संपादक - प्रदीप विष्णु माने 8108253323 ताज्या बातम्या सामाजिक,राजकारण, मनोरंजन,क्रीडा आणि इतर
शनिवार, २४ सप्टेंबर, २०२२
'उत्तर' कार्याला 'निराधारां'ना भरवला 'मायेचा' घासडाकवे परिवाराने जपले सामाजीक ऋण
गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२
स्व. राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तनाचे आयोजन
शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२
सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्नासंदर्भात राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी करणार -मंत्री शंभूराज देसाईंलोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.सहन करण्याची क्षमता संपल्यानेच राज्यातील महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो
सहकारी साखर कारखानदारीचे प्रश्नासंदर्भात राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी करणार -मंत्री शंभूराज देसाईं
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न.
सहन करण्याची क्षमता संपल्यानेच राज्यातील महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो
पाटण दि.17 शेतकऱ्यांच्या उसाला एफ. आर.पी. प्रमाणे योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेला ही योग्य भाव मिळाला पाहिजे.राज्य शासन सहकार क्षेत्र बळकट करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहे.सध्या देशात ८५ लाख टन साखर शिल्लक आहे मात्र केंद्रसरकारकडे सहकारातील अद्याप ही काही प्रलंबित प्रश्न असून हे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी राज्य शासन केंद्राकडे आग्रही मागणी असे प्रतिपादन राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.दरम्यान राज्यातील भाजप -सेना युतीचे हे सरकार राज्यातील सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठाम पणे असल्याचे ही मंत्री देसाई यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची 52 वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्री ना.शंभूराज देसाई यांचे मार्गदर्शनाखाली “महाराष्ट्र दौलत”लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारकामध्ये पार पडली. यावेळी लोकनेते बाळसाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा.यशराज देसाई, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, आदित्यराज देसाई, अशोकराव पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जयवंतराव शेलार,डॉ.दिलीपराव चव्हाण,व्हाईस चेअरमन पांडूरंग नलवडे,शशिकांत कदम,सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील,भागोजी शेळके,बळीराम साळुंखे,शंकरराव पाटील,विजय सरगडे,सुनील पानस्कर,सर्जेराव जाधव,संचालिका श्रीमती जयश्री कवर,सौ.दिपाली पाटील,बबनराव शिंदे,मधुकर पाटील,विजयराव जंबुरे,अभिजित पाटील,सुरेश पानस्कर,ॲङमिलिंद पाटील,चंद्रकांत पाटील, प्रकाशराव जाधव, मधुकर पाटील यांचेसह संचालक मंडळाची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना मंत्री ना.शंभूराज देसाई म्हणाले,सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे.या स्पर्धेत यशस्वीपणे टिकण्यासाठी जिल्ह्यातीलच नव्हे राज्यातील इतर मोठ्या कारखान्याच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असताना ही इतर कारखान्याबरोबर एफ.आर.पी. प्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दर दिला आहे,याचा आपणाला अभिमान आहे.कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफ आर पी चे हप्ते करीत नाही मात्र केंद्र सरकारचे साखर धोरणा संदर्भात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. साखर निर्याती संदर्भातील केंद्राने अडचणी दूर केल्यास राज्यातील साखर कारखानदारी अडचणीतुन बाहेर येण्यास मदत होईल.त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच यासंदर्भात केंद्र सरकारकडे आग्रही मागणी करणार असल्याचे मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले. मंत्री ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले,राज्यातील भाजप सेना युती सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भक्कम असून राज्यातील सहकारी साखर कारखानदारी यशवीपणे टिकविण्यासाठी हे सरकार निश्चितपणे प्रयत्न करीत असून सहकारी साखर उद्योगाच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यावर ही सरकारचे लक्ष असून लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दूरदृष्टी तुन निर्माण झालेल्या आणि स्व. शिवाजीराव देसाई यांच्या आदर्श विचारावर चालणाऱ्या या कारखान्याला राज्य सरकार सर्वोतोपरी सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहे,अशी ग्वाही देवुन मंत्री ना.देसाई म्हणाले प्रतिकूल परिस्थितीमध्ये ही आपल्या कारखान्याची चांगली वाटचाल सुरु आहे. 1250 मे. टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफ.आर.पी.देतो हे एकमेव उदाहरण आहे. 1250 मे. टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करुन एफ.आर.पी.देण्याचा प्रयत्न केला.सभासदांनी व ऊस उत्पादकांनी आपलेपणांन कारखान्याकडे पाहणं गरजेचे आहे.
यशराज देसाई यांनी, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम सध्या सुरू करण्यात आले आहे. सध्या हे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्याचे असून पहिल्या टप्प्याचे काम ऐंशी टक्के झाले असून उर्वरित वीस टक्के काम पूर्ण करणार आहे. तसेच, दुसर्या टप्प्याच्या कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. कारखान्या च्या या विस्तारीकरणामुळे कारखान्याच्या गाळप क्षमतेमध्ये वाढ होणार आहे. ही वाढ झाल्यास सभासद शेतकर्यांच्या सर्व ऊसाचे गाळप वेळेत होण्या स मदत होणार आहे. यंत्रणेच्या तुटवड्याबाबत बोलताना ते म्हणाले, यंत्रणेचा तुटवडा हा केवळ देसाई कारखान्यालाचं नव्हे तर राज्यातील सर्व कारखान्यांना मध्ये आहे. मात्र यावरती तोडगा काढण्यासाठी देसाई कारखान्याचा हायवेट्ररच्या दृष्टीने विचार सुरु असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने देशातील साखरेच्या निर्यातीवरती बंदी घातल्याने अनेक कारखानदारांना साखरेचा कोटा शिल्लक असताना ही निर्यात बंदी मुळे आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. परिणामी एफ आर पी शंभर टक्के देण्यात आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. मात्र देसाई कारखाना येत्या दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांना एफ आर पी ची शंभर टक्के रक्कम देण्यासाठी कटीबद्ध असणार आहे असं सांगितले.
दरम्यान या सभेत विषयपत्रिकेवरील आणि ऐनवेळेच्या सर्व विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली यामध्ये,मंत्री शंभूराज देसाई यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून आणि यशराज देसाई यांची लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.दरम्यान कारखान्याची ५२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.
सहन करण्याची क्षमता संपल्यानेच राज्यातील महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो
महाराष्ट्राला नवी दिशा देताना लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्याचे नंदनवन केले आणी खऱ्या अर्थाने तालुका उभारला मात्र पाटणकरांनी लोकनेत्यांना धोका दिला. ज्यांना बोटाला धरून राजकारणात आणले त्यांच्याशी दगाबाजी केली गेली.संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व करून बिनविरोध निवडून येणाऱ्या लोकनेत्यांच्या विरोधात कट कारस्थाने, दगाबाजी केल्याने लोकनेते शेवटच्या निवडणूकित सहा हजार मतांनी निवडून आले. मुख्यमंत्र्यांच्या नंतरचे दोन नंबरचे पद लोकनेत्यांचे होते. ज्यांनी दगाबाजी केली त्यांच्या मांडींला मांडी लावून आम्ही कदापी बसणार नाही.मात्र अडीच वर्षे तोंड धरून बुक्क्यांचा मार सहन करीत आम्ही राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो. मात्र त्यानंतर सहन करण्याची क्षमता संपल्यानेच राज्यातील महाविकास आघाडी मधून बाहेर पडलो.अशी जोरदार टीका मंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२
तळमावले येथील मर्चंट सिंडिकेट चा उद्या 15 वर्धापनदिन
सोमवार, २९ ऑगस्ट, २०२२
सातारा ; डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध
सातारा ; डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध
सातारा दि. 29 : सातारा जिल्ह्यामध्ये दि. 31 ऑगस्ट 2022 रोजीच्या सकाळी 7 वा.पासून ते दि. 10 सप्टेंबर 2022 रोजीच्या 10 वाजेपर्यंत या कालावधीसाठी डॉल्बी मालक/धारक/गणेश मंडळाचे पदाधिकारी यांना त्याच्या कब्जातील डॉल्बी सिस्टिीम वापरात/उपयोगात आणू नये तसेच डॉल्बी मशिन व त्यासंबंधीची यंत्रसामुग्री स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी यासाठी जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 (1) प्रमाणे त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरण्यास प्रतिबंध आदेश जारी केले.
रविवार, १४ ऑगस्ट, २०२२
मोठी बातमी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचं अपघाती निधन
मेटे यांच्या गाडीची स्थिती पाहून अपघात किती गंभीर आहे याची प्रचिती येत होती. मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर मुंबईच्या दिशेने मेटे येत होते. हायवेवरील पनवेल ते खालपूर दरम्यानच्या माडप बोगद्याजवळ हा अपघात घडला. पुढे जाणाऱ्या गाडीला मेटे यांच्या गाडीने जोरात धडक दिली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गाडीच्या डाव्या बाजूचा चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर मेटे यांना एक तासभर कुणाचीही मदत झाली नाही. त्यानंतर त्यानंतर एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. मेटे यांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.
अपघातानंतर एक तासभर कुणाचीही मदत नाही
मेटे यांचे सहकारी एकनाथ कदम हे देखील यावेळी त्यांच्यासोबत होते. कदम यांच्याशी एबीपी माझानं संवाद साधला त्यावेळी त्यांनीसांगितलं की, बीडकडून आम्ही मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. आम्हाला एका ट्रकने कट मारला. आम्हाला अपघातानंतर एक तास मदत मिळाली नाही, असंही त्यांनी सांगितलं. 100 नंबरला आम्ही फोन केला मात्र त्यांनी फोन उचलला नाही. मदतीसाठी मी प्रत्येकाला विनवणी करत होतो मात्र कुणीही गाडी थांबवली नाही. मी रोडवर झोपलो होतो, आम्ही गाड्यांना हात करत होतो, मग एका गाडीवाल्यानं गाडी थांबवली आणि आम्हाला मदत केली. एका तासानंतर तिथं अॅम्ब्युलंस आली. अपघातानंतर मी मेटे यांच्याशी बोललो तर तेव्हा ते माझ्याशी संवाद करत होते, असंही एकनाथ कदम यांनी सांगितलं. एकनाथ कदम हे अपघातावेळी मेटे यांच्या सोबत होते. कदम यांना या अपघातात किरकोळ मार लागला आहे. मदतीसाठी एक तास कुणीही आलं नसल्याचं कदम यांनी सांगितलं. यंत्रणांनी देखील मदत केली नाही, असं ते म्हणाले.
गुरुवार, ११ ऑगस्ट, २०२२
राज्यात पुन्हा राजकीय भूकंप?; काँग्रेसकडून महाविकास आघाडी फुटण्याचे संकेत
मुंबई - विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावरून महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावं असा दावा काँग्रेसनं केला होता.
याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडी ही नैसर्गिक आघाडी नाही. जनतेनं आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता. परंतु २०१९ च्या निकालानंतर लोकशाहीचा तमाशा भाजपानं केला. विपरीत परिस्थितीत आम्ही महाविकास आघाडीत जाण्याचा निर्णय घेतला होता. जनतेच्या हितासाठी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींनी तो निर्णय घेतला होता. विरोधी पक्षात काम करण्याची आमची मानसिकता होती असं त्यांनी सांगितले.
तसेच महाविकास आघाडी ही कायमची आघाडी नाही. स्थानिक कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर काँग्रेस स्वबळावर लढायला तयार आहे. एकीकडे दोस्ती करायची आणि पाठीवर वार करायची ही भूमिका काँग्रेसची नाही. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद देताना काँग्रेसला विश्वासात घेतले नाही. महाविकास आघाडी म्हणून यावर चर्चा व्हायला हवी होती. चर्चा न करता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता निवडला गेला त्याला आमचा विरोध आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत काँग्रेस राहणार की बाहेर पडणार याबाबत विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवेंची निवड
विधान परिषदेत शिवसेनेचे संख्याबळ जास्त असून विरोधी पक्षनेतेपदी मराठवाड्यातील शिवसेना आमदार अंबादास दानवे यांची निवड करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपसभापतींकडे केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेचे शिफारस पत्रही उपसभापती निलम गोऱ्हे यांना देण्यात आले. त्यानंतर उपसभापती कार्यालयाकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड केल्याचं जाहीर करण्यात आले. मात्र याच निवडीवरून आता महाविकास आघाडीत नाराजीनाट्य रंगलं आहे. त्यात नाना पटोलेंनी मविआ कायमची नाही असं सांगत महाविकास आघाडीत फूट पडण्याचेच संकेत दिले आहेत.
*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*
कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...
-
कुंभारगाव साप्ताहिक कुमजाई पर्व न्यूज प्रतिनिधी. दि. 14 जुलै 2026 चिखलेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मोरेवाडी येथे सोमवारी रात्रीच्य...
-
धक्कादायक घटना! मलकापुरात मित्राकडूनच मित्राचा खून — दारूच्या नशेत उफाळला जुन्या वादाचा राग मलकापूर (कुमजाई पर्व प्रतिनिधी) ...
-
*कुंभारगाव–गलमेवाडीत रात्रीचा थरार: घराजवळील शेडमध्ये बिबट्याचा हल्ला, दोन शेळ्यांचा फडशा.* भरवस्तीत शिरून शेळ्यांवर हल्ला; द...
