मंगळवार, २० एप्रिल, २०२१

*कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पोलीस प्रशासनाला आदेश*

*कडक निर्बंध लावूनही लोक फिरत असतील तर कारवाई करा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पोलीस प्रशासनाला आदेश*
सातारा दि. 20 :    कडक निर्बंध लावूनही राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. निर्बंध लावूनही अनेक नागरिक विनाकारण घराबाहेर पडत आहेत, अशांवर कारवाई करुन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी राज्यात करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज पोलीस विभागाला केल्या.
गृह (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील विभागीय परिक्षेत्रीय पोलीस महानिरीक्षकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सूचना केल्या.
पोलीसही बाधित होत आहेत, या बाधित पोलीसांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी कोविड सेंटर सुरु करा, अशा सूचना करुन श्री. देसाई पुढे म्हणाले, यासाठी स्थानिक आमदारांची मदत घ्या. तसेच जिल्हा नियोजनमधूनही निधी देण्यात येईल. बाजारपेठांमधील गर्दी हटविण्याचे काम  पोलीस करीत आहेत त्यांना महानगर पालिकांचे कर्मचारी, नगर परिषदांचे कर्मचारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील कर्मचाऱ्यांची मदत घेऊन शासनाने घातलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...