शनिवारी पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन.
दहावीनंतर काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. दहावीनंतर तुम्ही जी शाखा निवडतात यावर तुमच्या करिअरची दिशा ठरते. शक्यतो तुम्ही तुमच्या पसंतीच्या कोर्ससाठी १० वी १२ वी नंतर प्रवेश घेतात.
यासाठी करियर मार्गदर्शन फार महत्वाचे आहे. ज्याद्वारे विद्यार्थ्याला त्याची आवड व कल ओळखण्यासाठी मदत केली जाते. एखादा व्यवसाय निवडण्याच्या प्रक्रियेत मार्गदर्शन करते.
हाच हेतू समोर ठेऊन इयत्ता 10 वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी करिअरच्या संदर्भात सखोल मार्गदर्शन होण्याच्या दृष्टीने पाटण तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सत्यजितसिह पाटणकर व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने या करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक 17 जून 2023 रोजी सकाळी 10 वाजता ए.पी जे. अब्दुल कलाम हॉल बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण येथे हे मार्गदर्शन शिबीर होणार आहे.प्रमुख वक्ते डॉ. दिलीप देशमुख हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी पाटण तालुक्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी या शिबिरात सहभागी व्हावे असे आवाहन सत्यजितसिह पाटणकर युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा