शुक्रवार, ४ जून, २०२१

*सातारा : प्रत्येक गावाने कोरोनामुक्त गाव योजनेत सहभागी व्हावे, आपले गाव कोरोनामुक्त करावे*- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*

*सातारा : प्रत्येक गावाने कोरोनामुक्त गाव योजनेत सहभागी व्हावे, आपले गाव कोरोनामुक्त करावे*
- *पालकमंत्री बाळासाहेब पाटील*
सातारा 4:- राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे, कोरोनावर मात करण्यासाठी महाराष्ट्र कोरोनामुक्त होण्यासाठी राज्य शासनाने "कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना"  सुरू केली आहे. या योजनेत ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवून आपले गाव कारोनामुक्त करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यातयातील परिषद सभागृहात आज पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला.  यावेळी त्यांनी आवाहन केले.  या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये आदी उपस्थित होते
या योजनेंतर्गत प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. याशिवाय त्यांना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत असल्याने जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी या योजनेत सहभाग नोंदवावा.
विविध गावांमध्ये संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहेत .  या कक्षांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी भेटी द्याव्यात, यासाठी एक वेळापत्रक तयार करावे. गृह विलगीकरण बंद करण्यात आले असून जास्तीत जास्त रुग्णांना संस्थात्म्क विलगीकरण कक्षात दाखल करावे. 
या बैठकीमध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व रिलायन्स फाऊंडेशन्सच्यावतीने 25 ऑक्सिजन काँन्सट्रेशन मशिन्स देण्यात आल्या आहेत.  या मशीन्स पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते आरोग्य विभागाला सुपूर्त करण्यात आल्या.

*सातारा जिल्ह्यातील 1588 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 43 बाधितांचा मृत्यू**836 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*

*सातारा जिल्ह्यातील 1588 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 43 बाधितांचा मृत्यू**836 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
 सातारा दि.4 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1588 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 43 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 42(7770), कराड 237 (23033), खंडाळा 102 (10702), खटाव 249 (16635), कोरेगांव 257 (14866),माण 129 (11813), महाबळेश्वर 22 (4099), पाटण 81 (7191), फलटण 108 (26860), सातारा 294 (36230), वाई 58 (11798) व इतर 9 (1088) असे आज अखेर  एकूण 172085 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (171), कराड 7 (664), खंडाळा 2 (138), खटाव 0 (425), कोरेगांव 3 (328), माण 8 (225), महाबळेश्वर 0 (44), पाटण 3 (160), फलटण 2 (258), सातारा 15 (1079), वाई 2 (309) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3801 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
*836 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज* जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 836 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*एकूण नमुने -835039*
एकूण बाधित - *172085*
घरी सोडण्यात आलेले - *151225*
मृत्यू - *3801*
उपचारार्थ रुग्ण- *17055*
                                                                      

तळमावले : डाॅ.संदीप डाकवें ची ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ ने घेतली तिसर्‍यांदा दखल

तळमावले : डाॅ.संदीप डाकवें ची ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ ने घेतली तिसर्‍यांदा दखल

तळमावले/वार्ताहर
‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या अखिल भारतीय विश्वविक्रमांची नोंद घेणार्‍या पुस्तकाने डाॅ.संदीप डाकवे यांची तिसर्‍यांदा दखल घेतली आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून त्यांची 54 चित्रे काढून त्याची फ्रेम ना.देसाई यांना भेट दिली होती. त्यानंतर डाॅ.डाकवे यांनी ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ कडे पत्रव्यवहार केला होता. त्याची दखल घेतल्याचा मेल डाॅ.संदीप डाकवे यांना नुकताच प्राप्त झाला आहे. काही दिवसातच यासंबंधीचे प्रमाणपत्र, मेडल, पुस्तक इ.गोष्टी मिळणार आहेत.
यापूर्वी जास्तीत जास्त मान्यवरांना चित्रे भेट देणे, मराठी संपादकाला त्याच्या वयाइतकी चित्रे भेट देणे अशा दोन अनोख्या उपक्रमांची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. सर्वसामान्य कुटूंबातील या जिद्दी युवकाने ‘इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात तीनदा नाव नोंदवत आपल्या कर्तबगारीचा झेंडा रोवला आहे. त्यामुळे डाॅ.संदीप डाकवे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत नावीण्यपूर्ण उपक्रमाबरोबर जपलेली सामाजिक बांधिलकी अभिमानास्पद आहे. कलेच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमातून सुमारे रु.85 हजारपेक्षा जास्त रकमेची मदत गरजूंना केली आहे.
साहित्य, पत्रकारिता आणि चित्रकारिता यामध्ये डाॅ.डाकवे करत असलेली प्रगती कौतुकास्पद आहे. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून 4 पुरस्कार तर इतर संस्थांनी सुमारे 50 हून अधिक पुरस्कार प्रदान केले आहेत. तसेच त्यांची 4 पुस्तके प्रकाशित झाली असून 6 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत 7,000 पेक्षा जास्त दिग्गज व्यक्तिंना त्यांची चित्रे भेट दिली आहेत. याशिवाय एक डाॅक्युमेंटरीदेखील प्रदर्शित झाली आहे. विविध क्षेत्रातील दिग्गज, सेलिब्रिटी यांनी डाॅ.डाकवे यांचे तसेच ते राबवत असलेल्या उपक्रमांचे जाहीर कौतुक केेले आहे. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य च्या माध्यमातून त्यांनी राबवलेले उपक्रम दिशादर्शक आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या आतापर्यंतच्या कार्याची दखल प्रिंट मिडीया तसेच इलेक्ट्राॅनिक मिडीयाने घेतली आहे. चित्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधन केले आहे. शिवाय अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे देखील साकार केली आहेत. दिवाळी अंक, गौरव ग्रंथ, विशेषांक यांचे संपादन केले आहे. वृत्तमानपत्रातून 500 पेक्षा जास्त पत्रांचे लेखन केले आहे. सध्याच्या सोशल मिडीयाच्या युगात विविध मान्यवरांच्या पत्रांचा सग्रह अतिशय कल्पकतेने जपला आहे. 11 पेक्षा जास्त हस्तलिखिते तयार केली असून 12 पेक्षा जास्त मान्यवर सेलिब्रिटींच्या मुलाखती प्रसिध्द केल्या आहेत.
डाॅ.डाकवे यांनी शासकीय योेजनांची प्रसिध्दी, हस्तलिखीते, कात्रण प्रदर्शने, भित्तीपत्रिका प्रदर्शन, पोस्टर प्रकाशन, जनजागृती करुन त्यांनी आपले वेगळेपण जपले आहे. खडूवर अष्टविनायक, मोरपिसावर संत तुकाराम, जाळीदार पिंपळाच्या पानावर श्री गणेश, अक्षरगणेश, ठिपके, स्क्रिबलिंग, शब्दातून चित्रे रेखाटली आहेत. वारी व जवान यांचे 15 फुट कॅलिग्राफी, घराच्या भिंतीवर वारी व जवानांचे चित्र असे कलात्मक उपक्रम राबवले आहेत. तसेच व्यंगचित्रे, मास्क, छत्री इ.मधून समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक शाळांच्या बोलक्या भिंती विनामुल्य रेखाटल्या आहेत. ‘प्राईड ऑफ स्पंदन’ या पुरस्कार सोहळयातून समाजातील गुणवंताना गौरवले आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या एकंदरित वाटचालीबद्दल परिसरातून कौतुक होत आहे. या निवडीबद्दल डाॅ.संदीप डाकवे यांचे शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार जनार्दन बोत्रे, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, प्रा.ए.बी.कणसे, बाळासाहेब कचरे, जयंत कदम, एन.बी.परीट, सुरेश जाधव, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. 

चौकट :
महाराष्ट्र शासनाचे 4 पुरस्कार प्राप्त
हायरेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्ड पुस्तकात नोंद
विविध संस्थांचे 50 हून अधिक पुरस्कार
खसखस वेबपेज कडून दखल
7000 पक्षा जास्त दिग्गजांना चित्रे भेट

अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी -खा.श्रीनिवास पाटील

अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी -खा.श्रीनिवास पाटील
कराड : प्रतिनिधी
अडचणीच्या काळात मदतीला धावून जाणे हीच खरी माणुसकी आहे. लायन्स क्लबने पारधी समाजासाठी दिलेली ही मदत नसून मायेने पुढे केलेला हात असल्याचे प्रतिपादन खा.श्रीनिवास पाटील यांनी केले.
     कराड येथे लायन्स क्लब, कराड यांच्यावतीने पोलिस स्टेशनच्या आवारात पारधी समाजातील कुटुंबांना अन्नधान्य किटचे वाटप केले. याप्रसंगी ते बोलत होते. पोलिस निरिक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 35 पारधी कुटुंबियांना या किटचे वाटप करण्यात आले.
    खा.पाटील म्हणाले, समाजातील दुर्लक्षित घटकांना कोरोना महामारीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लायन्स क्लब कराड यांनी पारधी समाजातील गरजू व गरीब कुटुंबांना अन्नधान्य स्वरूपात किट वाटप केले हे निश्चितच चांगले समाजकार्य आहे. समजातील गरजू आणि गरीब कुटुंबाचा शोध घेऊन त्यांना या महामारीच्या काळात मदत केली गेली पाहिजे. हे अन्नधान्य स्वरूपातील किट काही काळ या बांधवांच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सोडविण्यासाठी उपयोगी पडेल. कोरोना संपल्यानंतर देखील या बांधवांना आपण सर्वांनी मिळून आधार दिला पाहिजे. त्यांना काही काम देऊन उभे केले पाहिजे. या समाजातील लोकांना निवाराही उपलब्ध करून दिला पाहिजे. याशिवाय त्यांच्या समोर असणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
     दरम्यान या उपक्रमाबद्दल खा.श्रीनिवास पाटील यांनी लायन्स क्लब व पो.नि.बी.आर.पाटील यांचे कौतुक केले. यावेळी डीवायएसपी डॉ.रणजीत पाटील, लायन्स क्लबचे अध्यक्ष सुशांत व्हावळ, डॉ.महेश खुस्पे, नईम कागदी, चंद्रकांत सिकची, प्रकाश पोरवाल, संदीप कोलते, विराग जांभळे, प्रकाश वायदंडे आदींसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : खा श्रीनिवास पाटील

शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करावे : खा श्रीनिवास पाटील

कराड : प्रतिनिधी 
सातारा जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘वॉक इन’ लसीकरणाची सुविधा प्राधान्याने देण्यात यावी अशी सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली आहे.
     सातारा जिल्ह्यातून उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाणारे विद्यार्थी, तसेच दुर्धर आजारावरील औषध उपचारासाठी अथवा नोकरीसाठी परदेशी जाणा-या येथील नागरिकांना लसीकरण सुविधा उपलब्ध व्हावी अशी मागणी सातारा जिल्ह्यातील विद्यार्थी व नागरिकांकडून होत असल्याने याबाबत खा.श्रीनिवास पाटील यांनी साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना पत्र लिहून ही सूचना केली आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे, परदेशात जाताना विश्व स्वास्थ्य संस्थेने मान्यता दिलेल्या लसीचं ग्राह्य धरल्या जातात. बहुतांशी मुलांनी उच्च शिक्षणासाठी परदेशी स्थित विद्यापीठात प्रवेश घेतला आहे. त्यासाठी त्यांना सप्टेंबर महिन्यात परदेशी शिक्षणासाठी जायचे आहे. परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये. तर काही तरूण मुले नोकरीसाठी परदेशी जाणार आहेत. तसेच काही नागरिक देखील औषधोपचार करण्यासाठी परदेशात जाऊ इच्छितात. 
     सदर समस्येचा विचार करुन सातारा जिल्ह्यातून परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, औषधोपचार आणि नोकरीसाठी जाणा-या 45 वर्षांच्या आतील नागरिकांसाठी त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यास लसीकरण केंद्रावर ‘वॉक इन’ पध्दतीने  लसीकरणाची व्यवस्था करून लस देण्यात यावी अशी सूचना त्यांनी केली आहे.

गुरुवार, ३ जून, २०२१

अनलॉक महाराष्ट्र : तत्वत: मान्यता अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील :विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न

अनलॉक महाराष्ट्र : तत्वत: मान्यता अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील :विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न
मुंबई । प्रत्येक मोठ्या निर्णयासंदर्भात राज्य सरकारमधील संभ्रम सर्वसामान्यांना देखील बुचकळ्यात टाकत आहे. ताजे उदाहरण म्हणजे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी थोड्याच वेळापूर्वी राज्यात ५ टप्प्यांत अनलॉकची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र, वडेट्टीवारांच्या या घोषणेनंतर आता राज्य सरकारकडून तितडीने स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 'राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत', असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहेत. इतकेच नव्हे तर आता विजय वडेट्टीवार यांनी देखील आपल्या विधानावरून यूटर्न घेतला आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे.यात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन काढायचा याचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील.'

विजय वडेट्टीवारांचा यू-टर्न

आपल्या विधानावर स्पष्टीकरण देताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, 'गफलत वगैरे काहीही नाही. बैठकीमध्ये ५ टप्पे ठरवण्यात आलेले आहेत. त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ज्या भागातील जनतेने सहकार्य केले, त्या भागातला लॉकडाउन या प्रक्रियेने कमी करायचा हे धोरण आपण ठरविलेले आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असताना या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. या एकूण पॉझिटिव्हिटी रेट किंवा ऑक्सिजन बेडच्या ऑक्युपन्सीच्या आधारावर हा निर्णय घेण्याचं ठरलं आहे. याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. यात टप्प्याटप्प्याने लॉकडाउन काढायचा याचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील', असे स्पष्टीकरण विजय वडेट्टीवार यांनी दिले आहे.

राज्य सरकारने काय दिले होते स्पष्टीकरण ?

'कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत', असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहेत.

निर्णय अद्याप विचाराधीन !

ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन ५ टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी दर आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे जाहीर करण्यात येतील.

अधिकृत निर्णय नंतर कळवला जाईल !

राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, 'राज्यात अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव अद्याप विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन त्याबाबतच्या अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते पुढे शासननिर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात येईल.'

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मोठी बातमी उद्यापासून होणार राज्यात अनलॉकच्या नव्या नियमांची अंमलबजावणी

राज्यातील लॉकडाऊन संदर्भात मोठी बातमी उद्यापासून होणार राज्यात अनलॉकच्या नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : महाविकास आघाडी सरकारने गुरुवारी मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेला लॉकडाऊन काही जिल्ह्यांमध्ये शिथील करण्याचे निश्चित झाले आहे. त्यासाठी एक निकष लावण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा पॉझिटीव्हिटी रेट (बाधित होण्याचा दर) ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे तेथे लॉकडाऊन हटविण्यात आला आहे. तशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

हा आहे निकष

ज्या ठिकाणी पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्के किंवा त्यापेक्षा कमी आहे

ऑक्सिजनचे बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे

हे सुरू होणार

मॉल्स, हॉटेल्स, दुकाने पुर्वीप्रमाणेच सुरू होतील

क्रीडांगणे, जॉगिंग ट्रॅक, खासगी आणि शासकीय कार्यालय पूर्णपणे सुरू होतील

चित्रपट गृहे, मल्टीप्लेक्स सुरू होतील

चित्रपट शुटींगला परवानगी

सार्वजनिक कार्यक्रम व लग्न सोहळ्यांना मान्यता

जमावबंदी राहणार नाही

जीम सुरू होणार

एसटीची सेवा १०० टक्के क्षमतेने

-

एकूण ४ टप्प्यात अनलॉक

पहिल्या टप्प्यात १८ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, ऑक्सिजन बेड्स २५ टक्क्यांपेक्षा कमी टक्के भरलेले)

दुसऱ्या टप्प्यात ५ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के, ऑक्सिजन बेड्स २५ ते ४० टक्के भरलेले)

तिसऱ्या टप्प्यात १० जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट ५ ते १० टक्के, ऑक्सिजन बेड्स ४० टक्के भरलेले)

चौथ्या टप्प्यात २ जिल्हे (पॉझिटिव्हीटी रेट १० ते २० टक्के, ऑक्सिजन बेड्स ६० टक्के भरलेले)

-

पहिल्या टप्प्यात हे जिल्हे

नाशिक, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा ,चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ (संपूर्ण अनलॉक)

दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदूरबार ( अंशतः निर्बंध शिथिल)

तिसऱ्या टप्प्यातील जिल्हे

अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर ( अंशतः निर्बंध शिथिल)

चौथ्या टप्प्यातील जिल्हे

पुणे, रायगड ( अंशतः निर्बंध शिथिल)

*कुंभारगाव माटेकरवाडी येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना व भव्य कलश मिरवणूक*.

          = कुंभारगाव तालुका पाटण येथील माटेकरवाडी येथे शंभू महादेव शिवलिंग, नंदी, श्री पार्वती माता, श्री गणेश, श्री हनुमान, श्...