शुक्रवार, ९ जून, २०२३

कुंभारगाव श्री.लक्ष्मीदेवी हायस्कूलने निकालाची परंपरा कायम सावली फाउंडेशन, कुंभारगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 सावली फाउंडेशन, कुंभारगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

पाटण: श्री. लक्ष्मीदेवी हायस्कूल, कुंभारगाव या विद्यालया मधील एसएससी बोर्ड 2023 परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सावली फाउंडेशन, कुंभारगाव तर्फे हार्दिक सत्कार आणि अभिनंदन करण्यात आले. माध्यमिक शालांत परीक्षा मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये श्री. लक्ष्मीदेवी हायस्कूलने निकालाची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये तळमावले केंद्रात श्री लक्ष्मीदेवी हायस्कूलच्या कु.श्रद्धा दीपक मोरे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवला असून विद्यालयाचा निकाल 93.54% लागलेला आहे. विद्यालयात कु. श्रद्धा दीपक मोरे हिने 94.60%  मिळवून प्रथम क्रमांक तर  कु. सागरे ऋतुजा महेंद्र हिने 83.60 % मिळवून दुसरा आणि लोकरे गणेश प्रवीण याने 77.80% मिळवून तिसरा क्रमांक पटकावला.
सावली फाउंडेशन, कुंभारगाव ही एक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी अग्रेसर संस्था आहे. या संस्थेने आजपर्यंत अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवलेले आहेत. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक, संस्थापक परमपूज्य डॉ. बापूजी साळुंखे यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी सावली फाउंडेशनचे प्रा. सुरेश यादव, प्रा. अण्णासाहेब पाटील, श्री. ऋषिकेश बोत्रे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका कराळे मॅडम, शिक्षक श्री. महाबळ ए.पी. श्री.कुंभार डी.जे. श्री. सुतार एस बी आणि सर्व विद्यार्थी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमास प्रा. सुरेश यादव, प्रा. अण्णासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. महाबळ ए.पी. यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक तर श्री. कुंभार डी.जे. यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फाउंडेशनचे श्री. सुनील वरेकर, प्रा. सुरेश चिखले, श्री. शंकर मोरे, श्री. उत्तम मोरे, श्री. विश्वास चिखले,  श्री. युवराज धोत्रे, श्री. अरुण मोरे फौजी, श्री. विश्वनाथ चिखले, श्री. अमोल चिखले, श्री. जालिंदर यादव, श्री. निलेश चिखले, श्री. पवन मोरे, श्री. रवी काटे, श्री. साहिल धोत्रे, श्री. संदीप चिखले फौजी, श्री. सुहास यादव, आणि श्री. विशाल यादव यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...