गुरुवार, ३ जून, २०२१

काळगाव: धामणीत कोरोनाला नो एन्ट्री : : कैतुकास्पद उपक्रम

काळगाव:  धामणीत कोरोनाला नो एन्ट्री : : कैतुकास्पद उपक्रम 
मनोज सावंत /काळगाव
काळगाव : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे, युवा नेते व समाज सेवक विशाल पवार (भैय्या) व सरपंच आशा नेर्लेकर,उपसरपंच रमेश सवादेकर ,ग्रामसेवक भुईर अण्णा व ग्रामपंचायत सदस्य यांनी  गावातील ग्रामस्थांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये, तसेच गावातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धामणी गावच्या ग्रामपंचायतीने विशाल पवार (भैय्या) यांच्या   नेतृत्वाखाली एक दिवस आड संपूर्ण गावांमध्ये औषध फवारणीचा उपक्रम सुरु केलेला आहे.ही गोष्ट छोटी आहे...मात्र तितकीच डोंगराएवढी मोठी आहे. काळगाव भागातील नेहमीच आदर्श असणाऱ्या ऐतिहासिक धामणी गावात विशाल पवार यांनी स्वतः गावामध्ये स्यानिटायझरचा पंप आपल्या खांद्यावर घेऊन फवारणी करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे .
    गेल्या वर्षी धामणी येथे कोरोनाने चार नागरिकांचा बळी घेतला व गावाला कोविड परिस्थितीचा सुमारे चार महिने सामना करावा लागला त्यावेळी ज्या चुका झाल्या त्या ह्या वेळी होऊ नये यासाठी ग्रामपंचायत धामणी अग्रेसर राहणार आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गावातील नागरिकांनी मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ठेऊन प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे

*सातारा जिल्ह्यातील 1531 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 1531 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 28 बाधितांचा मृत्यू*
 सातारा दि. 3 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1531 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 28 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 44, कराड 253, खंडाळा 77, खटाव 182, कोरेगांव 191,माण 90, महाबळेश्वर 27, पाटण 130, फलटण 188, सातारा 273, वाई 70  व इतर 6  असे आज अखेर  एकूण 170845 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1 (170), कराड 9 (657), खंडाळा 0 (136), खटाव 7 (425), कोरेगांव 3 (325), माण 1 (217), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 0 (256), सातारा 7 (1064), वाई 0 (307) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3758 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

सातारा :कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती

*कोरोना रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती*

 - *जिल्हाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश*

सातारा  2:- कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करावी.  शाळांना सुट्टी असल्यामुळे काही शिक्षक आपल्या गावी गेली असतील  त्यांना तात्काळ मुख्यालया हजर राहण्याबाबत कळवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आज जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना केल्या. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
ज्या गावातील शिक्षक आहे, त्याच गावात त्या शिक्षकाला कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी नियुक्ती करण्यात यावी. ज्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे त्यांना काय काम करावयाचे याची सविस्तर माहिती द्यावी. शिक्षकांनी कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांची माहिती संबंधितांना द्यावी. या कामासाठी विविध विभागांची मदत घ्या. तसेच संपर्कात आलेल्यांची आरोग्य विभागाने तात्काळ कोरोना चाचणी ही करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बैठकीत केल्या. 
या बैठकीमध्ये ऑक्सिजन बेड, आयसीयु बेड, ऑक्सिन उपलब्धतेबाबत व औषधसाठांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

तळमावले : अनिल वायचळ यांचा ‘स्पंदन’ कडून शौर्य मानपत्राने गौरव

तळमावले : अनिल वायचळ यांचा ‘स्पंदन’ कडून शौर्य मानपत्राने गौरव
तळमावले/वार्ताहर
तौक्ते चक्रीवादळात खवळलेल्या समुद्रात तब्बल 9 ते 10 तास झुंज देवून घरी परतलेल्या इंजि.अनिल वायचळ यांचा ‘स्पंदन’ च्यावतीने शौर्य मानपत्र देवून गौरव करण्यात आला. स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हा अनोखा सन्मान केला गेला. याप्रसंगी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.संदीप डाकवे, सत्यम पाचुपते आणि वायचळ कुटूंबीय उपस्थित होते. दरम्यान, अनिल वायचळ यांनी अनुभवलेला थरारक प्रसंग उपस्थितांना कथन केला.
अनिल वायचळ यांनी समु्रदात दाखवलेले झुंजार धाडस तसेच सोबत असणारे सहकारी यांना दिलेला धीर यांचे कौतुक करण्यासाठी तसेच नौदलाच्या जवानांचे आभार व्यक्त करण्यासाठी सदर मानपत्र दिल्याचे ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष डाॅ.डाकवे यांनी सांगितले. स्पंदन ट्रस्टने आतापर्यंत सामाजिक बांधिलकी जपणारे 90 पेक्षा अधिक उपक्रम राबवत समाजमनावर आपली कर्तृत्वमुद्रा उमटवली आहे. 

बुधवार, २ जून, २०२१

*कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत**- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती**· प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस*

*कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत*
*- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती*
*· प्रत्येक महसुली विभागात पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपयांचे बक्षीस*
*· याशिवाय प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख, २५ लाख व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार*

मुंबई, दि. २ : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे केली.  

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधताना कोरोना संसर्गाला गावच्या वेशीवरच रोखलेल्या गावांचा गौरव केला होता. या उपक्रमास आता अधिक चालना देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. कोरोनामुक्त गाव स्पर्धेत प्रत्येक महसूल विभागात चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये याप्रमाणे बक्षीस दिले जाणार. राज्यातील ६ महसुली विभागात प्रत्येकी ३ प्रमाणे राज्यात एकुण १८ बक्षीसे दिली जातील. यासाठी बक्षीसांची एकुण रक्कम ५ कोटी ४० लाख रुपये असेल. याशिवाय कोरोनामुक्त गाव स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या पहिल्या ३ ग्रामपंचायतींना लेखाशिर्ष पंचवीस पंधरा (२५१५) व तीस चोहोपन (३०५४) या योजनांमध्ये प्राधान्य देऊन यामधून प्रत्येक महसूल विभागात पहिल्या तीन ग्रामपंचायतींना अनुक्रमे ५० लाख रुपये, २५ लाख रुपये व १५ लाख रुपये इतक्या निधीची विकासकामे मंजुर केली जाणार आहेत.

राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने कोरोनामुक्तीसाठी ग्रामपंचायत स्तरावर ५ पथकांची स्थापना करुन त्यांच्यामार्फत विविध उपक्रम राबवावयाचे आहेत. यामध्ये ग्रामपंचायत प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करुन त्यासाठी कार्यवाही करणारे पथक, करोना तपासणीसाठी व रुग्णांना रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे पथक, कोविड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथक या पथकांचा समावेश असेल, अशी माहिती मंत्री श्री. मुश्रीफ यांनी दिली.   

*गावांचे विविध २२ निकषांवर होणार गुणांकन*

स्पर्धेत सहभागी गावांचे विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. यामध्ये कोरोनामुक्त समितीची निर्मिती करणे, पथकांची निर्मिती करणे, कोरोनाबाधित गावांचे सर्वेक्षण व कॉन्टॅक्ट क्रेसिंग करणे, गावपातळीवर अँटीजेन टेस्टची सुविधा उपलब्ध करणे, टेस्टमध्ये पॉझीटिव्ह आढळणाऱ्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा रुग्णालयामध्ये तत्काळ दाखल करणे, लक्षणे दिसणाऱ्या व्यक्तिंना विलगीकरण केंद्रात ठेवणे, यासाठी अल्पदरात वाहनव्यवस्था करणे, विलगीकरण केंद्रावर पाणी, वीज, स्वच्छता, मास्क, सॅनिटायझरची सुविधा उपलब्ध करणे, गावातील खाजगी डॉक्टर व फार्मासिस्ट यांचा सक्रीय सहभाग घेणे, शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्य पॉझिटीव्ह आल्यास त्यांच्याकडील उत्पादीत दुध व भाजीपाला हे अनुक्रमे दुध डेअरी व मार्केटला स्वयंसेवकांमार्फत पोहोच करणे, सहकारी संस्था, बचतगट यांचा सहभाग घेणे, कोरोनाबाधित रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रम राबविणे, कोरोनाविरहीत कुटुंबांची नोंद ठेवणे व काळजी घेणे, लसीकरणासाठी मदत करणे, उपलब्ध लसीचे शासकीय नियमानुसार योग्य वाटप करणे, लहान बालकांचे, गरोदर महिलांचे सर्वेक्षण करणे, जनजागृतीसाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणे, विविध तंत्रज्ञानाचा वापर करणे, नोकरीनिमित्त किंवा व्यवसायानिमित्त बाहेरगावी असणाऱ्या व्यक्तींबाबत योग्य ती खबरदारी घेणे, मृत्यूदर कमी असावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न, पथकातील एकही स्वयंसेवक कोरोनाबाधित न होण्यासाठी नियमांचे पालन करणे, कोरोनामुळे आई-वडीलांचे निधन झालेल्या अनाथ मुला-मुलींचा सांभाळ करणे अशा विविध २२ निकषांवर गुणांकन करण्यात येणार आहे. ५० गुणांचे हे गुणांकन असेल. १ जून २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत ग्रामपंचायतींनी केलेले कार्य विचारात घेण्यात येईल. यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. स्पर्धेत राज्यातील सर्व गावांनी सहभागी होऊन आपले गाव लवकरात लवकर कोरोनामुक्त करावे, असे आवाहन मंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आहे.

कराड :उचाट ते शिंदी रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव वनविभागाला सादर

कराड :उचाट ते शिंदी रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव वनविभागाला सादर 

कराड : प्रतिनिधी 
कांदाटी खो-यातील उचाट ते शिंदी रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी खा.श्रीनिवास पाटील प्रयत्नशील असून तसा प्रस्ताव बांधकाम विभागाने वनविभागाला सादर केला आहे. त्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.
     सन 1980 पूर्वी पासून अस्तिवात असणारा चतुरबेट ते शिंदी ह्या रस्त्यापैकी उचाट ते शिंदी हा 20 कि.मी. अंतराचा रस्ता कोयना अभयारण्यात असल्याामुळे त्या‍चे डांबरीकरण रखडलेले होते. परंतू नुकतेच केंद्र शासनाने 1980 पूर्वीच्या रस्‍त्‍यांचे डांबरीकरण राज्य सरकारच्या मान्यतेने करावे असा आदेश पारित केला आहे. त्यासंदर्भात काही दिवसापूर्वी खा.श्रीनिवास पाटील यांनी सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पा‍च्या अधिका-यांची बैठक घेतली होती. यावेळी ह्या रस्त्याला मान्यता दयावी अशी सूचना त्यांनी अधिका-यांना केली होती. त्याानंतर खा.श्रीनिवास पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय मुनगिलवार यांना तसा प्रस्तााव तयार करण्यााची सूचना केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाचे (पश्चिम) कार्यकारी अभियंता यांनी उचाट ते शिंदी ह्या कोयना अभयारण्यातून जाणा-या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव मंजूरीसाठी सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाकडे सादर केला आहे. सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पा‍कडून हा प्रस्ताप नागपूर येथे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे मंजूरीसाठी पाठण्यात येणार आहे. 
       कांदाटी खो-यात उचाट ते शिंदी रस्त्याचे डांबरीकरण होण्यामुळे या भागातील दळणवळण व पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच पुरातन शिवकालीन मंदीरे असणा-या चकदेव व पर्वत येथे जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट देेखील यामुळे जोडला जाणार आहे.

*सातारा जिल्ह्यातील 5107 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज* *1522 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू*

*सातारा जिल्ह्यातील 5107 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज* 
*1522 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 32 बाधितांचा मृत्यू*

सातारा दि. 2 : जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1522 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 32 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.
  तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 52 (7684), कराड 244 (22643), खंडाळा 80 (10523), खटाव 227 (16204), कोरेगांव 130 (14468),माण 133 (11644), महाबळेश्वर 20 (4050), पाटण 47 (7028), फलटण 204 (26564), सातारा 297 (35763), वाई 77 (11670 ) व इतर 11 (1073) असे आज अखेर  एकूण 169314 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 
  तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 1(169), कराड 1 (648), खंडाळा 1 (136), खटाव 4 (418), कोरेगांव 5 (322), माण 2 (216), महाबळेश्वर 0 (44), पाटण 0 (157), फलटण 3 (256), सातारा 13 (1057), वाई 2 (307) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3730 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
*5107 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज*
 जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 5107 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*एकूण नमुने -810445*
*एकूण बाधित - 169314*  
*घरी सोडण्यात आलेले -148052*  
*मृत्यू -3730*
*उपचारार्थ रुग्ण-17529*

*लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण व खाऊ वाटप कार्यक्रम उत्साहात संपन्न*

कुंभारगाव, दि. २२ जुलै : *महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार व परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्र...