सोमवार, ८ जुलै, २०२४

सर्वसामान्य जनतेसाठी शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी नेहमी तत्पर राहावे..प्रांताधिकारी सुनील गाढे

सर्वसामान्य जनतेसाठी शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी नेहमी तत्पर राहावे..प्रांताधिकारी सुनील गाढे 
पाटण - पाटण सारख्या दुर्गम व डोंगराळ भागातील नागरिक हे त्यांचे प्रशासकीय कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी त्यांचे एका दिवसाचे संपूर्ण शेतीकाम व इतर काम बाजूला ठेऊन खाजगी वाहनाने किंवा एस टी ने तालुक्याच्या मुख्यालयाला येत असतात. त्यावेळी त्यांच्या प्रशासकीय कामासाठी सर्वच विभागातील कर्मचारी व अधिकारी यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद देऊन त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी नेहमीच  तत्पर  राहिले पाहिजे असे प्रतिपादन पाटण चे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी प्रांत कार्यालयातील अव्वल कारकून श्री.अजमुद्दिन मुलाणी यांचे सेवा निवृत्तीनिमित आयोजित केलेल्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात केले आहे. 
पाटण प्रांत कार्यालयातील अजमुद्दीन मुलाणी हे नियत वयोमानानुसार 30 जून 2024 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.  मूळचे खटाव तालुक्यातील मांडवे गावामधील रहिवासी असलेले श्री. मुलाणी यांनी सुरवातीच्या काळात  महसूल विभागात अंशकालीन कर्मचारी म्हणून कामकाज केल्यानंतर पुढील काळात महसूल विभागात त्यांना सामावून घेण्यात आले.सातारा जिल्ह्याच्या विविध भागात सेवा केल्यानंतर सुमारे 18 वर्षाच्या सेवेनंतर महसूल विभागातून ते सेवानिवृत्त झाले आहे. 18 वर्षाच्या सेवेच्या कालावधीतील पाटण मध्ये त्यांनी सुमारे 6 वर्ष प्रांत कार्यालयात कामकाज पाहिले आहे. शांत व संयमी तसेच येणाऱ्या व्यक्तीचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा कर्मचारी म्हणून त्यांचा नाव लौकिक होता.पाटण प्रांत कार्यालयात मध्यंतरी  सुमारे 5 वर्ष नायब तहसीलदार पद रिक्त असताना त्यांनी या पदाची धुरा यशस्वीपणे  सांभाळली. निवडणूक विषयक ,तसेच पोलीस पाटील भरती , कोतवाल भरती आदी संवेदनशिल विषय देखील त्यांनी सक्षमपणे हाताळले असे  पुढे प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी नमूद केले आहे.
पाटण प्रांत कार्यालयात पोलीस पाटील कोतवाल ,तलाठी तसेच तालुक्याच्या विविध भागातून येणारी जनता त्यांचेकडे हककचा माणूस म्हणून पाहत असे .आपल्या कामाची कैफियत प्रांत अधिकारी यांचे आधी सर्व प्रथम त्यांच्याकडे  मांडली जायची.असे प्रतिपादन तहसीलदार अनंत गुरव  यांनी त्यांचे भाषणा दरम्यान केले.
याप्रसंगी तलाठी संघटनेचे अध्यक्ष  श्री.लुगडे अण्णा, मंडळ अधिकारी पाटण विलास गभाले, पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष,पत्रकार यांचे वतीने विद्या म्हासूर्णेकर आदींनी मनोगत व्यक्त केले.
श्री. मुलाणी यांनी सत्कारास उत्तर देताना सांगितले की,  प्रशासकीय सेवा संदर्भात  पाटण कडे पाहण्याचा सरकारी अधिकारी कर्मचारी यांचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक असल्याचे सांगितले.पाटण हा निसर्गरम्य भाग असून येथील जनता खूप चांगली आहे. काम करणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे ते नेहमीच तोंड भरून कौतुक करतात असा अनुभव आहे.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की पाटण मध्ये जेव्हापासून प्रांत अधिकारी सुनील गाढे यांनी कार्यभार सांभाळला आहे तेव्हापासून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात प्रशासकीय कामे पार पाडताना  सर्वच कर्मचारी यांनी गेले 3 वर्ष  अनुभवले आहे. सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रशासकीय कामे पोहचविण्याची त्यांची तळमळ आमच्यासारख्या सर्व सामान्य कर्मचारी याना निश्चितपणे प्रेरणा देत राहते असे देखील त्यांनी पुढे नमूद केले.
या निरोप समारंभ प्रसंगी श्री
 अजमुद्दिन मुलाणी यांचा महसूल प्रशासनातर्फे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मुलाणी हे सहकुटुंब उपस्थित होते. सदर कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी, पोलीस पाटील ,तलाठी ,कोतवाल, मंडळ अधिकारी ,महसूल कर्मचारी,पत्रकार , राजकीय पक्षाचे प्रतिनिधी , तसेच काही सेवानिवृत्त महसूल कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे प्रितीसंगमावर स्व. यशवंतराव चव्हाण यांना भावपूर्ण अभिवादन. सातारा | दि. २ : महाराष्ट्राचे शिल्पका...