कराड : प्रतिनिधी
कांदाटी खो-यातील उचाट ते शिंदी रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी खा.श्रीनिवास पाटील प्रयत्नशील असून तसा प्रस्ताव बांधकाम विभागाने वनविभागाला सादर केला आहे. त्यामुळे या कामाला गती मिळाली आहे.
सन 1980 पूर्वी पासून अस्तिवात असणारा चतुरबेट ते शिंदी ह्या रस्त्यापैकी उचाट ते शिंदी हा 20 कि.मी. अंतराचा रस्ता कोयना अभयारण्यात असल्याामुळे त्याचे डांबरीकरण रखडलेले होते. परंतू नुकतेच केंद्र शासनाने 1980 पूर्वीच्या रस्त्यांचे डांबरीकरण राज्य सरकारच्या मान्यतेने करावे असा आदेश पारित केला आहे. त्यासंदर्भात काही दिवसापूर्वी खा.श्रीनिवास पाटील यांनी सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाच्या अधिका-यांची बैठक घेतली होती. यावेळी ह्या रस्त्याला मान्यता दयावी अशी सूचना त्यांनी अधिका-यांना केली होती. त्याानंतर खा.श्रीनिवास पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता संजय मुनगिलवार यांना तसा प्रस्तााव तयार करण्यााची सूचना केली होती. त्यानुसार बांधकाम विभागाचे (पश्चिम) कार्यकारी अभियंता यांनी उचाट ते शिंदी ह्या कोयना अभयारण्यातून जाणा-या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रस्ताव तयार केला आहे. तो प्रस्ताव मंजूरीसाठी सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाकडे सादर केला आहे. सह्याद्रि व्याघ्र प्रकल्पाकडून हा प्रस्ताप नागपूर येथे प्रधान मुख्य वनसंरक्षकांकडे मंजूरीसाठी पाठण्यात येणार आहे.
कांदाटी खो-यात उचाट ते शिंदी रस्त्याचे डांबरीकरण होण्यामुळे या भागातील दळणवळण व पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच पुरातन शिवकालीन मंदीरे असणा-या चकदेव व पर्वत येथे जाण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होणार आहे. याशिवाय रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट देेखील यामुळे जोडला जाणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा