राज्यात आज दि २२ एप्रिल २०२१ रोजी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध
मुंबईः वाढत्या कोरोना संकटाचे कारण देत ठाकरे सरकारने महाराष्ट्रात 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध जाहीर केले. राज्यात गुरुवार २२ एप्रिल २०२१ रोजी रात्री आठ वाजल्यापासून कडक निर्बंध लागू होतील. हे कडक निर्बंध शनिवार १ मे २०२१ रोजी सकाळी सात वाजेपर्यंत आहेत. strict restrictions in maharashtra
- महाराष्ट्रातील केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये पाच कर्मचारी अथवा एकूण कर्मचाऱ्यांच्या १५ टक्के एवढ्या उपस्थितीत कार्यरत राहणार. अत्यावश्यक सेवा आणि कोरोना संकटाशी संबंधित कामकाज करणाऱ्या विभागांना यातून वगळले आहे. तिथे आवश्यकतेनुसार ५० ते १०० टक्के उपस्थितीला परवानगी.
- लग्न समारंभासाठी कोविड प्रोटोकॉल लागू. फक्त दोन तासांकरिता जास्तीत जास्त २५ जणांची उपस्थिती असेल. या कालावधीत लग्नाचे सर्व विधी पूर्ण करण्याचे बंधन आहे. नियमाचे उल्लंघन झाल्यास यजमानाला ५० हजार रुपयांचा दंड केला जाईल.
- केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी तसेच अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांनाच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याची परवानगी आहे. इतरांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास मनाई आहे.
- खासगी वाहतुकीसाठी चालक आणि प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के एवढ्या प्रवाशांना परवानगी. रिक्षात चालक आणि दोन प्रवासी यांनाच परवानगी. नियमाचे उल्लंघन झाल्यास दहा हजार रुपयांचा दंड.
- बसमध्ये उभ्याने प्रवासाला मनाई तसेच खासगी बसमध्ये ५० टक्के प्रवासी क्षमतेलाच परवानगी.
- प्रवासात ओळखपत्र बाळगण्याचे बंधन
- किराणा मालाची विक्री, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री, भाजीपाला विक्री, फळेविक्री तसेच अंडी, मटण, मासे चिकन यांची विक्री तसेच कृषी संबंधित उत्पादनांची विक्री आणि सेवा, पशूखाद्य विक्री, सर्व प्रकारच्या इंधनची विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत होणार
- पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा, मालवाहक वाहने यांच्यासाठीची इंधन विक्री नियमित वेळेनुसार
- हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डीलिव्हरी सुरू
- धार्मिक स्थळे, आठवडी बाजार, भाजीपाला तसेच फळे-फुले यांचे बाजार बंद, द्वार विक्री अथवा वितरणास परवानगी
- ऑनलाइन शॉपिंग सुरू, होम डीलिव्हरी सुरू
- वाइन शॉप बंद, दारूची होम डीलिव्हरी सुरू
- सरकारी, निमसरकारी आणि खासगी शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद
- सलून, स्पा, ब्युटी पार्लर बंद
- स्टेडियम आणि मैदाने प्रेक्षकांसाठी बंद तसेच व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी चालणे वा धावणे वा इतर व्यायाम बंद
- अत्य़ावश्यक सेवा वगळून इतर दुकाने बंद
- वर्क फ्रॉम होम सुरू; वित्तीय कार्यालये सुरू पण इतर खासगी कार्यालये बंद
- सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स, नाट्यगृह, मॉल बंद
- सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम बंद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा