२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद वीरांना मनसे प्रभाग १४३ कडून अभिवादन
मानखुर्द प्रतिनिधी विजय साबळे मुंबई : २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतमातेच्या वीर पुत्रांना तसेच हल्ल्यात प्राण गमावलेल्या निरपराध नागरिकांना आदरांजली अर्पण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना – अणुशक्ती नगर विधानसभा, प्रभाग क्रमांक १४३ यांच्या वतीने श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम दिनांक २६ नोव्हेंबर २०२५, बुधवार रोजी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार, श्री नवीनभाऊ आचार्य, श्री रविंद्रदादा शेलार, श्री सचिनदादा ससाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे संयोजन श्री सुरेशभावजी शेट्टी, श्री राजेशदादा पूर्भे, श्री कैलासदादा चौधरी, श्री संदीपदादा बनसोडे, श्री योगेश घनदाट, श्री पवन पवार यांच्या सहकार्याने करण्यात आले.
श्रद्धांजली कार्यक्रमाला ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक,तसेच श्री किसन टिकेकर, श्री राजाराम मांगले, श्री लक्ष्मण जानकर, श्री अमोल मुळे तसेच शिवसेना शाखाप्रमुख श्री.किरण सावंत, श्री कृष्णा शिंदे (मामा) यांसह शिवसेना व महाराष्ट्र सैनिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी शहीद जवानांना पुष्प अर्पण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमात २६/११ च्या स्मृती उजाळ्या देत हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या शौर्याची आठवण करून देण्यात आली. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी भारताच्या सुरक्षेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
आयोजक
- मनसे सर्व मित्र परिवार – प्रभाग १४३
- सौ. अस्मिताताई कोयंडे – महाराष्ट्र सैनिक
- श्री. अविनाश नटे – शाखा सचिव

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा