गुरुवार, १५ जून, २०२३

कॅलिग्राफीतून अभंग चित्र वारी साकारणारा अक्षर वारकरी

 कॅलिग्राफीतून अभंग चित्र वारी साकारणारा अक्षर वारकरी


 


तळमावले/वार्ताहर
पंढरपूर वारीच्या निमित्ताने प्रतिवर्षी अक्षर वारकरी डाॅ.संदीप डाकवे अनोखा कलात्मक उपक्रम राबवतात यंदा डाॅ.डाकवे हे कॅलिग्राफीतून अभंग चित्र वारी साकारणार आहेत. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखींचे प्रस्थान झाल्यापासून दररोज कॅलिग्राफीतून अभंग आणि त्याला साजेसे चित्र तयार करत आहेत. आषाढी एकादशी दिवशी या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा मानस डॉ. संदीप डाकवे यांनी केला आहे.
डाॅ.संदीप डाकवे हे गेले काही वर्षापासून आषाढी वारीचे औचित्य साधून एक वेगळा, नावीण्यपूर्ण कलात्मक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे यापूर्वी डाॅ.डाकवे यांनी एका पानावर हरिपाठ लेखन, टी शर्टवर विठूरायाचे चित्र, मोरपिसावर संत तुकाराम, 16 फुट बाय 2 फुट आकाराच्या पोस्टरातून वारकऱ्यांना शुभेच्छा, घराच्या भिंतीवर 14 फूट बाय 6 फूट आकारात वारीचे भव्यदिव्य चित्र, अक्षर अभंग वारी उपक्रम, शब्दांच्या वेलबुट्टीतून विठूराय आदी कलात्मक उपक्रम राबवले आहेत.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या या छंदाची दखल प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक मिडीयाने यापूर्वी अनेकदा घेतली आहे. कलात्मक उपक्रम राबवतानाच त्यातून समाजाप्रती दान देवून त्यातून उतराई होण्याचा प्रयत्न डाॅ.डाकवे यांनी केला आहे. महाराष्ट्र शासन दरबारी चारवेळा आणि इतर सामाजिक संस्थानी त्यांना पुरस्कार देवून त्यांच्या कार्याचा सन्मान केला आहे.


 


डाॅ.डाकवे यांनी कलेमध्ये आठ विश्वविक्रम केले असून कलात्मक उपक्रमाच्या माध्यमातून गरजूंना सुमारे एक लाख रुपयांची रोख आर्थिक मदत केली आहे. डाॅ. डाकवे हे सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष आहेत. त्यांची 9 पुस्तके, 13 हस्तलिखिते प्रकाशित झाली असून 4 पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेल्या या अभंग चित्र वारी उपक्रमाचे वारकरी वर्गातून कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मंद्रूळकोळे खुर्द येथे नविन ट्रान्सफॉर्मर बसविलाविकासाठी झुकते माप देणाऱ्या ना. शंभूराज देसाई यांचे आभार

ढेबेवाडी प्रतिनिधी            सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून मिळालेले मंद्रूळकोळे खुर्द येथे ...