1, परहार 1, बेलाचीवाडी 1, खरशिंगे 2, कारंडवाडी 1, घागडेवाडी 1, मोरगिरी 2, कळकेवाडी 2, तालेमनेरी 1, जरहरगांव 1, किकली 1, कुकुडवाड 1, मावगण 1, कटापुर 1, खेड बु. 1, मालदेववाडी 2, मालुसरेवाडी 1, पानस 4, कावडी 1, विवर 7,  विरमाडे 2, जांब 8, अलेवाडी 1,  मुनावळे 3, कुसुर 1, सावडे 2, गुजरवाडी 15,  मारुल 2, कासारशिरंबे 3, बेलवडे बु. 1, सोनके 1,  विखळे 1, सोळशी 1, निंबोडी 1, गोळेश्वर 1, बेलवडे बु. 5, भक्तवडी 3, नादवळ 1, बहुले 6, आसनी 5, एनकुळ 2, येलमरवाडी 3, खिंगर 2, गरळेवाडी 1, तडवळे 1, ठोमसे 2, उंबरी 1, डांबेवाडी 1, बेलवडे बु. 1, नारळवाडी 1, पळसगांव 4, बोंबाळे 5,    पुलकोटी 2, कसवंद 4, घणी 1, विरवडे 1, राजापुरी 4, तामकडे 2, आंबेदरे 1,  दालमोडी 1, भुतेघर 1, कोपर्डी 1, निंबोडी 1, वरुड 5, रहाटणी 1, मालगांव 1, खरशिंगे 1, नांदोशी 1, टेकवली 1, कोकराळे 1, येळीव 2, वारोशी 1, सर्जापुर 2, शेटे 1, येराळवाडी 18, सरताळे 1, वारणानगर 2, सोमर्डी 1, मरीआईचीवाडी 1, मार्ली 4, भोगांव 1, कुसगांव 1, नाडोळी 1, आसलेवाउी 6, कोरीवळे 1, चोपदार वाडी 2, अरबवाडी 1, रणदुल्लाबाद 2, हुमाऊन 1, वलई 1, कोर्टी 1, तळीये 1, सिरकळवाडी 1, बिचुकले 11, सायगांव 1, 
*बाहेरील जिल्ह्यातील* पुणे 3, लातुर1, नाशिक 1,  माळशिरस 1, मुंबई 1, राजस्थान 1, 

*37 बाधितांचा मृत्यु*
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे नरवणे ता.माण येथील 55 वर्षीय  पुरुष, खटाव ता. खटाव येथील 45 वर्षीय महिला, खडकी ता.वाई येथील 61 वर्षीय महिला,पिंपोडे ता.कोरेगांव येथील 73 वर्षीय पुरुष,व जिल्ह्यिातील विविध कोविड हॉस्पिटमध्ये वाटगळ ता. माण येथील 55 वर्षीय महिला, चव्हाणवाडी  ता.पाटण येथील 68 वर्षीय  पुरुष, रामपुर ता. पाटण येथील 68 वर्षीय पुरुष,कोपरी ठाणे जि.मुंबई येथील 49 वर्षीय महिला,बुधवार पेठ ता.फलटण येथील 37 वर्षीय पुरुष, वाठार स्टेशन ता.कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष,कोडोली  ता. सातारा येथील 31 वर्षीय पुरुष,वाई ता. वाई  येथील 73 वर्षीय  पुरुष,रविवार पेठ ता. वाई येथील  18 वर्षीय पुरुष,म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला,ताबंरगाव ता. पाटण येथील 59 वर्षीय महिला,नायगाव ता. खंडाळा येथील 42 वर्षीय महिला,कराड ता. कराड येथील 33 वर्षीय  पुरुष,सस्तेवाडी ता. फलटण येथील 63 वर्षीय महिला,सोमणथळी ता. फलटण येथील 80 वर्षीय पुरुष,निंबळक ता.फलटण येथील 45 वर्षीय पुरुष,वरुड ता.खटाव येथील 40 वर्षीय पुरुष,येळीव ता.खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, फलटण ता.फलटण येथील 50 वर्षीय महिला,चचेगाव ता.कराड येथील 75 वर्षीय महिला,काशीळ ता. सातारा येथील 70 वर्षीय  पुरुष,किन्हई ता.सातारा येथील 76 वर्षीय महिला,जांब ता .वाई येथील 78 वर्षीय पुरुष, वडूज ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष,सदर बाजार ता. सातारा येथील  69 वर्षीय  पुरुष, राई ता.कोरेगाव  येथील 67 वर्षीय पुरुष,उशीरा कळविलेले वडूज ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, कडेगाव ता.वाई येथील 49 वर्षीय महिला, इस्लामपूर ता.वाळवा येथील 85 वर्षीय पुरुष,चिपळुण ता. रत्नगिरी येथील 71 वर्षीय पुरुष,एकंबे ता. कोरेगाव येथील 75वर्षीय पुरुष,खर्शी ता.जावळी येथील 73 वर्षीय पुरुष, निंबळक ता.फलटण येथील 66 वर्षीय पुरुष,अशा एकूण 37 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ.चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -490402*
*एकूण बाधित -86194*  
*घरी सोडण्यात आलेले -68066*  
*मृत्यू -2228* 
*उपचारार्थ रुग्ण-15900* 

नाशिक : ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू

नाशिक : ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू 


नाशिक : नाशिकच्या नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.व्हेंटिलेटरवर असलेल्य़ा रुग्णांना ऑक्सिजन प्रेशर कमी पडल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असल्याचं मांढरे यांनी सांगितलं.

त्यांनी सांगितलं की, ही एक खाजगी कंपनीची टाकी आहे. रिफिल करण्याकरता आणि मेंटेनन्सकरता टॅंकर आला होता. त्यात काही टेक्निशियन्स होते. तो टॅंकर रिफिल करण्यात आला होता, असं आयुक्तांनी सांगितलं, मात्र दरम्यानच्या काळात झालेल्या विस्कळीतपणामुळं ही घटना घडली, असं जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितलं. याबाबत सर्व माहिती शासन स्तरावर माहिती कळवली आहे, असं त्यांनी सांगितलं.या दुर्घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरु आहे. परिस्थितीचं गांभीर्य पाहता पोलीसही रुग्णालयात दाखल झाले आहेत. डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन टँकची गळती रोखली असून पुरवठा पूर्ववत झाला आहे. या घटनेत 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातील एकूण 150 रुग्ण व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनवर होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर होते आणि 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाईल, असं नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं होतं.


दुसरीकडे शिवसेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या गळतीमध्ये 30 ते 35 रुग्ण दगावले असतील, अशी भीती व्यक्त करत जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.


वॉल्वमध्ये लीकेज असल्याने गळती : राजेश टोपे
स्थानिक प्रशासनाने कळवलं की, नाशिकमध्ये आलेल्या टँकरमधील वॉल्वमध्ये लीकेज असल्याने ऑक्सिजन वाया गेला. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण माहिती घेऊन परिपत्रक जारी केलं जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.


मुंबई : राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना मिळणार दीडहजार : 107 कोटीची तरतूद

मुंबई : राज्यातील 7 लाख 15 हजार रिक्षा परवानाधारकांना मिळणार दीडहजार : 107 कोटीची तरतूद 

मुंबई, दि. 20 : राज्यातील कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारकडून घातलेले निर्बंध व त्या अनुषंगाने राज्य शासनाने राज्यातील रिक्षा परवानाधारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदानासंदर्भात आढावा घेण्यासाठी आज परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांचे अध्यक्षतेखाली मुंबईतील रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी व परिवहन विभागातील अधिकारी यांचे समवेत मंत्रालयात बैठक झाली.

राज्यात सात लाख पंधरा हजार रिक्षा परवानाधारक असून त्यांना प्रत्येकी 1500 रुपये प्रमाणे एकूण 107 कोटी रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. ही रक्कम संबंधितांच्या बँक खात्यावर थेट ऑनलाईन पद्धतीने जमा करण्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली.

याकरीता परिवहन विभागामार्फत ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत असून त्यामध्ये परवानाधारक रिक्षा चालकांना आपले आधार क्रमांक, वाहन क्रमांक व अनुज्ञप्ती क्रमांक याची ऑनलाईन नोंद करावी लागेल व याची खातरजमा झाल्यानंतर आधार क्रमांकाशी जोडणी असलेल्या बँक खात्यामध्ये ही रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येणार आहे.

या प्रणालीची माहिती विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. याकरीता रिक्षा परवानाधारकांचे बँक खाते हे आधार क्रमांकाशी जोडणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी “सर्व रिक्षा परवाना धारकांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी तात्काळ जोडणी करुन घ्यावे. जेणेकरुन या सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेवर अदा करता येईल,” असे आवाहन परिवहन मंत्री ॲड.श्री.परब यांनी केले.

*सातारा जिल्ह्यातील किराणा माल, मेडिकल दुकान व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी**जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी*

*सातारा जिल्ह्यातील किराणा माल, मेडिकल दुकान व खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी*
*जिल्हादंडाधिकारी यांचे सुधारित आदेश जारी*

सातारा दि. 20  : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखणेच्या अनुषंगाने दि. 30 एप्रिल पर्यंत कलम 144 लागु केला आहे. जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारान्वये, खालीलप्रमाणे सुधारित आदेश जारी केले आहेत.
  सर्व किराणा माल, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, डेअरी, बेकरी, मिठाई इत्यादी सर्व प्रकारची खाद्य पदार्थ दुकाने (कोंबडी, मटण, पोल्ट्री, मासे आणि अंडी यांसह), रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांची दुकाने/स्टॉल, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनांशी संबंधित दुकाने, पाळीव प्राण्यांच्या खादयपदार्थांची दुकाने, पावसाळ्याच्या हंगामात व्यक्तींसाठी तसेच संस्थांसाठी संबंधित असणार्या  साहित्याच्या उत्पादनाशी निगडीत दुकाने फक्त सकाळी 7.00 ते सकाळी 11.00 या कालावधीतच चालू राहतील.  तथापि, सदर दुकानांची घरपोच सेवा सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 या कालावधीतच चालू ठेवणेस परवानगी राहील. 
  मेडिकल दुकाने ही सकाळी 7.00 ते रात्री 08.00 पर्यंत चालू राहतील व हॉस्पीटल मधील मेडिकल दुकाने पुर्णवेळ चालू राहतील.
  वृत्तपत्रे/मासिके/नियतकालिके याची घरपोच सेवा सकाळी 5.00 ते सकाळी 11.00 व  स्टॉल वरील विक्री सकाळी 7.00 ते 11.00 या कालावधीत चालू राहील. 
या आदेशांची अंमलबजावणी दिनांक 20 एप्रिल, 2021 चे रात्री 8.00 वाजल्यापासून ते दिनांक 01 मे, 2021 चे सकाळी 07.00 वाजेपर्यत लागू राहील
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय / कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

*सातारा जिल्ह्यातील 1571संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू* पाटण तालुक्यातील या गावात 23 जण बाधित

*सातारा जिल्ह्यातील 1571संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 36 बाधितांचा मृत्यू*

 सातारा दि. 20 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1571  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 36 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
  कोरोना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 161, सदरबझार 9, संगम माहुली 1, माळवाडी 1,लिंब 1, कंरजे 9, व्यंकटपुरा पेठ 4,देगांव 2, गडकरआळी 2,एमआयडीसी 2, मंगळवार पेठ 9, ठोसेघर 2,शाहुपुरी 13,गोडोली 7,जकातवाडी 1,आरळे 1,नांदवळ 1,भरतगाववाडी 1,आसगाव2,भरतगाव 4, कुमठे 1,गुरुवार पेठ 1,बुधवार पेठ 1, दरे खु.2, सोनगाव 4, आरेदरे 1, रामाचागेट 2, म्हसवे 2,संगममाहुली 3,बिभवी 1,कोडोली 2,  दरे 1,शाहुनगर 4,कोंडवे 1, रविवार पेठ 1,शनिवार पेठ 4, नागेवाडी 1,गोजेगाव1,केसरकर पेठ 2,मुंडेवाडी 1, राजापुरी 1,माचीपेठ 2, प्रतापगंज पेठ 1,वर्ये 1, शुक्रवारपेठ 1,दौलतनगर 1,मोळाचाओढा 1, यतेश्वर 1, नेले 1, आरफळ 1, म्हासुर्णे 1, कोंढवे  1,  संगमनगर 1, कृष्णानगर 1, खामगाव पिंपळवाडी 1, खेड 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 34, चचेगांव 1, कार्वे नाका 5,ओगलेवाडी 5,निगडी 1,रेटरे बु.1, सोमवार पेठ 1,गणेशवाडी 1, पाडळी 1,कोळे 1,सुपने 7,विद्यानगर 5, सैदापुर 8,वाघीरे 2,खोडशी 1,सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, रविवार पेठ 1, नादलापुर 2,मलकापूर 10, कोपर्डे हवेली 5,काले 1, सावदे 8, चोरमारवाडी 1,पोटले 1,वाडोली नीलेश्वर 5, मसूर 3,कोनेगाव 1, करवडी 1,उंब्रज 6,मंगळवार पेठ 2,गोवारे 1,तासवडे 1,गोळेश्वर 7, किरपे 1,मिरवेवाडी 3 , वीरवडे 2,किवळ 1,कोरेगाव 1,रीसवड 1, साबळेवाडी 1, शेणेाली 1, कार्वे 2,मुंडे 1, आगाशिवनगर 2, बनवडी 2, विंग 1, शेरे 2, रेठरे बु 2, ओगलेवाडी 1, गोटे 1, हजारमाची 1, कुसुर 1, पठारवाडी 1, गोवारे 1, वडगाव 1,  पार्ले 1, कोयना वसाहत 1, औंड 3, शेनोली 1, 

*पाटण तालुक्यातील* पाटण 7,खडकवाडी 1, वजरोशी 9,दौलतवाडी 3,डीगेवाडी 3, गावडीवाडी 1,मावशी 1, केर 1,कावरवाडी 1,तारळे 23,कडवेबु. 5,धनगरवाडी 1, काळेवाडी कडवे 1, आडूळ 3,आवर्डे  2,मल्हारपेठ 5,निसरे 1, मंडुरे 2, कोयनानगर 1, 

*फलटण तालुक्यातील* फलटण 75, लक्ष्मीनगर 9, महतपुर पेठ 2, सोमवार पेठ 1, कोळकी 10, जींती 1, बरड 1, खडकी 2, कांबळेश्वर 1,वेळोशी 1,पंदारे  1,जीरपवाडी 1, जावली 8,पिंपरद 5,गोळीबार मैदान 1, सस्तेवाडी 1,गुडेवाडी 2, मंगळवार पेठ 1,  चौधरवाडी 1,बुधवार पेठ 2,सोनगाव 1 मलटण 6, तांबवे 2,चव्हाणवाडी 3, निरगुडी 1, मठाचीवाडी 1,बीरदेवनगर 1,सेामंथळी 2, गिरवी 1, फरतडवाडी 3, काशिदवाडी  1, मंगळवार पेठ 1  वीढणी 3,वाडळे 4, निंभोरे 1,काळज 1, आसु 1, राजुरी 2, मिरढे 11,वाजेगाव 1,मुजंवडी 1,गोखळी 1, बरड2, कुरवली 1, गुढेवाडी 2,  साखरवाडी 1, जिंती 3, पवारवाडी 1, ठाकुरकी 4, सुरवडी 1, बुधवार पेठ 1, निरगुडी 1, पिराचीवाडी 1, खुंटे 4, तिरकवाडी 2, सोमनथळी 1, पिंपळमळा 1, वाठार निंबाळकर 2, फडतरवाडी 1, मांडव खडक 1, गोलेवाडी 1, चौधरवाडी 1, वाखरी 3, निंभोरे 3, ढवळ 4, राजाळे 1,  राजुरी 1, 
*खटाव तालुक्यातील* खटाव 5,खबालवाडी 35,पुसेसावळी 1, कातरखटाव 1,लोणी 3, भुरकवाडी 9, कुरोली 1, वरुड 8,औंध 1,पुसेगाव 4,निढळ 2,बुध 8, काटेवाडी 4,खदगुण 1, फरतडवाडी 1, वर्धनगड 6,ललगुण 2, कातलगेवाडी 1, वडूज 1, धोंडेवाडी 1, कानरवाडी 2, कुमठे 12, पेडगाव 21, मायणी 2, वडूज 2,शिरसवाडी 1, बुध 1, कोकराळे 1,  
*माण तालुक्यातील* पांगारी 6, रानंद 4, बिदाल 2, जाधववाडी 1,मोही 4,कासरवाडी 2, मार्डी 8,गोंदवले 14,भाडवंली 1,श्रीपल्लवन 1,वारकुटीमलवडी 1, माळवाडी 1,शिंगणापूर 3,सोकासन 1,तादळे 1,झाशी 2, राजेवाडी 1,लोधवडे 25,पळशी 4, कोळेवाडी 1,नरवणे 3, भालवडी 5,वावरहिरे 1, दहिवडी 19,मोगराळे 1,पिंगळी 1,तडवळे 1,ऊकीर्डो 1,शेवरी 1,म्हसवड 7,मलवडी 1,पर्यती 1, मोही 3, वरकुटे म्हसवड 1,  माळेवस्ती 1, 
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 10, वेळंग 1, सातारारोड 5,ऐकंबे 5, जांब 13,पाडळी स्टेशन 1, धामणेर 1,सायगाव1,मंगळापूर 1,बनवडी 1, पिंपोडे बु.1, वाठारस्टेशन 1, रेवडी 2, सायगाव 2, नलवडेवाडी 1, 
*खंडाळा तालुक्यातील*खंडाळा 1,शिरवळ 20, शिंदेवाडी 4,लोणंद 9,देवघर 1,कापर्डे 1,निरा 1,अंढोरी1,केंजळ 1,
*वाई तालुक्यातील* वाई 30, दत्तनगर 4, बावधन नाका 3,विरमाडे 1, बावधन 8,पांडे 2,यशवंतनगर 2,जायगुडेवाडी 4,धर्मपुरी 3,गंजे 8,बोपेगाव 2, कवठे 7 ओझर्डे 1,वेळे 3,सुरुर 1,गुळुंब2, कुडाळतर्फे 2,गंगापुरी 3,मधली आळी 3, धोम 1, गणपतीआळी 1,  फुलेनगर 3, बोरगाव 1,रामडोहआळी 7,सह्याद्रीनगर 1, धोमकॉलनी 1,बोपर्डी 2, कानुर1, लोहारे 1,रविवार पेठ 5, धावडी 1, पसरणी 1, अनपटवाडी  3,गुंडे 1, भेागाव 3,दह्याट 1, कोडगाव 2,वेळंग 1, किकली 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 7,धोंडेघर 1,गुरेघर 2, बोरधानी 1,पाचगणी 12,जावली 1, भिलार 7,गोडवली 1,मेटगुताड1,तळदेव 2, बोंडारवाडी 1,  
*जावली  तालुक्यातील*जावली 1,केळघर 1,वेठंबे 1,हातगेघर 9, मेढा 4,वीवर 1,कुडाळ 6,भोगवली 2,बामणेली 3,कुसुंबी 8, गंजे 9,बेलदारवाडी 1, म्हातेबु. 3,वारोशी 2, कारंडी 4,घारटघर 4, अंबेघर 13, वाळवा 1, भणंग 1,
*इतर*5, देवपुर 1, शेणवडी 1, जागमिने 5, नारळवाडी 1,वासेले 1,करजे 1,बहुले 1, सावली 10, मामुर्डी 9,दापवाडी 2,आसनी 1, टेकवली 2,नांदगणे 1,गावडी 4,शेटे 1,भीवडी 2,येवती 1,बलकवडेवाडी 1, सोनवने 1,शीरवडे 1,बेलवडेबु.1,काळगाव1,आंधारी 12, सैदापुर 1,राजपुरी 1,येराळवाडी 1,कुरुळोशी 1,कण्हेरखेड 7,तेटली 4, मेाहाट1,पिंपरी 4,सरजापुर 6, खर्शी 1,निपाणीमुरा 1,अंधेरी 4,धामणेर 2, धनवली 1, किवळ 1, गुजरवाडी 2, दालमोडी 2,येळीव 4,एनकूल 2, सिंगडवाडी 2,कुरोली 2,डांबेवाडी 1,बोंबळे 7अंबेघर 1,अंभेरी 2,मांडवे 1,वेटणे 6,तडवळे 1,खिंगर 5,डिस्काळ 4,कोकराळे 1,खरसिंगे 3, भोसरे 1,नडशी 1,गरवाडी 1, नांदवन 3,निगडी 2,पावशेवाडी 2, आसनी 1,शामगाव1,भोडारवाडी  1, जायगाव 3,बेलोशी 1,पानवन 1,गुरसाळे1, आवकाळी 2,आंब्रळ 1,पाटीलवाडी 1, गवानवाडी 1, मारुल 1, मार्ली 4, पिराचीवाडी 1, बोपर्डी 1, शिरगाव 1, अमृतवाडी 1, व्याहाळी 1, ,चिखली 1, बिचुकले 1, घीगेवाडी 2, वाशीवली 2, चिखली केडगाव 1, केडगाव 1,   
*बाहेरील जिल्ह्यातील* मुंबई 3,बीड1,बारामती 1,सुपा 1,लातुर 1,सोलापूर 1, पलूस 2, येडेमच्छींद्र 1,रायगड 1, पुणे 2, औरंगाबाद 1,रत्नागिरी 1, सांगली 1,  

*36 बाधितांचा मृत्यु*
 स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सदर बझार सातारा येथील 77 वर्षीय  महिला, चंदनवाडी ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली येथील 45 वर्षीय महिला, किरोली ता. कोरेगा येथील 42 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यिातील विविध कोविड हॉस्पिटमध्ये औंध ता. खटाव येथील 75 वर्षीय महिला, लोढणवाडी ता. माण येथील 48 वर्षीय पुरुष, राजापूर ता. खटाव येथील 76 वर्षीय महिला, अंबवडे ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, विदणी ता. फलटण येथील 72 वर्षीय महिला, हेळवाक ता. पाटण येथील 40 वर्षीय पुरुष, फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, ठाकूरकी ता. फलटण येथील 64 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ फलटण येथील 77 वर्षीय पुरुष, मलठण ता. फलठण येथील 55 वर्षीय पुरुष, फडतरवाडी बु ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, पाल ता. कराड येथील 72 वर्षीय पुरुष, सासवड ता. फलटण येथील 71 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 67 वर्षीय महिला, कुडाळ ता. जावली येथील 84 वर्षीय महिला, नाशिक ता.जि. नाशिक येथील 72 वर्षीय महिला, वाटेगाव ता. तासगाव जि. सांगली येथील 50 वर्षीय महिला, रामाचागोट ता. सातारा येथील 52 वर्षीय पुरुष, नागठाणे ता. सातारा येथील 55 वर्षीय महिला, पुण येथील 33 वर्षीय पुरुष, बोरगाव ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला,  गोंदवले ता. माण 75 वर्षीय्‍ महिला, बोरगाव ता. सातारा येथील 85 वर्षीय पुरुष, काळेवाडी ता. खटाव येथील 72 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले पिंगळी ता. माण येथील 86 वर्षीय पुरुष, कल्याण ता. जि.मुंबई येथील 58 वर्षीय पुरुष, कामाठीपुरा ता. सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, सागरनगर ता. फलटण येथील 37 वर्षीय पुरुष, मठनगर ता. फलटण येथील 66 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर ता. खंडाळा येथील 65 वर्षीय्‍ महिला, सदरबझार सातारा येथील 82 वर्षीय महिला अशा एकूण 36 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

*एकूण नमुने -484230*
*एकूण बाधित -84497*  
*घरी सोडण्यात आलेले -67329*  
*मृत्यू -2191* 
*उपचारार्थ रुग्ण-14977* 

*कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पोलीस प्रशासनाला आदेश*

*कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पोलीस प्रशासनाला आदेश*
सातारा दि. 20 :    कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या.
गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सूचना केल्या.
पोलीसही बाधित होत आहेत, या बाधित पोलीसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा, अशा सूचना करुन श्री. देसाई पुढे म्हणाले, यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या. तसेच जिल्हा नियोजनमधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम  पोलीस करीत आहेत त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...