गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२

स्व. राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तनाचे आयोजन

स्व. राजाराम डाकवे (तात्या) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कीर्तनाचे आयोजन

तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते राजाराम विठ्ठल डाकवे ऊर्फ तात्या यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवार दि.25 सप्टेंबर, 2022 रोजी रात्री 9.00 वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती डाकवे परिवाराने दिली आहे. आरेवाडी ता.पाटण येथील श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह. भ.प.रामदास महाराज यांचे कीर्तन होणार असून त्यांना या संस्थेतील शिक्षण घेत असलेल्या बाल वारकऱ्यांची साथ लाभणार आहे. 
स्व. राजाराम डाकवे हे समाजशील व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा ज्ञानेश्वरी पारायण, धार्मिक उत्सव यात सहभाग होता. त्यांना अध्यात्मची विशेष आवड होती. त्यामुळेच डाकवे परिवाराने त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हरिकीर्तनाचे आयोजन केले आहे. श्री दत्त मंदिर डाकेवाडीच्या जीर्णोद्धारासाठी "फुल ना फुलाची पाकळी" म्हणून परिवाराने रु.5,555/- ची देणगी दिली आहे. विशेष म्हणजे डाकवे परिवाराने राजाराम डाकवे यांच्या रक्षा नदीत विसर्जित न करता त्यामध्ये वृक्षारोपण करून समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला आहे. 
श्री राम वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक ह.भ.प.रामदास महाराज यांच्या मु. डाकेवाडी, पोस्ट काळगाव, ता.पाटण, जि. सातारा येथे आयोजित केलेल्या कीर्तन सोहळ्यास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा असे आवाहन डाकवे परिवाराने केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची ग्वाही !

पाटण तालुक्यातील दरडग्रस्तांना डिसेंबर अखेरपर्यंत घरे दिली जातील, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण तालुक्याल...