शुक्रवार, ९ जून, २०२३

दिग्गज सेलिब्रिटींसमोर रंगली डाॅ.संदीप डाकवेंच्या अक्षरगणेशाची कलाकारी




तळमावले/वार्ताहर
आपल्या जादूई चित्रकलेच्या माध्यमातून सर्वांवर आपली अनोखी छाप उमटवणारे पाटण तालुक्यातील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांची दिग्गज सेलिब्रिटींसमोर अक्षर गणेशाची कलाकारी जोरदार रंगली. मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार भरत जाधव, नाटयपरिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, कमलाकर सातपुते, संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख या सेलिब्रिटींसमोर त्यांच्या नावातील लाईव्ह अक्षरगणेशा रेखाटत त्यांच्या कडून टाळया मिळवल्या.



कला जोपासत डाॅ.संदीप डाकवे यांनी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दिलेले योगदान उल्लेखनीय स्वरुपाचे आहे.
यापूर्वीही त्यांनी विविध मालिका, चित्रपट यांच्या सेटवर जावून आपली कला सादर केली आहे. नाना पाटेकर, डाॅ.गिरीश ओक, डाॅ.अमोल कोल्हे, वैभव मांगले, स्पृहा जोशी, अशोक शिंदे, रविंद्र बेर्डे, सुरेखा कुडची, सुबोध भावे, संतोष जुवेकर, अभिजीत खांडकेकर, अनिता दाते, मकरंद अनासपुरे, जयराज नायर, संजय नार्वेकर, सागर कारंडे, भाऊ कदम, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, प्राजक्ता माळी आदींसह विविध क्षेत्रातील सुमारे 14 हजाराहून अधिक मान्यवरांना कलाकृती दिल्या आहेत. ज्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकाॅर्ड आणि वल्र्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकाॅर्ड मध्ये तीनदा, हायरेंज बुक ऑफ रेकाॅर्ड, आणि द ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकाॅर्ड या पुस्तकांनी घेतली आहे.


अक्षरगणेशा, शब्दचित्रे आणि चित्रकलेच्या अन्य माध्यमातून मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत दिग्गज सेलिब्रिटींसह अन्य क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या कलेच्या प्रेमात पाडणाऱ्या डाॅ.संदीप डाकवे यांना खूप शुभेच्छा..!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...