रविवार, १९ जानेवारी, २०२५

प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावेशासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा - पालकमंत्री शंभूराज देसाई.

प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे
शासकीय योजनांची माहिती होण्यासाठी चित्ररथ तयार करा - पालकमंत्री शंभूराज देसाई.

सातारा, दि.19 : यंदाचा प्रजासत्ताक दिन दिमाखादार साजरा व्हावा.  यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमास शासन आपल्या दारी, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना या सारख्या योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती चित्ररथावर  दर्शविण्यात यावी. प्रजासत्ताकदिनी चित्ररथ प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजारोहण समारंभातील संचलनाबरोबर शहरातही फिरवावेत. यासाठी प्रशासकीय विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
प्रजासत्ताक दिनाच्या नियोजनाचा आढावा पालकमंत्री श्री. देसाई यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील , पालकमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमाची सर्व प्रथम सातारा जिल्ह्यात सुरुवात करून या उपक्रमांतर्गत २९ हजार नागरिकांना थेट लाभ देण्यात आला होता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत एकट्या  सातारा जिल्ह्यात  8 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना लाभ देऊन सातारा जिल्ह्यात उत्तम कामकाज करण्यात आले आहे. 26 जाणे  ला या दोन्ही योजनांवर आधारित चित्ररथ तयार करावा. या चित्ररथावर तालुकानिहाय लाभार्थ्यांची ठळक आकडेवारी द्यावी. तसेच मुनावळे येथे वॉटर स्पोर्ट सुरु झाले आहे त्याचे फोटो असणाराही चित्ररथ तयार करावा.  कृषी व जिल्हा परिषदेनेही आपल्या विभागाशी संबंधित बांबू रोपण व इतर महत्वाच्या विषयाशी संबंधित चित्ररथ तयार करावेत. या चित्ररथांचे प्रजासत्ताकदिनी संचलन झाल्यानंतर हे चित्ररथ नागरिकांना पाहण्यासाठी शहरात देखील  फिरवावे. शासकीय इमारतींसह शिवतिर्थ, राजवाडा अशा महत्वाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करावी. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करावे. शासकीय योजना सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर राहिला आहे. यापुढेही अशाच पद्धतीने काम करा, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

वांगव्हॅली पत्रकार संघाच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन.

 

 

तळमावले/वार्ताहर

आचार्य बाळशास्त्री जांभेकर ऊर्फ दर्पणकार यांच्या जयंतीनिमित्त ढेबेवाडी (ता.पाटण) येथील वांगव्हॅली पत्रकार संघाच्यांच्यावतीने दर्पणकारांना अभिवादन करण्यात आले होते. याप्रसंगी वांगव्हॅली पत्रकार संघाचे अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, यावेळी जेष्ठ पत्रकार पोपटराव झेंडे, हरीष पेंढारकर, पोपटराव माने, साप्ताहिक कुमजाई पर्वचे मनोज सावंत, दै.कृष्णाकाठ न्यूज नेटवर्क चे राजेंद्र पुजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

प्रारंभी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या यांच्या प्रतिमेला हार घालून, पुजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डाॅ.संदीप डाकवे, पोपट माने, हरीष पेंढारकर व इतर मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक राजेंद्र पुजारी यांनी स्वागत मनोज सावंत यांनी तर पोपटराव झेंडे यांनी आभार मानले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होत. त्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 रोजी पोंभुर्ले या गावी झाला. त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र 6 जानेवारी, 1832 रोजी सुरु केले. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.

सोमवार, २३ डिसेंबर, २०२४

स्पंदन ट्रस्टचे विधायक कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे : प.पू.धारेश्वर महाराज.

 स्पंदन ट्रस्टचे विधायक कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे : प.पू.धारेश्वर महाराज.




तळमावले/वार्ताहर
स्पंदन ट्रस्टचे विधायक कार्य समाजाला पुढे घेऊन जाणारे आहे. या ट्रस्टने विविध क्षेत्रात काम करत वाचन चळवळ वाढवली आहे. ग्रामीण संस्कृतीचे संवर्धन केले आहे, असे मत तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थानाचे मठाधिपती डाॅ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर महाराज यांनी व्यक्त केले. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या प्राइड ऑफ स्पंदन अवॉर्ड वितरण सोहळयात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, पार्श्वगायिका कविता राम, मालिका दिग्दर्शक विठ्ठल डाकवे, अभिनेते पंकज काळे, राष्ट्रवादी काॅंग्रसे शरदचंद्र पवार महिला आघाडीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या सौ.संगिता साळुंखे, पत्रकार गजानन तुपे, अभिनेत्री अंजली आकळे, शिवम असोसिटसचे गुलाब जाधव, ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सौ.रेश्मा डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार सोहळयाचे हे सहावे वर्ष आहे.
प.पू.धारेश्वर महाराज पुढे बोलताना म्हणाले की, ‘‘सुदृढ समाजासाठी संस्कार हे अत्यावश्यक असतात. सध्याच्या काळात अशाच संस्काराची गरज निर्माण झाली आहे, समाजामधील चांगली माणसे जपली पाहिजेत. त्यांना पाठबळ दिले पाहिजे’’
यावेळी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने धारेश्वर महाराजांना स्पंदन जीवन गौरव पुरस्कार मान्यवर आणि डाकेवाडी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत प्रदान केला. रोख रक्कम रु. 5,000/- , मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि पुस्तक असे स्वरुप होते. या पुरस्काराचा महाराजांनी स्वीकार केला. मात्र पुरस्काराची रक्कम स्पंदन ट्रस्टच्या सामाजिक कार्यासाठी डाॅ.संदीप डाकवे यांच्याकडे सुपूर्द केली. महाराजांच्या या दातृत्वाचे उपस्थितांनी टाळयांच्या गजरात अभिनंदन केले.
मंगेश चिवटे यांनी ट्रस्टच्या कार्याचे कौतुक केले. त्यांनी स्पंदनच्या कार्याचे कौतुक करत स्पंदन परिवाराने आमच्याही सोबत काम करावे असे सांगत ट्रस्टला मदत जाहीर केली आहे.
संगीता साळुंखे यांनी सत्कारामुळे प्रेरणा मिळते व जबाबदारीही वाढत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी कुटुंबाचे महत्व विषद करत कार्यक्रमात रंगत भरली. तसेच ट्रस्टच्या कार्याने प्रभावित होत कार्यक्रम संपण्यापूर्वी ट्रस्टला भरघोस देणगी दिली.
पार्श्व गायिका कविता राम यांनी मनोगत व्यक्त केल्यानंतर ‘‘दिगंबरा दिगंबरा, श्री स्वामी समर्थ जय’’ इत्यादि भजनाने सभागृहातील प्रत्येकाला त्या भजनात सामावून घेत आपल्या आवाजाची जादू दाखवली. त्यांच्या या गीतांच्या झलकेमुळे कार्यक्रमाला चार चाँद लागले. जगातील सर्वात लहान गिर्यारोहक ठरलेल्या कु.अन्वी अनिता चेतन घाटगे हिला प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारण्यापूर्वी तिने शिवरायांची गारद म्हटली. या शिवरायांच्या गारदेमुळे सभागृहात चैतन्य निर्माण झाले.
दरम्यान, प.पू. धारेश्वर महाराजांचे व्यासपीठावर आगमन होण्यापूर्वी त्यांचे शिष्य रोहित जंगम यांनी मंत्रोच्चारात त्यांचे स्वागत केले. यामुळे वातावरण भक्तीमय झाले. व्याख्याते किरण कोरे यांचे सुरुवातीचे भाषण प्रेरणादायी ठरले. त्यामुळे लोकांच्यात ऊर्जा निर्माण झाली. त्यांचे शब्दोच्चार लोकांना खिळवून ठेवत होते. पत्रकार, कविवर्य गजानन तुपे यांनी स्पंदन ट्रस्ट आणि डॉ.संदीप डाकवे यांच्यावर सादर केलेल्या कविता, शेरोशायरी यामुळे कार्यक्रमांना माहोल बदलून गेला.
‘‘रोल, कॅमेरा, ॲक्शन’’ हे तीन शब्द नेहमी बोलणाऱ्या दिग्दर्शक विठ्ठल डाकवे यांच्या अफलातून भाषणाने उपस्थितांसह डाकेवाडीकरांची मने जिंकली. विशेष म्हणजे ते पत्नी आणि मुलासह कार्यक्रमात सहभागी होते.
याशिवाय याच कार्यक्रमात राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्कार विजेते साहित्यिक, स्पंदन दिवाळी अंक स्पर्धेतील विजेते, सेल्फी विथ गुढी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान केला गेला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.संदीप डाकवे, सुत्रसंचालन शीतल दवणे आणि आभार प्रदर्शन भीमराव धुळप यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशाल डाकवे, सुरेश मस्कर, विकास डाकवे, सौ. रेश्मा डाकवे, सौ. वनिता डाकवे, सौ.सुमन डाकवे, प्रथमेश डाकवे, पौर्णिमा डाकवे, अक्षता डाकवे, सत्यवान मंडलिक, विकास साळुंखे, संतोष करपे, अनिल देसाई, सीमा देसाई, समाधान पाटील, विठ्ठल डाकवे, भरत डाकवे, रोहित जंगम यांनी कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रयत्न केले.


सभागृहाबाहेर ट्रस्टची नाव आणि उपक्रमाची कमान, नाव नोंदणी ठिकाणी ट्रस्ट आणि विविध स्पर्धांच्या लोगोंचा बॅनर, पुरस्कारार्थीना फेटा, आयडेंटी, गळ्यात गमजा, आकर्षक सन्मानचिन्ह यामुळे कार्यक्रम आखीव व रेखीव झाला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मित्र परिवार, नातेवाईक, कुटुंबीय इ.सोबत वेळेत उपस्थित राहून कार्यक्रमाची उंची आणि दर्जा वाढवला.



*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...